पाककृती : वरणफळ

साहित्य :


 १ वाटी तूरडाळ, १ १/२ वाटी पोळ्यांची कणिक, चिंच, गूळ, फोडणीचे साहित्य

कृती:


डाळ शिजवून घ्यावी. कणिक पोळ्यांसाठी मळतो तशी मळावी. तेल मोहरी हळद चिमूटभर हिंग अशी फोडणी करुन त्यात शिजलेली डाळ,पाणी घालून थोडे चिंच गूळ आणि मीठ घालावे. हे मिश्रण पातळ ठेवून मंद आचेवर उकळत ठेवावे. आता कणकेची पोळी लाटून तिचे कातणीने शंकरपाळ्याप्रमाणे तुकडे करावेत. २-३ पोळ्या लाटून तुकडे करुन झाल्यावर हे तुकडे सुटे करुन वरणात घालावे. वरणातले पाणी आटले असल्यास परत थोडे पाणी घालून ढवळावे. ५-१० मिनीटे शिजू द्यावे आणि उतरवावे. वरणाबरोबर पोळी खायचा आळशीपणा करायचा असल्यास खा वरण+पोळी एकत्र असे हे वरणफळ!

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची