तीळ-गूळ पोळी
साहित्य:
अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, वेलदोडा पूड, एक चमचा खोबर्याचा कीस, दोन चमचे डाळीचे पीठ, कणीक, मैदा, तूप.
कृती:
कणकेच्या निम्मे मैदा व दोन चमचे डाळीचे पीठ घेऊन त्यात मोहन घाला. पोळ्यांच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. गूळ किसून घ्या. खसखस, तीळ, खोबर्याचा कीस भाजून बारीक करून घ्या. त्यात वेलदोडा पूड घाला. हे मिश्रण एकत्र करा. कणकेचा लहान गोळा घेऊन पुरी एवढे लाटा. त्यात वरील मिश्रणाचा गोळा घालून हलक्या हाताने पोळी लाटा. ही पोळी तव्यावर खमंग भाजा. या पोळ्या खूप दिवस टिकतात.
Comments
Post a Comment