चिकन सींक : मायक्रोवेव्ह स्पेशल
500 ग्रॅम बोनलेस चिकन धुवून स्वच्छ केलेले, 8-10 चिकन सींक, 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस, 1 लहान चमचा पांढरा सिरका, 1 मोठा चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोर, 1 अंडा, चवीनुसार मिरे पूड व मीठ, 1 मोठा चमचा बटर आणि मस्टर्ड सॉस.
कृती :
एका भांड्यात टोमॅटो व चिली सॉस, सिरका, अंडा, मीठ व काळे मिरे आणि कॉर्नफ्लोर टाकून फेटून घ्यावे. यात चिकन मेरीनेट करण्यासाठी ठेवावे. एक तासानंतर चिकनला चिकन सींकमध्ये लावावे. बटरने ब्रशिंग करावे. प्रत्येक सींकला ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये सोनेरी होईपर्यंत शेकावे. जर सींक नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालून चांगले भाजावे. लाकड्याची सींकमध्ये लावून मस्टर्ड सॉस किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment