शेंगा फ्राय - व्हेज मासे

साहित्य : 


८ ते १० शेवग्याच्या शेंगा, १ चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण यांची दोन चमचे पेस्ट, दोन चमचे चिंचेचा कोळ, एक वाटीभर तेल, एक वाटी चणादाळीचे पीठ.


कृती : 


सर्व प्रथम शेंगा लहान तुकडे करुन उकडून घ्याव्यात. (शेंगाचे तुकडे जास्त शिजवू नये) तुकडे थंड झाल्यावर दोन उभे काप करावेत. त्यावर हळद, तिखट, मीठ, हिरवे वाटण लावून दहा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर भज्यांसाठी पातळ पीठ करतो त्याप्रमाणे चनादाळीचे पीठ भिजवावे. या पीठात मसाल्यात ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा बुडवून कढईत तळाव्यात. थोडे कुरकुरीत होईपर्यंत तळण असावे. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो. व्हेज मासे म्हणूनही त्याची चव घेता येते. तळून झाल्यानंतर डीश सजवतांना त्यावर गाजर किसून घालावे.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची