आंध्रची बिर्यानी

साहित्य :


 एक किलो बासमती तांदुळ, 1 किलो चिकन, 250 ग्रॅम तेल, अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 1 कप दही, 10-15 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, 5-5 ग्रॅम इलाटची व लवंगा, 1 मोठा चमचा आलं-लसणाची पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.


कृती : 


तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या, वेलची, कलमी आणि लवंगा टाकून एकजीव करावे. कांदे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यात लसण-आल्याची पेस्ट व टोमॅटो टाकून सर्व साहित्य परतून काढावे. 
चिकनचे तुकडे दही व मीठ टाकावे. चिकनला शिजू द्या. त्यानंतर त्यात तांदुळ टाकून 2 लीटर पाणी घालावे व शिजू द्यावे.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची