मसालेदार अंडी

 साहित्य :

 6 उकडलेली अंडी, 2 मध्यम आकाराचे कांदा कापलेले, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा तिखट, कलमी, वेलची, लवंगा, 1/2 चमचा आमचूर पावडर, हळद, धने पूड, जिरे पूड मीठ व कोथिंबीर.

कृती :

 प्रत्येक अंड्याचे 4 लांब लांब काप करावे. तूप गरम करून त्यात लसूण आलं पेस्ट घालून परतावे नंतर त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यावे. आता त्यात तिखट, कलमी, वेलची व लवंगा या सर्व मसाल्यांची पूड घालून चांगले परतावे. नंतर त्यात टोमॅटो घालावे व चवीनुसार मीठ घालावे व सर्वात शेवटी कोथिंबीर व कापलेले अंडी घालून सर्व्ह करावे.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची