टरबुजापासून बनलेली बोंडे

साहित्य :


 दोन वाट्या टरबुजाच्या पांढर्‍या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा हातावर चोळलेल्या ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या तेल.



कृती :


 प्रथम एक बाऊलमध्ये टरबुजाचा कीस घ्यावा. त्यात तिखट, मीठ, तीळ व ओवा घालावा. त्यात तांदळाची पिठी घालावी. हे मिश्रण थोडे दाट होण्यासाठी त्यात मावेल तेवढे बेसन घालावे. कढईत मंद आंचेवर तेल गरम करावे. त्यात वरील मिश्रणाची छोटी छोटी बोंडे तयार करुन तळावीत. गरम खायला द्यावीत.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची