नूडल्स टिक्की

साहित्य-


1 पॅकेट नूडल्स, 2 उकळलेले बटाटे, एक चिरलेला कांदा, एक उकळून किसलेला गाजर, 2 ब्रेड स्लाइसचे क्रम्स, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ, तेल.


कृती- 


नूडल्स उकळून घ्या. एका वाडग्यात बटाटे किसून घ्या, यात नूडल्स, गाजर आणि ब्रेड क्रम्स टाकून मॅश करून घ्या. यात मीठ, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला आणि कोथिंबीर टाका. ‍मिश्रण एकजीव करून त्याचे लहान गोळे करून टिक्कीचा आकार द्या. आवडीप्रमाणे शॅलो फ्राय किंवा डिप फ्राय करा. तयार टिक्की चाट मसाला भुरभुरुन सॉससोबत सर्व्ह करा.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची