Posts

Showing posts from May, 2018

ब्रेड पेटीस

Image
साहित्य:  1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे, 2 ब्रेड स्लाइस, तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ. आत भरण्यासाठी:  1/4 वाटी मूग डाळ, तेल, 1/4 चमचा भरडसर धणे, 1/4 चमचा भरडसर बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर, मीठ, काळं मीठ, हळद, पाणी. कृती:  ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या. ही ओली ब्रेड मॅश केलेल्या बटाट्यात टाका. तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ टाकून मळून घ्या. आता मूग डाळ, मीठ आणि हळद टाकून फक्त एक दोन उकळी घेऊन घ्या. ‍डाळ पूर्ण पणे शिजवून नका. कढईत 1 चमचा तेल गरम करून मंद आचेवर धणेपूड, बडीशेप टाकून डाळ आणि भरावनसाठी दिलेले सर्व साहित्य टाकून मिसळून घ्या. मिश्रण 3-4 मिनटापर्यंत परता. आता मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे करा. मग चपटे करून आत भरावनाचे छोटे गोळे त्यात ठेवून चारी बाजूने बंद करा. तळहाताच्या मदतीने पुन्हा गोल करा. गरम तेलात एक-एक करून तळून गोल्डन होयपर्यंत तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

चव दक्षिणेची : मीन पीरा

Image
हे बनविण्यासाठी, तुम्हाला कोणताही छोटा मासा एंकोव्ही किंवा सार्डिनची गरज भासेल. मासा स्वच्छ करा. सार्डिनचा वापर करण्यात येत असल्यास, प्रत्येक माशाचे दोन तुकडे करा. तुम्हाला खालील गोष्टीही लागतील: किसलेलं खोबरं – दोन कप आलं - 2 इंच लसूण - अंदाजे 12 पाकळ्या हिरव्या मिरच्या - 4 किंवा 5 कढीपत्त्याची पाने - थोडी हळद - ½ चमचा मेथी पूड- ½ चमचा मीथ - चवीनुसार चिंच (कोकम) - 3 किंवा 4 तुकडे खोबरेल तेल - 1 चमचा कृती :  मासा सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करा. ते चांगले एकजीव झाल्यावर, त्यात माससा घालून पुन्हा हळूवारपणे एकत्र करा. नंतर एक कप पाणी घाला. मासा शिजेपर्यंत आणि पाणी निघून जाईपर्यंत झाकण घालून मंद आचेवर शिजवा.  साभार :  श्रीमती.लेलु रॉय

आमटी टेस्टी बनविण्यासाठी टिप्स

Image
तुम्ही रोजच वरण बनवता पण याची चव काही खास नसेल तर प्रयोग करा ही पद्धत ज्याने याच्या टेस्टमध्ये नक्कीच येईल फरक  टिप्स - वरणाला शिजवताना त्यात एक चिमूट हळद आणि तूप किंवा तेलाचे काही थेंब घालावे ज्याने वरण शिजेल ही लवकर आणि त्याच्या चवीत देखील फरक येईल.  - वरण तयार करण्याअगोदर साबूत मसुरीच्या डाळीला कढईत हलकी परतून बनवली तर ती जास्त टेस्टी बनेल.  - तुरीच्या डाळीला बनवण्याआधी अर्धा तास भिजवून ठेवल्याने याची चव फारच उत्तम असते.  - डाळींना कुकराच्या बदले दुसर्‍या भांड्यांमध्ये शिजवावे. यात वेळ थोडे जास्त लागेल पण वरण फारच चविष्ट बनेल. - वरण बनवताना पाण्याची मात्रा योग्य ठेवल्याने याची टेस्टी जास्त उत्तम राहील.  - दाल फ्राई करायची असेल तर फ्राई करणार्‍या साहित्याला आधी तेलात किंवा तुपात योग्य प्रकारे परतून घ्यावे, नंतर फ्राय करावे. - मुगाच्या डाळीला कुकरामध्ये शिजवण्यापेक्षा कढईत शिजवावे, ही जास्त टेस्टी बनेल. 

कैरीचा आंबट-गोड-तिखट तक्कू

Image
साहित्य:   एक कैरी, दोन कांदे (मध्यम आकाराचे), तिखट, मीठ, गूळ, दोन चमचे तेल, अर्धा चमचा मेथी बी, अर्धा चमचा मोहरी, आवडीनुसार हिंग (चिमुटभर) कृती: १. कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या. २. या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला गूळ आणि तिखट टाकून आणि मिश्रण एकजीव करून घ्या. ३. तेल तापवून त्यात मोहरी टाका. नंतर मेथी बी तळून घ्या. हे बी लालसर झाले की हिंग टाका. ही फोडणी थोडी कोमट झाल्यावर कांदा कैरीच्या मिश्रणावर टाका. यामुळे इन्स्टन्ट रेसिपीने तुमच्या जेवणात वेगळीच चव येईल. थंड ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये हा तक्कू ४-५ दिवस आरामात टिकतो. तेव्हा नक्की ट्राय करा.

उन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे

Image
साहित्य:-  छोटे-छोटे कांदे १०, मोहरी डाळ अर्धी वाटी, तेल १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा प्रत्येकी १ चमचा, कैरी किस अर्धी वाटी, चिमूटभर साखर. कृती:-  कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा, गॅसवर पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरड्या बरणीत लोणचे भरून दादरा बांधा.  टीप:- या लोणच्यात गूळ किवा साखर व कैरी किस थोडा जास्त घातल्यास छान आंबट-गोड लोणचे तयार होईल.

शेव-टोमॅटो भाजी

Image
जेवायला पटकन काही कालवण तयार करायचा असेल तर याहून सोपा पदार्थ नसेल कदाचित... सामुग्री:  1 वाटी शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे. कृती:  एका कढईत फोडणी करता तेल गरम करून त्यात मोहर्‍या टाका. तडतडल्यावर मिरच्या, कांदा घालून परता. गोल्डन झाल्यावर टोमॅटो टाका. परतून हळद, तिखट, धणेपूड, मीठ टाकून परतून घ्या. चार वाट्या गरम पाणी घालून उकळून घ्या. उकळू लागले की त्यात शेव टाकून गॅस बंद करा. चवी प्रमाणे कोथिंबीर घालू शकता. विशेष:  सर्व्ह करण्याची तयारी असल्यावरच शेव घाला. शेव लसणाची किंवा लवंगांची असल्यास चव छान येते.तसेच पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येऊ शकतं.

चव दक्षिणेची : मीन पीरा

Image
हे बनविण्यासाठी, तुम्हाला कोणताही छोटा मासा एंकोव्ही किंवा सार्डिनची गरज भासेल. मासा स्वच्छ करा. सार्डिनचा वापर करण्यात येत असल्यास, प्रत्येक माशाचे दोन तुकडे करा. तुम्हाला खालील गोष्टीही लागतील: किसलेलं खोबरं – दोन कप आलं - 2 इंच लसूण - अंदाजे 12 पाकळ्या हिरव्या मिरच्या - 4 किंवा 5 कढीपत्त्याची पाने - थोडी हळद - ½ चमचा मेथी पूड- ½ चमचा मीथ - चवीनुसार चिंच (कोकम) - 3 किंवा 4 तुकडे खोबरेल तेल - 1 चमचा कृती :  मासा सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करा. ते चांगले एकजीव झाल्यावर, त्यात माससा घालून पुन्हा हळूवारपणे एकत्र करा. नंतर एक कप पाणी घाला. मासा शिजेपर्यंत आणि पाणी निघून जाईपर्यंत झाकण घालून मंद आचेवर शिजवा. साभार :  श्रीमती.लेलु रॉय

देशी मुर्ग प्याजी

साहित्य :  1 किलो देशी चिकन, 1/2 किलो कांदे चिरलेले, 2-3 लसूण पाकळ्या, 1 कप टोमॅटो बारीक चिरलेले, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, 2 बटाटे कापलेले, 1 लहान तुकडा दालचिनी, 3-4 वेलची, 3-4 लवंगा, 2 तेजपान, 3 मोठो चमचे तेल. कृती :  सर्वप्रथम वेलची, लवंगा आणि दालचिनी यांचे पेस्ट तयार करावे. चिकनमध्ये चिरलेल्या कांद्यापैकी अर्धे मिक्स करावे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा अर्ध्या मिसळाव्या. टोमॅटो घालावे, 1/2 चमचा तिखट, जिरं आणि हळद घालावे. मीठ आणि 1 चमचा तेल लावून 2 तासासाठी मेरीनेट करावे. कढईत तेल गरम करत ठेवावे. उरलेलं जिरं घालून कांदा व लसुण परतून घ्यावे. तिखट घालून 1 मिनिट परतावे. मेरीनेट चिकन आणि बटाटे टाकावे. 5 मिनिट शिजल्यावर 1/2 वाटी पाणी घालून कमी आचेवर शिजू द्या. सर्व्ह करताना गरम मसाला वरून घालावे.

शेंगा फ्राय - व्हेज मासे

Image
साहित्य :  ८ ते १० शेवग्याच्या शेंगा, १ चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण यांची दोन चमचे पेस्ट, दोन चमचे चिंचेचा कोळ, एक वाटीभर तेल, एक वाटी चणादाळीचे पीठ. कृती :  सर्व प्रथम शेंगा लहान तुकडे करुन उकडून घ्याव्यात. (शेंगाचे तुकडे जास्त शिजवू नये) तुकडे थंड झाल्यावर दोन उभे काप करावेत. त्यावर हळद, तिखट, मीठ, हिरवे वाटण लावून दहा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर भज्यांसाठी पातळ पीठ करतो त्याप्रमाणे चनादाळीचे पीठ भिजवावे. या पीठात मसाल्यात ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा बुडवून कढईत तळाव्यात. थोडे कुरकुरीत होईपर्यंत तळण असावे. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो. व्हेज मासे म्हणूनही त्याची चव घेता येते. तळून झाल्यानंतर डीश सजवतांना त्यावर गाजर किसून घालावे.

चिकन मसाला

Image
साहित्य :  ५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ. कृती :  प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकावे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून किमान दोन तास ठेवावे. नंतर कढईत तेल टाकून गरम करावे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकून गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेले चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घ्यावे. झटपट चिकन तात्काळ तयार होईल.

वरुत्तारच्च चिकन करी

Image
सामग्री कोंबडी - ½ किग्रॅम (बोनलेस) खोबरं (किसलेलं) - 1 कप आलं - 1 इंच लांब तुकडे लसूण - 6 हिरवी मिरची - 6 खोबरेल तेल   छोटे कांदे - 1 कप मोठे कांदे - 1 टॉमेटो - 1 लाल तिखट - 1 चमचा हळद - ½ चमचा धणे पूड - 2 चमचे गरम मसाला - ½ चमचा कढीपत्त्याची पाने मीठ कृती भांड्यात दोन चमचे तेल गरम करा आणि किसलेलं खोबरं भाजून घ्या. त्यात धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद घाला आणि चांगले परता. मिश्रणाचा रंग तपकिरी झाल्यावर त्याची पेस्ट बनवा आणि बाजूला ठेवा. आता एक भांडे घ्या आणि थोडे तेल गरम करा. त्यात थोडी कढीपत्त्याची पाने घाला. त्यात, छोटे कांदे, आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचे मिश्रण घाला. थोडा वेळ भाजा. आता कोंबडीचे तुकडे आणि मीठ घालून परता. दोन कप पाणी घाला. सावकाशपणे ढवळा. भांड्यावर झाकण घालून काही वेळ शिजू द्या. भांडे उघडा आणि त्यात मोठे कांदे आणि टोमॅटो घाला. अजून थोडे पाणी घाला. आता भांडे झाकून ठेवा आणि वीस मिनिटे शिजवा. तुम्ही आता झाकण काढू शकता आणि बाजूला दळून ठेवलेला मसाला त्यात घाला. अजून थोडे पाणी घाला. व्यवस्थित ढवळा. थोडी कढीपत्त्याची पाने घाला आणि अ...

अवधी मटण कोरमा

Image
साहित्य :  750 ग्रॅम बोनलेस मटण, 100 मिली तेल, 300 ग्रॅम बारीक कापलेला कांदा, 25 ग्रॅम आलं लसूण पेस्ट, दोन ग्रॅम वेलची, दोन ग्रॅम लवंगा, एक ग्रॅम कलमी, एक चमचा तिखट, पाच ग्रॅम जावीतरी, 100 ग्रॅम दही, 50 ग्रॅम काजू पेस्ट, 25 ग्रॅम सनफ्लॉवर सीड, 25 ग्रॅम कोकोनट पेस्ट, 5 ग्रॅम काळेमिरे पूड चवीनुसार मीठ.  कृती :  सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा (200 ग्रॅम) घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात मटण, आलं लसूण पेस्ट घालून चांगले परतून त्यात 200 मिली पाणी घालावे. कलमी, वेलची, लवंगा, तिखट, जावीतरी पूड आणि मीठ घालावे. बाकी उरलेले कांदे घालून झाकण ठेवावे. कमी आचेवर 20 मिनिट शिजवावे. नंतर झाकण काढून घ्यावे व तेल सोडेपर्यंत शिजवावे. आता दह्याला फेटून त्यात घालावे व काही मिनिट शिजवावे. जेव्हा मीट नरम होईल आणि ग्रेवी घट्ट होईल तेव्हा बाकी साहित्य घालून चांगल्या प्रकारे हालवावे. आता या अवधी मटणाला कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

भावनगरी शेव भाजी

Image
साहित्य :  १०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमाचा गरम मसाला, दान चमचे तेल, हळद, मीठ, हिंग व राई गरजेप्रमाणे. कृती :  प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालून कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यावा. आता त्यात भावनगरी शेव घालून चांगली हलवून घ्यावी. शेवटी थोड्या पाण्याचा हबका मारून हलकी वाफ काढावी. चवीला थोडी साखर व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. ही भाजी गरम गरम असताना त्यावर दही घालूनही खाता येते.

टरबुजापासून बनलेली बोंडे

Image
साहित्य :  दोन वाट्या टरबुजाच्या पांढर्‍या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा हातावर चोळलेल्या ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या तेल. कृती :  प्रथम एक बाऊलमध्ये टरबुजाचा कीस घ्यावा. त्यात तिखट, मीठ, तीळ व ओवा घालावा. त्यात तांदळाची पिठी घालावी. हे मिश्रण थोडे दाट होण्यासाठी त्यात मावेल तेवढे बेसन घालावे. कढईत मंद आंचेवर तेल गरम करावे. त्यात वरील मिश्रणाची छोटी छोटी बोंडे तयार करुन तळावीत. गरम खायला द्यावीत.