पुरण पोळी
साहित्य-
एक किलो हरभर्याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.
कृती :
हरभर्याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी. गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी. गॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो. डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर, मीरपूड घालावी. मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे.
कणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे. पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. चमच्याने साजूक तूप सोडून दोन्ही बाजूने पोळी शेकायची. मग गरम पुरण पोळीवर साजूक तूप, कच्च्या आंब्यापासून बनविलेले पन्हे किवा आमटी सोबत मस्त ताव मारायचा. मन तृप्त होईपर्यत.
Comments
Post a Comment