Posts

Showing posts from August, 2018

अळूची पातळ भाजी

Image
साहित्य:  अळू, हरभरे डाळ, शेंगदाणे, खोबरे, मेथी, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, हिंग, मोहरी, काळा मसाला. कृती:  हरभरा डाळ, शेंगदाणे भिजत घालून उकडून घवेत. अळू बारीक चिरून निथळून शिजवून घोटून घ्यावे. खोबरे किसावे, तेल गरम करून हिंग, मोहरी, मीठ, गूळ अळू, काळा मसाला, हरभरे डाळ, शेंगदाणे, मेथी, तिखट, चिंचेचा कोळ, खोबरे घालून उकळवावा.

काजू मलई करी

Image
साहित्य:  क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ.  कृती:  टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

साबुदाणा खिचडी : मायक्रोव्हेव मधील

Image
साहित्य :  ३ वाटी भीजलेला साबुदाणा, पाऊण वाटी दाण्याचे कुट, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ चमच जीरे, २ चमचे तुप, मीठ साख र चवीप्रमाणे, कोथींबीर. कृती :  सर्वप्रथम मायक्रोमध्ये तुप घालून त्यात जीरे व मिरच्या घालून २ मिनीट हाय पॉवर वर ठेवावे. साबुदाणा, कुट, मीठ, साखर एकत्र करून ३ मिनीटे द्यावी. कोथींबीर घालून खाण्यास तयार साबुदाणा खिचडी.

मटण चाप

Image
साहित्य :  ६ मटण चाप, २ अंडी, अर्धी वाटी रवा, आले, लसून, कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, तेल, हळद, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ. कृती :  प्रथम चाप हळद मीठ लावून वाफवून घेणे. आले, लसून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घेणे. चापला पेस्ट लावून साधारण एक तास ठेवणे. नंतर एका बाऊलमध्ये अंडी फेसून घेणे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालणे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करा. एक-एक चाप तिखट मिक्स केलेला रवा व फेसलेल्या अंडय़ामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्या. कुरकुरीत आणि गरमागरम मटण चाप सव्‍‌र्ह करा.

कॉर्न टोमॅटो ऑम्लेट

Image
साहित्य :  दोन ते तीन मक्याची कणसे, दोन टोमॅटो, एक ते दोन वाट्या डाळीचे पीठ, दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे जिरेपूड, दोन चमचे बडीशेप पूड, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल.  कृती :  कणसाचे दाणे काढून मिक्सरमधून वाटून घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. नंतर कणसाची पेस्ट, टोमॅटो पेस्ट, डाळीचे पीठ, हिरवी मिरची पेस्ट, बडीशेप, जिरेपूड, मीठ, कोथिंबीर घालून पीठ धिरड्यासाठी भिजवतो तसे जाडसर भिजवावे.

मसालेदार गवार

Image
साहित्य :  गवार, कांदे, आले, लसूण, धने, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, खसखस, शेंगदाणे, मोहरी, हिंग. कृती :  गवार धुऊन त्याच्या शिरा काढून पाण्यात हळद मीठ घालून उकळून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, हिंग, कांदा, पेस्ट, धने, जिरे पावडर, गवार, तिखट, गरम मसाला, मीठ, खसखस, शेंगदाणचे कूट घालून शिजवावी.

कॉर्न टोमॅटो ऑम्लेट

Image
साहित्य :   दोन ते तीन मक्याची कणसे, दोन टोमॅटो, एक ते दोन वाट्या डाळीचे पीठ, दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे जिरेपूड, दोन चमचे बडीशेप पूड, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल.  कृती :  कणसाचे दाणे काढून मिक्सरमधून वाटून घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. नंतर कणसाची पेस्ट, टोमॅटो पेस्ट, डाळीचे पीठ, हिरवी मिरची पेस्ट, बडीशेप, जिरेपूड, मीठ, कोथिंबीर घालून पीठ धिरड्यासाठी भिजवतो तसे जाडसर भिजवावे.