ओल्या काजूची भाजी

ओल्या काजूची भाजी - [Olya Kajuchi Bhaji] मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करुन कोकणात केली जाणारी ‘ओल्या काजूची भाजी’ उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावी.

जिन्नस


    पाव किलो सोललेले ओले काजूगर
    २ कांदे
    २ बटाटे
    १ टोमॅटो
    अर्धा ओला नारळ किसून
    लसुण
    आले
    गरम मसाला पावडर
    तिखट
    हळद
    मीठ
    कोथिंबीर
    तेल

पाककृती


काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत.

प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे.

चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.

नंतर भाजलेल्या कांदा - खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात.

उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची