स्वादिष्ट मेथीचे मुठीए


साहित्य : 

एक मेथीची जुडी, धणे, जिरे, ओवा, बडीशेप, खसखस अंदाजे भाजून, जाडसर पूड, तीळ, चिचेचा कोळ, गूळ, हि. मिरच्या ३ व लसूण पाकळ्या २/३ वाटून, अर्धी वाटी रवा, बेसन, चिमूटभर सोडा, तळण्यासाठी तेल.

कृती :

 भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत व स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात कुटले की मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. रवा व बेसन पीठ एकत्र करावे. त्यात सोडा व तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ हाताने चोळून घ्यावे. मग भाजीचे मिश्रण व पीठ एकत्र करावे व घट्ट भिजवावे. पाणी घालू नये. भाजीत बसेल एवढे बेसन घालावे. चांगले मळून घेऊन लांबट गोळे करून मंद गॅसवर लालसर होईपर्यंत तळावे. या साहित्यात मेथी मुठिया प्रमाणेच कोबी, दुधी, गाजर अशा भाज्या किसून घालूनही मुठिया छान होतात.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची