Posts

Showing posts from February, 2018

चिकन बिर्याणी

Image
साहित्य :  650 ग्रॅम चिकनचे तुकडे, दीड कप बासमती तांदूळ, 2 मोठे चमचे तेल, 1 कापलेला कांदा, 2 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 तुकडा अद्रक, 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मीठ (चवीनुसार), 1/2 चमचा गरम मसाला, 3 कापलेले टोमॅटो, 1/2 चमचा हळद, 2 तेजपान, 4 लहान वेलची, 4 लवंगा, 1 चमचा केसर. कृती :  तांदूळ धुऊन अर्था तास पाण्यात भिजवावे. एक पॅनमध्ये तेल गरम करून कांदे परतून घ्यावे. नंतर लसूण, आलं व हिरवी मिरची टाकून फ्राय करावे.  चिकन टाकून पाच मिनिट फ्राय करावे. चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला घालून पाच मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो घालून तीन-चार मिनिट आणखी भाजावे नंतर उतरवून एकीकडे ठेवावे. दुसऱ्या सॉस पॅन मध्ये तांदूळ, तीन कप पाणी, हळद, तेजपान, वेलची आणि केसर घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. शिजून झालेला भातात चिकन हळूच मिसळावे आणि कमी आंचेवर आठ-दहा मिनिट शिजवून आंच विझवावी व आठ-दहा मिनिटानंतर वाढावे.

खडा मसाला चिकन

Image
कढाईत तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. आलं व लसून टाकून दोन मिनिटं चांगलं फ्राय करावे. त्यानंतर सर्व प्रकारचा खडामसाला बारीक न करता तेलात परतून घ्यावा. चवीनुसार मीठ टाकावे. त्यानंतर चिकनचे लहान केलेले तुकटे त्यात टाकावे. चांगले फ्राय करून झाल्यानंतर पाणी टाकून 40 ते 50 मिनिट मंद आंचेवर शिजवावे. जेव्हा चिंकन शिजून जाईल तेव्हा त्यातील पाणी काढून घ्यावे, ते पाणी तुम्ही सूप म्हणूनही सर्व्ह करू शकता. खडा मसाला चिकन सजविण्यासाठी त्यावर कोथिंबिर, टोमॅटो, काकडीच्या गोल चकत्या ठेवू शकतात.

अन्नाई कथरिकाई

Image
 साहित्य :  16-20 लहान वांगी, लिंबा एवढी चिंच, 2 चमचे आणि अर्धा कप तेल, गोड लिंबाची 10 पानं, 1/2 चमचा मसाला, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथीदाणा, 2 चमचा धणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 4 सुक्या मिरच्या, 10 काळेमिरे, 1/4 चमचा हिंग, 1/4 चमचा हळद, 1/2 कप नारळाचा बुरा, मीठ चवीनुसार. कृती :  सर्वप्रथम वांग्याचे देठ काढून त्याला चारीबाजूने उभे कापावे. गरम पाण्यात चिंच भिजत घालावी आणि त्याच्या बिया काढून घ्याव्या. दोन चमचे तेल गरम करून त्यात जिरं, धणे, मेथी, चणा डाळ, उडदाची डाळ घालून फ्राय करावे नंतर त्यात तिखट, काळे मिरे, हिंग, हळद घालावी. गॅसवरून उतरवून त्यात नारळाचा बुरा घालून मिक्स करावे. मिश्रण गार झाल्यावर त्याची पेस्ट करावी. नंतर ती पेस्ट वांग्यात भरावी. कढईत अर्धा कप तेल गरम करून त्यात गोड लिंबाची पानं आणि वांगे सोडावे. उरलेल्या मसाला घालून झाकण ठेवावे. चिंचेत थोडे पाणी घालून ते भाजीवर सोडावे. मध्यम आंचेवर 15 ते 20 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.

आमटी टेस्टी बनविण्यासाठी टिप्स

Image
तुम्ही रोजच वरण बनवता पण याची चव काही खास नसेल तर प्रयोग करा ही पद्धत ज्याने याच्या टेस्टमध्ये नक्कीच येईल फरक  टिप्स - वरणाला शिजवताना त्यात एक चिमूट हळद आणि तूप किंवा तेलाचे काही थेंब घालावे ज्याने वरण शिजेल ही लवकर आणि त्याच्या चवीत देखील फरक येईल. - वरण तयार करण्याअगोदर साबूत मसुरीच्या डाळीला कढईत हलकी परतून बनवली तर ती जास्त टेस्टी बनेल. - तुरीच्या डाळीला बनवण्याआधी अर्धा तास भिजवून ठेवल्याने याची चव फारच उत्तम असते. - डाळींना कुकराच्या बदले दुसर्‍या भांड्यांमध्ये शिजवावे. यात वेळ थोडे जास्त लागेल पण वरण फारच चविष्ट बनेल. - वरण बनवताना पाण्याची मात्रा योग्य ठेवल्याने याची टेस्टी जास्त उत्तम राहील. - दाल फ्राई करायची असेल तर फ्राई करणार्‍या साहित्याला आधी तेलात किंवा तुपात योग्य प्रकारे परतून घ्यावे, नंतर फ्राय करावे.  - मुगाच्या डाळीला कुकरामध्ये शिजवण्यापेक्षा कढईत शिजवावे, ही जास्त टेस्टी बनेल.

मसालेदार क्रेब

Image
 साहित्य :  चार रॉक क्रेब, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सांबार मसाला, 20 ग्रॅम तांदळाची पिठी, 20 ग्रॅम रवा, चार छोटे चमचे तेल व मीठ चवीनुसार. विधी :  क्रेबला सर्वात आधी चांगले स्वच्छ करून त्याला दोन भागात कापून घ्यावे. त्यातील गिल आणि फॅट वेगळे काढावे नंतर ते धुऊन पाणी काढून टाकावे. क्रेब्सवर मीठ, हळद आणि सांबार मसाला लावून अर्धा तास तसचे ठेवावे. तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून क्रेब्सला गुंडाळावे. एक पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात क्रेब्स तळून घ्यावे. वरून उरलेले तेल टाकून वर खाली करावे. गरम गरम सर्व्ह करावे.

चिंचेच्या आमटीतील बेसन वडी

Image
साहित्य :  2 वाट्या बेसन, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ चवीनुसार, पाव चमचा हळद, 1- 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा धने व जिरे पूड.   आमटी :   अर्धी वाटी चिंचेचा कोळ, दाण्याची पूड पाव वाटी, काळा मसाला दीड चमचा. 1 लहान चमचा बेसन, थोडासा गूळ मोहनासाठी लहान चमचा तेल, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे हिंग. दोन वाट्या बेसन घेऊन त्यात चिरलेली कोथिंबीर, तेल, तिखट, मीठ, हळद, धने, जिरे पूड अर्धा चमचा घाला. थोडे पाणी घालून घट्ट भिजवून घ्या. गोळा बनवून पोळपाटावर मोठी पोळी लाटा, सुरीने चौकोनी तुकडे करून घ्या. कृती :  कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कडीपत्ता, लालमिरची व हिंग घालून फोडणी करा. अर्धा चमचा आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट घालून हालवा, अर्धा चमचा धने पूड व जिरे पूड घाला. चिंचेचा कोळात पाणी मिसळून दाण्याचा कूट व 1 चमचा बेसन घालून कालवून घ्या, पातळ करा. वरील फोडणीत कालवलेले चिंचेचे सारण, तिखट, मीठ, काळा मसाला व अंदाजे गूळ घाला. नंतर थोडे पाणी घालून उकळा व त्याच्या बेसनाच्या वड्या घाला, 5 मिनिटे उकळून द्या. चिंचेच्य...

बंगाली खिचडी

Image
साहित्य :    100 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 2 बटाटे, 1 लहान कोबी, 100 ग्रॅम आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, 1/2 हळद, 1/2 साखर, 2 लाल मिरच्या, 1/4 चमचा जिरं, हिंग, 4 लवंगा, 2 वेलदोडे, 1 तुकडा कलमी, 2 तेजपान, 3 मोठे चमचे तूप.  कृती :  बटाट्याचे सालं काढून त्याचे लांब लांब तुकडे करून घ्यावे. कोबीचे मोठे तुकडे करावेत. आले व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावात. तांदळाला स्वच्छ धुऊन टाकावे. डाळींना तूप न घालता गुलाबी होईस्तोर परतून घ्यावे. नंतर त्यात तूप, लाल मिरच्या, जिरं व हिंग सोडून बाकी सर्व साहित्य टाकून 1/2 लीटर पाणी घालून गॅसवर 1/2 तास शिजत ठेवावे. मधून मधून त्याला पळीने हालवत राहावे. शिजून झाल्यावर खाली उतरवून घ्यावे. सर्व्ह करताना तूप गरम करून त्यात वरून लाल मिरच्या, जिरं व हिंगाची फोडणी द्यावी.

गुजराती स्पेशल : हंडवा

Image
साहित्य :  2 वाटी तांदूळ, 1/2 वाटी चण्याची डाळ, 1/2 वाटी उडदाची डाळ, 1/4 वाटी तुरीची डाळ, 2 चमचे दही, 1 चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, 1/4 चमचा हळद, 1 चमचा साखर, 1/2 चमचा धणे पूड, 1/2 चमचा सोडा.  फोडणीचे साहित्य :  1 चमचा तीळ, 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा तेल, कडी पत्ता, 4 लवंगा, कलमीचा तुकडा 1/2 इंच, 2 साबूत लाल मिरच्या. कृती :  सर्वप्रथम तांदूळ व डाळींना 7-8 तासासाठी भिजत ठेवावे. नंतर त्यात दही घालून वाटून घ्यावे. 4-5 तास या मिश्रणाला खमीर येण्यासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात साखर, मीठ, सोडा, हळद व धणे पूड घालून 35 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर त्यांचे काप करावे. लवंग व कलमीला तव्यावर भाजून त्याची पूड करावी. गरम तेलात फोडणी देताना सर्व फोडणीचे साहित्य घालून फोडणी तयार करावी व काप केलेल्या तुकड्यांवर पसरवावी. चटणीसोबत सर्व्ह करावे.  

फिश क्रॉकेटस

Image
साहित्य :  1 कप पाणी, 6 लहान बटाटे, 675 ग्रॅम रावस माशाच्या तुकड्या, 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा चमचा वर्सेस्टरशायर सॉस, 1 मोठा पार्सली चिरलेली, 1 छोटा चमचा मीठ, चिमूटभर मिरे पूड, 1 लहान चमचा मैदा, 1 अंडे घुसळलेले, 1/2 कप ब्रेड चुरा, 2 कप तेल, टोमॅटो कॅचप. कृती :  कुकरमध्ये पाणी घाला. बटाटे घाला. मासा एका वेगळ्या भांड्यात ठेवा. कुकर बंद करून 5 मिनिटे शिजवा. नंतर कुकर उघडा. मासा आणि बटाटे काढा. माशाचे काटे आणि खवले काढा. बटाटे सोलून काट्याने त्यांचा लुसलुशीत लगदा करा. मासा बटाटे, कांदा, वर्सेस्टरशायर सॉस, पार्सली, मीठ आणि मिरे एकत्र करून चांगले मिसळा. मिश्रणाचे 12 भाग करा. पाटावर मैदा पसरा. पाटावर 5 सें. मी. लांबीचे लांबट कबाब तयार करा. प्रत्येक कबाब अंड्यात आणि ब्रेडच्या चुऱ्यात बुडवा. तेल गरम कबाबाला बदामी होईपर्यंत तळा. टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम वाढा.  

कॉर्न साबूदाणा बॉल्स

Image
साहित्य :  दोन मक्याची कणसे, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी भिजविलेला साबूदाणा, एक चमचा जिरे, थोडी चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी दाण्याचे कूट, 2-3 चमचे हिरवी मिरची पेस्ट. चवीनुसार मीठ, साखर, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे साजूक तूप. कृती :  सर्वप्रथम कणसे बारीक किसणीने किसून घ्यावीत किंवा त्याचे दाणे काढून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. बटाटे सोलून किसून घ्यावेत. भिजलेल्या साबूदाण्यात बटाट्याचा कीस, जिरे, दाण्याचे कूट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, साजूक तूप, मीठ साखर, लिंबाचा रस, किसलेली कण से घालावीत. मिश्रण चांगले एकजीव करावे व लहान लहान बॉल्स बनवून तेलात तळून घ्यावेत. हे बॉल्स खोबर्‍याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

पातोडीची भाजी

Image
साहित्य :  चणा डीळीचे १ किलो बेसन, अर्धा पाव खोबरे, १ छटाक लसूण, ५० ग्रॅम जिरे, १ छटाक सांभार, अर्धा कांदा, ५० ग्रॅम गरम मसाला. कृती    :सर्वप्रथम एक छटाक तेल कढईत गरम करुन घ्यावे. त्यानंतर या तेलात मोहरी, जिरे, ओवा, मीठ व मिरची पूड (सर्व प्रमाणानुसार) घालून परतून घ्यावे. हे तेल बेसनामध्ये टाकून पुन्हा परतून घ्यावे. त्यानंतर शिजलेले बेसन एका ताटात थापून घेऊन त्याच्या चोकोनी वड्या करुन घ्याव्यात. खोबरे, लसूण, जिरे आणि कांदा व गरम मसाल्याची मिक्सरमध्ये पेस्ट करावी. ही पेस्ट दोन लीटर पाण्यात घालून त्याची फोडणी घालावी. रस्सा तयार झाला की बेसणाच्या केलेल्या वड्या त्यात घालून अर्धा तास शिजू द्यावे. त्यानंतर पातोडीची भाजी तयार झाली की त्यात वरुन खोबरे किस, सांबार घालून वाढावे.   संबंधित माहिती     देशातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ सुरु शेतकरी वर्गाला दिलासा     आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ शुक्रवारी उघडणार     राज्य सरकारच्या विसर्जनाची वेळ आली आहे : विखे-पाटील     कांदा सायीची भाजी ...

चिकन बिर्याणी

Image
साहित्य :  650 ग्रॅम चिकनचे तुकडे, दीड कप बासमती तांदूळ, 2 मोठे चमचे तेल, 1 कापलेला कांदा, 2 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 तुकडा अद्रक, 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मीठ (चवीनुसार), 1/2 चमचा गरम मसाला, 3 कापलेले टोमॅटो, 1/2 चमचा हळद, 2 तेजपान, 4 लहान वेलची, 4 लवंगा, 1 चमचा केसर. कृती :  तांदूळ धुऊन अर्था तास पाण्यात भिजवावे. एक पॅनमध्ये तेल गरम करून कांदे परतून घ्यावे. नंतर लसूण, आलं व हिरवी मिरची टाकून फ्राय करावे.  चिकन टाकून पाच मिनिट फ्राय करावे. चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला घालून पाच मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो घालून तीन-चार मिनिट आणखी भाजावे नंतर उतरवून एकीकडे ठेवावे. दुसऱ्या सॉस पॅन मध्ये तांदूळ, तीन कप पाणी, हळद, तेजपान, वेलची आणि केसर घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. शिजून झालेला भातात चिकन हळूच मिसळावे आणि कमी आंचेवर आठ-दहा मिनिट शिजवून आंच विझवावी व आठ-दहा मिनिटानंतर वाढावे.

टोमॉटोची व चिंचेची चटणी

Image
साहित्य :  अर्धा किलो टोमॅटो, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धीवाटी तेल, चमचाभर मोहरी, आवडीनुसार तिखट व मीठ, थोडासा चिंचेचा गाळलेला कोळ, अर्धा चमचा मेथी दाणा, थोडासा कढीपत्ता व हिंग दोन चमचे साखर. कृती :  सर्वप्रथम कढईत तेल घालून हिंग व मेथी परतून घ्या. त्याची पावडर करा. लसूण आणि टोमॅटोही मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट घट्ट होईपर्यंत शिजवा. आता एका कढईत जास्त तेल घालनू त्यावर मोहरी व कढीपत्त्याची फोडणी तयार करा. त्यात चिंचेचा कोळ, हिंग, मेथीची पावडर, मीठ, तिखट घाला. कोळ शिजू लागला की टोमॅटोची पेस्ट व साखर घालून पाच मिनिटे शिजवा.

मटार ढोकळा

Image
साहित्य :  अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तांदूळ, 1 वाटी वाफवलेले मटार, 2 पालकाची पाने, 4 पानं कढीपत्ता, अर्धा इंच आलचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचा तीळ. सजावटीसाठी 1 चमचा कोथिंबीर, 1 चमचा ताजं खोबरं. कृती :  तांदूळ, चणाडाळ आणि उडीदडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसर्‍या दिवशी निथळून मिक्सरला लावावे. त्यातच आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, हिंग, पालक आणि मटार घालून मिक्सरला लावावे. आता बाऊलमध्ये काढून 7 ते 8 तास झाकून ठेवावे. नंतर त्यात मीठ, तेल, खाण्याचा सोडा आणि थोडेसे पाणी घालून मिश्रण इडलीच्या पीठाप्राणे बनवावे. ढोकळा वाफवण्यासाठी इडली पात्राला तेलाचा हात लावावा. त्यात तयार ढोकळ्याचे मिश्रण चमच्याने घालून 15 मिनिटे वाफवावे. ढोकळा गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून ताटात काढाव्यात. पॅनमध्ये गरम तेलात मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता व तीळ टाकून तयार तडका ढोकळ्यावर पसरवावा. कोथिंबीर व खोबर्‍याच्या मिश्रणाने सजवून ढोकळा खाण्यास द्या.

बनाना बॉल्स (महाशिवरात्री स्पेशल)

Image
साहित्य :  2 कच्ची केळी उकडून सोलून मॅश केलेली, 2 बटाटे उकडलेले साल काढून मॅश केलेले, 1/2 कप साबुदाण्याचे पीठ, 1-1 चमचा आलं, हिरव्या मिरच्या बारीक काप केलेल्या, काळेमिरे पूड, मीठ व पोदिना पावडर, कोथिंबीर बारीक चिरलेली, तळण्यासाठी तेल व पनीर 100 ग्रॅम. कृती :  सर्वप्रथम पनीराचे 1-1 इंच लांबीचे तुकडे करून त्यावर थोडंसं मीठ व काळेमिरे पूड घालून ठेवावे. तेल व पनीर सोडून बाकी सर्व साहित्य एकजीव करून त्याचे गोळे तयार करावे. एक गोळा घेऊन हातावर पसरवून त्यात 1 पनीराचा तुकडा ठेवावा व पूर्णपणे बंद करावे. तेल गरम करून सोनेरी होईपर्यंत गोळे तळून घ्यावे. बनाना बॉल्स तयार आहे आता या बॉल्सला तुम्ही हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.

चव दक्षिणेची : इडली पिझ्झा

Image
  इडलीसाठी साहित्य :  1 कप सोजी, 1/2 कप दही, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा पॅकेट फ्रूट सॉल्ट. सजावटीसाठी साहित्य :  1 मोठा कांदा चिरलेला, 1 मोठी सिमला मिरची बारीक चिरलेली, 1/2 कप कॉर्न उकळलेले, थोडंसं पनीर किसलेला, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 2 मोठे चमचे टोमॅटो कॅचअप आणि 2 छोटे चमचे चिली गार्लिक सॉस. कृती : सोजीत मीठ व दही घालून फेटून घ्यावे. इडली मेकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडल्या तयार कराव्या. नंतर इडल्या गार झाल्यावर वरून सॉस लावून चिली फ्लेक्स, चिली सॉस, चिरलेल्या भाज्या, कॉर्न व पनीर टाकून सर्व्ह करावे.

अन्नाई कथरिकाई

Image
 साहित्य :  16-20 लहान वांगी, लिंबा एवढी चिंच, 2 चमचे आणि अर्धा कप तेल, गोड लिंबाची 10 पानं, 1/2 चमचा मसाला, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथीदाणा, 2 चमचा धणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 4 सुक्या मिरच्या, 10 काळेमिरे, 1/4 चमचा हिंग, 1/4 चमचा हळद, 1/2 कप नारळाचा बुरा, मीठ चवीनुसार. कृती :  सर्वप्रथम वांग्याचे देठ काढून त्याला चारीबाजूने उभे कापावे. गरम पाण्यात चिंच भिजत घालावी आणि त्याच्या बिया काढून घ्याव्या. दोन चमचे तेल गरम करून त्यात जिरं, धणे, मेथी, चणा डाळ, उडदाची डाळ घालून फ्राय करावे नंतर त्यात तिखट, काळे मिरे, हिंग, हळद घालावी. गॅसवरून उतरवून त्यात नारळाचा बुरा घालून मिक्स करावे. मिश्रण गार झाल्यावर त्याची पेस्ट करावी. नंतर ती पेस्ट वांग्यात भरावी. कढईत अर्धा कप तेल गरम करून त्यात गोड लिंबाची पानं आणि वांगे सोडावे. उरलेल्या मसाला घालून झाकण ठेवावे. चिंचेत थोडे पाणी घालून ते भाजीवर सोडावे. मध्यम आंचेवर 15 ते 20 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.

Recipe : रशियन सलाड

Image
लागणारे जिन्नस :  मटार आणि गाजर 100-100 ग्रॅम, बटाटा एक किंवा दोन, पत्तागोबी 100 ग्रॅम, टमाटे 4, अननस आणि सफरचंद 200 ग्रॅम, साय अर्धा कप, चवीनुसार मीठ, मिरेपूड. कृती :  मटार, बटाटे , गाजर उकळवून घ्या. मटारचे दाणे काढा. गाजर लांबट आकारात चिरून घ्या. बटाटा सोलून कापून घ्या. पत्ताकोबी बारीक चिरून घ्या. टमाटे, सफरचंद, अननस कापून घ्या. कापलेली फळे ढका पसरट भांड्यात सजवा. दुसर्‍या एका भांड्यात सर्व भाज्या, मीठ, मिरेपूड टाकून आवडत्या आकारात सजवून सर्व्ह करा.

स्टीम्ड चिकन

Image
 साहित्य :  1 देशी चिकन, चवीनुसार मीठ. सॉससाठी साहित्य -  एक लहान चमचा लसणाची पेस्ट , 1/2 चमचा वाटलेली हिरवी मिरची, एक लहान चमचा सोया सॉस, कोथिंबीर सजविण्यासाठी, 1 लहान चमचा तेल.  कृती :  संपूर्ण चिकनवर मीठ लावून 10 मिनिटापर्यंत ठेवावे. स्टीमरमध्ये पाणी भरावे व प्लेटमध्ये चिकन ठेवून ते स्टीमरमध्ये ठेवून 30 मिनिटपार्यंत स्टीम करावे. सुई किंवा चॉप स्टिक टाकून पाहावे की चिकन व्यवस्थित शिजले आहे किंवा नाही. नंतर बाहेर काढून तुकड्यांमध्ये कापावे व प्लेटमध्ये ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात लसुण व हिरव्या मिरच्या टाकून परतावे. सोया सॉस व उरलेले पाणी (उकळलेल्या चिकनचे) टाकून सॉस तयार करावा. सॉस चिकनवर टाकावे. वरून कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.

गुजराती रेसिपी : थेपले

Image
2 वाट्या कणीक, 1 मेथीची जुडी, आर्धी कोथिंबीरची जुडी, अलां, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा लहान चमचा तिखट, चिमूटभर जिरं, 2 मोठे चमचे गूळ, 2 मोठे चमचे दही, 1 मोठा चमचा तेल, 1 लहान चमचा मीठ. कृती :  सर्वप्रथम कणीक चाळून घ्यावी. मेथी व कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरावी. कणकेत तेल, मीठ घालून सारखी करावी. त्यात सर्व मसाला आणि मेथी, कोथिंबीर घालावी. दह्यात गूळ विरघळवून त्यात पीठ घट्ट भिजवाव. गरज वाटली तर पाण्याचा हात लावावा. पेढ्याएवढा गोळा करून पुरीसारखे लाटून तव्यावर टाकून शेकावे. गरमागरम सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे.