मिक्स्ड व्हेजिटेबल लोणचे
साहित्य :
1 किलो कोबी, 1 किलो गाजर, 1 किलो टोमॅटो, 1 किलो शलजम, 100 ग्राम तिखट, 100 ग्रॅम सरसोचे तेल, 50 ग्रॅम हळद, 250 ग्रॅम मीठ, 100 ग्रॅम व्हिनेगर, 250 गूळ.
कृती :
सर्व भाज्या धुऊन मध्यम आकारात कापल्या नंतर उकळत्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढून उन्हात वाळवाव्या. नंतर सर्व मसाले वाटून मिसळावे तसेच गुळास व्हिनेगरमध्ये टाकून गरम करून तेलही त्यात मिळवावे. सर्व साहित्य व्यवस्थित मिळवून बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल.
Comments
Post a Comment