मोटलेचे मासे

पाच बांगडे, अर्धा नारळ, एक इंच आले, एक लसणीचा कांदा, २० कोकम सोलं, १५ संकेश्वरी मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळदपूड, दोन चमचे धणे, एक चमचा बडीशेप, १५ त्रिफळे, हळदीची १० पाने, कुडय़ाची किंवा बदामाची आठ पाने, गुंडाळण्यासाठी सुतळ.


कृती-


 प्रथम संकेश्वरी सुक्या मिरच्या, धणे, बडीशेप, त्रिफळे पाण्यात भिजत ठेवावी. त्यानंतर बांगडे साफ करून तीन तुकडे करावे व त्यांना मिठ, हळद लावून ठेवावी. त्यानंतर नारळाचा खव, आले, लसूण वि भिजत ठेवलेले साहित्य मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे व ती चटणी, कोकम, बांगडे एकत्र कालवू ठेवावे.

नंतर कुडाच्या/ बदामाच्या पानांची मोठी पत्रावळ करून ठेवावी व त्यावर हळदीची पाने व्यवस्थित मांडून ठेवावीत. त्याच्यावर चटणी लावलेले बांगडे व्यवस्थित ठेवून पत्रावळ गुंडाळून सुतळीने बांधून मोटली बनवावी व ती गॅसवरील खोलगट तव्यावर ठेवून गॅस मोठा करावा. त्या तव्यावर दुसरा खोलगट तवा ठेवावा.

२० मिनिटांनी तव्यातील मोटली परतावी व पुन्हा २० मिनिटांनी गॅस बंद करावा. तवा थंड झाल्यावर मोटली बाहेर काढावी.
मोटलेचे मासे गरम तांदळाच्या भाकरीसोबत चविष्ट लागतात.


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची