सुरमयी कटलेट

साहित्य :


 ४/५ मोठय़ा आकाराच्या सुरमयीच्या तुकडय़ा, हळद, २ चमचे मिरची पावडर, आले, १ लूसण, कांदा, ४/५ हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, तेल, २ बटाटे, ब्रेडक्रश, अर्धा चमचा कोकम पावडर, चवीपुरते मीठ.


कृती : 


आले, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या. २ बटाटे उकडून घ्या, सुरमयीच्या तुकडय़ा थोडय़ा वाफवून किंवा तव्यावर थोडय़ाश्या तेलामध्ये परतवून घ्या व त्याचे काटे काढून टाका. बटाटा कुस्करून घ्या. त्यात सुरमयीचे तुकडे, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर, आले-लसून पेस्ट, कोकम पावडर, ब्रेडक्रश हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या. तव्यावर थोडे तेल घाला व वरील मिश्रणाच्या वडय़ा करून त्या चांगल्या तळून घ्या. पाच मिनिटात कटलेट तयार. हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर मस्त लागतात.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची