अळूची पातळ भाजी
साहित्य:
अळू, हरभरे डाळ, शेंगदाणे, खोबरे, मेथी, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, हिंग, मोहरी, काळा मसाला.
कृती:
हरभरा डाळ, शेंगदाणे भिजत घालून उकडून घवेत. अळू बारीक चिरून निथळून शिजवून घोटून घ्यावे. खोबरे किसावे, तेल गरम करून हिंग, मोहरी, मीठ, गूळ अळू, काळा मसाला, हरभरे डाळ, शेंगदाणे, मेथी, तिखट, चिंचेचा कोळ, खोबरे घालून उकळवावा.
Comments
Post a Comment