रोस्टेड चिकन

साहित्य : 


६-८ कोंबडीचे तुकडे, हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले चीज़, लसूण पाकळ्या २, चवीला मीठ, मेयॉनीज़, पावाचा चुरा.

कृती :


 हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे. चांगली भट्टी(ओव्हन) हवी. साल काढलेले चिकनचे मोठे तुकडे घ्या. शक्यतो मांड्या आणि छातीचे भाग असावेत. बकीचे तुकडे रस्सा करण्यासाठी वापरता येतील. तुकड्यांना सढळ हाताने मेयॉनीज़ लावा. लसूण वाटून पावाच्या (कुरकुरीत) चुऱ्यात घाला. सगळे कोंबडीचे तुकडे पावाच्या चुऱ्यात चांगले घोळा. पाहिजे असेल तर त्यावर बदामाचे काप लावा.

सर्व तुकडे आधी ३५० फॅरनहाईट पर्यंत तापविलेल्या भट्टीमन्धे एक थराने थोडे पसरून ठेवा. ८-१० मिनिटामध्ये तांबूस खमंग होतील. चीज हवे अस्ल्यास शेवटच्या २ मिनिटासाठीच घालायचे.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची