कांदा रस्सा भाजी

साहित्य:- 


लहान कांदे (डोर्ली कांदे) १०, कोथिबीर २ चमचे, हिरवी मिरची तुकडे अर्धा चमचा, खोबरा किस २ चमचे, तीळ, शेंगदाणे, धने प्रत्येकी १ चमचा, लसून पाकळ्या ६, अद्रक पेस्ट अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, आमचूर अर्धा चमचा, तेल २ डाव, तिखट, हळद, मीठ, चवीनुसार फोडणीचे साहित्य, गुळाचा खडा, गरम मसाला अर्धा चमचा, मेथीदाणा अर्धा चमचा.



कृती:- 


खोबरा किस, तीळ, धने, शेंगदाणे भाजून मिक्सीतून बारीक वाटा, नंतर लसून वाटा. यात जिरेपूड, आमचूर, अद्रक पेस्ट, तिखट, मीठ, हळद टाकून एकत्र कालवा. कांद्यांना चार चिरे देऊन त्यात वाटण भरा. गॅसवर पातेल्यात गरम तेलात मोहरी तडतडल्यावर मेथी दाणा घाला. कांदे तेलात छान परता. नंतर थोडं थोडं पाणी घालून ग्रॅव्हित कांदे शिजू द्या. शिजल्यावर गरम मसाला व कोथिबीर टाकून सर्व्ह करा.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची