कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी
कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी - [Cauliflowerchi Masaledar Bhaji] चटपटीत, मसाला घालून केलेली ‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’ तोंडाला चवच आणेल.
१ किलो कॉलीफ्लॉवर
१ वाटी धणे
अर्धा चमचा हळद
१ चमचे तिखट
१० लसूण पाकळ्या
५ चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
१ चमचा मीठ (किंवा जास्त)
फ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार मध्यम तुरे ठेवावे. धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे.
एकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे. पातेल्यात तेल तापलेकी त्यात मोहरी घालवी. तडतडला की वाटलेला मसाला खमंग परतावा.
खाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे. थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झांकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी. दहा मिनिटांनंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी.
जिन्नस
१ किलो कॉलीफ्लॉवर
१ वाटी धणे
अर्धा चमचा हळद
१ चमचे तिखट
१० लसूण पाकळ्या
५ चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
१ चमचा मीठ (किंवा जास्त)
पाककृती
फ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार मध्यम तुरे ठेवावे. धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे.
एकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे. पातेल्यात तेल तापलेकी त्यात मोहरी घालवी. तडतडला की वाटलेला मसाला खमंग परतावा.
खाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे. थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झांकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी. दहा मिनिटांनंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी.
Comments
Post a Comment