Posts

मटण कोफ्ते

Image
साहित्य-  500ग्रॅम खिमा, 2 मोठे चमचे खसखस, अंडी 1 किंवा 2 चमचे भाजलेले बेसन, 5-6 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आले, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 4 चमचे धन्याची पूड, 2 चमचे तिखट, 1/2 वाटी मसाला, 5-6 पाने तेजपान, 1/2 चमचा गोड मसाला, तूप.  कृती- कोफ्ते बनवण्याच्या अगोदर खसखसला स्वच्छ करून धुऊन भिजत ठेवावे. 1/2 तासानंतर त्याला वाटून घ्यावे. कांदा, लसूण, आले यांना सोलून ठेवावे. तूप गरम करावे त्यात तेजपान व कच्च्या मसाल्याची फोडणी टाकावी. चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात थोडेसे पाणी टाकूण मीठ व मसाले परतावे. मसाला चांगला परतून झाल्यावर 1/4 भाग मसाला खिम्यात टाकून चांगले एकजीव करावे. आता एका कडाईत तूप तापत ठेवावे व त्यात खिम्याचे भजे तळावे. आता उरलेला मसाल्याची आमटी बनविण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेवावे. 4-5 उकळी आल्यावर तयार भजे टाकून 2-3 उकळी आणून गरमा गरम मटणचे कोफ्ते पोळीसोबत सर्व्ह करावे.

रोज कस्टर्ड

Image
साहित्य :  1 लीटर दूध, रोज कस्टर्ड पावडर 2 टी स्पून, 1/4 कप डाळिंबदाणे, 1/4 कप स्ट्रॉबेरी, रोज इसेंस व रोज आईस्क्रीम 200 ग्रॅम. कृती :  सर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू कस्टर्ड टाकून पळी ने ढवळावे व त्यात साखर टाकून घट्ट झाल्यावर थंड करून त्याला फेटावे. 2 तास फ्रिजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना डाळिंबाचे दाणे व स्ट्रॉबेरी टाकून स्कूपने आइसक्रीम टाकावे. रोज इसेंस टाकून गुलाबाच्या पानांनी सजवावे. हे कस्टर्ड फारच चविष्ट लागत.

अळू करी

Image
साहित्य:  अळूची पाने, डाळीचे पीठ, चिंच कोळ, मीठ, आले, हिरवी मिरची, पुदिना, पनीर, साखर, कांदे, लसूण, टोमॅटो, गरम मसाला. कृती:  मिरच्या, आले, पनीर वाटून घ्यावे. डाळीच्या पिठात वाटलेले मिश्रण एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करावे व अळूच्या पानाला लावून गुंडाळन वाफवून घ्यावे. गार झालवर वड्या कापाव्यात. तेल गरम करून जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालावे. मीठ, गरम मसाला, साखर घालून उकळावे. अळूवड्या, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

अळूची पातळ भाजी

Image
साहित्य:  अळू, हरभरे डाळ, शेंगदाणे, खोबरे, मेथी, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, हिंग, मोहरी, काळा मसाला. कृती:  हरभरा डाळ, शेंगदाणे भिजत घालून उकडून घवेत. अळू बारीक चिरून निथळून शिजवून घोटून घ्यावे. खोबरे किसावे, तेल गरम करून हिंग, मोहरी, मीठ, गूळ अळू, काळा मसाला, हरभरे डाळ, शेंगदाणे, मेथी, तिखट, चिंचेचा कोळ, खोबरे घालून उकळवावा.

काजू मलई करी

Image
साहित्य:  क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ.  कृती:  टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

साबुदाणा खिचडी : मायक्रोव्हेव मधील

Image
साहित्य :  ३ वाटी भीजलेला साबुदाणा, पाऊण वाटी दाण्याचे कुट, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ चमच जीरे, २ चमचे तुप, मीठ साख र चवीप्रमाणे, कोथींबीर. कृती :  सर्वप्रथम मायक्रोमध्ये तुप घालून त्यात जीरे व मिरच्या घालून २ मिनीट हाय पॉवर वर ठेवावे. साबुदाणा, कुट, मीठ, साखर एकत्र करून ३ मिनीटे द्यावी. कोथींबीर घालून खाण्यास तयार साबुदाणा खिचडी.

मटण चाप

Image
साहित्य :  ६ मटण चाप, २ अंडी, अर्धी वाटी रवा, आले, लसून, कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, तेल, हळद, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ. कृती :  प्रथम चाप हळद मीठ लावून वाफवून घेणे. आले, लसून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घेणे. चापला पेस्ट लावून साधारण एक तास ठेवणे. नंतर एका बाऊलमध्ये अंडी फेसून घेणे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालणे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करा. एक-एक चाप तिखट मिक्स केलेला रवा व फेसलेल्या अंडय़ामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्या. कुरकुरीत आणि गरमागरम मटण चाप सव्‍‌र्ह करा.