मराठी पाककृती : मसाला भेंडी

साहित्य : 

भेंडी - अर्धा किलो, कांदे - २ मोठे, हिरव्या मिरच्या २-४, तेल - ४ टेबलस्पून, जिरे - १/२ टीस्पून, लाल
तिखट - १ टीस्पून, धणेपूड - १ टेबलस्पून, हळद - १/२ टीस्पून, आमचूर - १/२ टीस्पून, मीठ -चवीनुसार

कृती :

 सर्वप्रथम कांदे सोलून उभे चिरावेत. हिरव्या मिरच्या धुवून उभ्या चिराव्यात. नंतर भेंडी धुवून, पुसून घ्यावीत व भेंडीचे टोके व देठ काढून दोन इंचाचे तुकडे करून घ्यावे व प्रत्येक तुकडय़ाला मध्ये उभी चीर पाडावी. तत्पश्चात कढईत तापवून त्यात जिरे टाकावे. ते तडतडले की चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंग येत तोवर परताव. हिरव्या मिरच्या घालून जरा वेळ परतावे. त्यात भेंडीचे तुकडे घालून लगेच वरून लाल तिखट, धणेपूड घालावी व नीट मिसळून कढईवर झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी. अधूनमधून ढवळावे. चवीनुसार मीठ व आमचूर घालावे.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची