मटण हंडी

मटण हंडी - [Mutton Handi] मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीमध्ये बनवलेली ‘मटण हंडी’ खमंग व स्वाद वाढवते.

जिन्नस


    १ किलो मटणाचे तुकडे



    ७ किसलेले कांदे


    २ इंच आल्याची पेस्ट


    मीठ


    अर्धा चमचा साखर


    ४ हिरव्या मिरच्या


    १ चमचा कोथिंबीर


    २ कप दही


    १ लसणाची पेस्ट


    अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी


    दीड चमचा लाल मिरची


    १ चमचा हळद


    २ बारीक केलेले टोमॅटो


    १ चमचा गरम मसाला


पाककृती


प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.

एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता.

त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता.

त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.

झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.

गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची