मेथी मटर मलाई

मेथी मटर मलाई - [Methi Mutter Malai] डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.

जिन्नस

    १०० ग्रा. हिरवे मटार
    २ चमचे मलाई
    २ छोटे जुडी मेथी
    ४ हिरवी मिरची
    एक टोमॅटो
    २ चमचे साखर
    २ चमचे मावा
    १ कप दूध
    ४ चमचे वाटलेला पालक
    थोडी हळद
    २०० ग्रा. काजू
    ५० ग्रा. खरबुज बी
    २ कारले
    ४ चमचे तेल
    १०० ग्रा. मावा
    ४ लवंग
    ४ छोटी विलायची
    ४ काळे मिरे
    २ तेज पान
    २ चमचे आले लसणाची पेस्ट

पाककृती


१ लि. पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी. कढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान काळीमिरे आणि आले लसणाची पेस्ट टाकून भाजावे. यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे.

१ ग्लास पाणी, काजू-खरबुज पेस्ट आणि एक कप दूध टाकावे. १०-१५ मिनिटे परतून शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.

चांगल्या तर्‍हेने उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे, आता कमी गॅस करून अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार आहे.

हिरवे मटर व मेथीची पाने तोडून उकळावे थंड झाल्यावर त्यास पिळून घ्यावे आता या मिश्रणात काजू ग्रेवी टाकावी. यात थोडीसी हळद, पालक, मेथी, हिरवे मटार, मलाई, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे मिसळावी.

५-१० मिनिट शिजवावे. २ चमचे क्रीम टाकावे. डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची