पुडाच्या वड्या

साहित्य :


 दोन जुड्या कोथिंबीर, चिच कोळ अर्धी वाटी, तळणीसाठी तेल, एक वाटी खिसलेले सुक्के खोबरे, अर्धी वाटी पांढरे तिळ, गोडा मसाला दोन टे. स्पुन, मिठ , साखर दोन टे.स्पुन. 


 पारीसाठी- 


बेसन पिठ एक वाटी, कणीक अर्धी वाटी, तेलाचे मोहन कडकडीत एक डाव. अर्धा टे.स्पुन हळद, मिठ एक चमचा.


कृती- 


सर्वप्रथम कोथिंबीर निवडून धुवुन ठेवावी, खिसलेले खोबरे भाजावे व नंतर कुस्करावे, तिळ भाजून अर्धवट कुटावेत, कोथिंबीर बारीक चिरावी, त्यात खोबरे, तिळ कुट, मसाला, मिठ, साखर हे सर्व एकत्र करुन ठेवावे,
बेसन पिठ व कणीक एक्त्र करुन त्यात तेलाचे मोहन कडकडीत एक डाव घालुन घट्ट भिजवा. त्याची पारी लाटून त्यावर चिंचेचा कोळ सगळीकडे लावा, त्यावर सारण पसरा, हाताने सारण घट्ट थापा, त्याची घट्ट सुरळी बनवून वड्या सुरीने कापुन घ्या, मंद आचेवर तळा.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची