Recipe : रशियन सलाड
लागणारे जिन्नस :
मटार आणि गाजर 100-100 ग्रॅम, बटाटा एक किंवा दोन, पत्तागोबी 100 ग्रॅम, टमाटे 4, अननस आणि सफरचंद 200 ग्रॅम, साय अर्धा कप, चवीनुसार मीठ, मिरेपूड.
कृती :
मटार, बटाटे , गाजर उकळवून घ्या. मटारचे दाणे काढा. गाजर लांबट आकारात चिरून घ्या. बटाटा सोलून कापून घ्या. पत्ताकोबी बारीक चिरून घ्या. टमाटे, सफरचंद, अननस कापून घ्या. कापलेली फळे ढका पसरट भांड्यात सजवा. दुसर्या एका भांड्यात सर्व भाज्या, मीठ, मिरेपूड टाकून आवडत्या आकारात सजवून सर्व्ह करा.
Comments
Post a Comment