कणसाची रसेदार छल्ली

साहित्य :


 4 अमेरिकन कार्न, 1 लहान चमचा बटर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, 4 लहान चमचे चाट मसाला, पाव वाटी लिंबाचा रस.


कृती : 


सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यात भुट्टे घालून चांगले हालवून घ्यावे व त्यात 1/2 वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिटा होऊ द्या.

रसा तयार करण्यासाठी : 


लिंबाच्या रसात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे, आवडत असल्यास थोडे लोणीसुद्धा घालू शकता.

भुट्टे उकळ्लयावर त्यांना लिंबाच्या रसाने तयार केलेल्या रस्यात चांगल्याप्रमाणे चोळून घ्यावे, आणि गरम गरम भुट्टे सर्व्ह करावे.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची