ब्रेड रोल्स

ब्रेड रोल्स - [Bread Rolls] न्याहारी किंवा मधल्या वेळेत झटपट करता येण्यासारखा खमंग, चटपटीत असा ब्रेड रोल्स लहानांसह मोठ्यांना पण नक्कीच आवडेल.

जिन्नस


    स्लाईस ब्रेड


    उकडलेले बटाटे


    मीठ


    हिरव्या मिरच्या


    कोथिंबीर


    थोडे आले

पाककृती


ब्रेडच्या कड्या कापून घ्या. ऊकड्लेले बटाटे सोलून घ्या. नंतर किसणीवर किसा.

त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालून सारण तयार करावे.

उथळ पातेलीत पाणी घेवून त्यात एकेक स्लाईस टाकाव्यात.

नंतर दोन्ही हाताच्या तळव्याने दाबून पाणी काढून टाकावे. त्यावर सारण घालून गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात.

ब्रेड ओला झाल्यामुळे छान गुंडाळी होते. नंतर तव्यात तूप टाकून त्यात हे रोल्स तळून काढावेत.

छान कुरकुरीत होतात.

हे गरमागरम रोल्स सॉस सोबत सर्व्ह करावेत.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची