रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात

 साहित्य -


 दोन वाटी बासमती तांदूळ, चार वाटी पाणी, चार टे. स्पू. साजूक तूप, दोन-तीन लवंग, वेलची पूड, दोन वाटी किसलेला गूळ, दोन वाटी खोवलेलं ओलं नारळ, आठ-दहा काजू, अर्धी वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग.


कृती - 


तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून टाकावं. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. १0-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची