मुगलई दम आलू

मुगलई दम आलू - [Mughlai Dum Aloo] 


उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता.

जिन्नस


    ८ बटाटे
    तळणासाठी तूप


भरण्यासाठी मसाला


    ४ कापलेली काजू

    ६ कापलेली मनुका


    ११५ ग्रा. मावा


    १ हिरवी मिरची


    मीठ


    काळे मिरे


    २ कांदे


    २ हिरवी मिरची


    १ आल्याचा तुकडा


    १/२ चमचा हळद


    २ चमचे मीठ


    ५ लाल मिरची


    ५ पाकळी लसूण 

पाककृती


बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. बटाट्याचा आतील भाग पोकळ करुन घ्यावा. बटाट्यामध्ये बनविलेला मसाला भरावा व उरलेल्या बटाट्याच्या कुस्कराने भरुन टाकावे.

टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे.

एका पातेल्यात तूप गरम करून लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी.

जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम-गरम वाढावे.



Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची