Posts

Showing posts from November, 2019

कैरीची खमंग डाळ

साहित्य :  दोन वाट्या चण्याची डाळ, कैरीचा कीस अंदाजे पाव वाटी, पाच-सहा ओल्या मिरच्या, तीन-चार सुक्या मिरच्या, मीठ, साखर, कढीलिंब, ओले किंवा सुके खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य. कृती :  कैरीची डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी. नंतर ती मिक्सरमधून अर्धवट बारीक करावी. अर्धी वाटी तेलाची सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून खमंग फोडणी करावी. डाळीत ओल्या मिरच्या वाटून, मीठ, साखर, कैरीचा कीस व ओले खोबरे किंवा खोबर्याचा कीस हे सर्व जिन्नस घालून वर फोडणी घालावी व चांगले कालवावे.

मॅक्सिकन भेळ

Image
साहित्य :  1 कप मका आटा, 1/2 कप मैदा, 1 चमचा तेल, 1/2 चमचा मीठ, तेल. इतर लागणारे साहित्य :  1 टोमॅटो, 1 मोठा कांदा, 1 उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर,1/4 कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी स्वादानुसार, मीठ, तिखट व जिरे पूड. कृती :  टाको तयार करण्यासाठी मक्याच्या कणकेत मैदा आणि मीठ मिसळावे. यात तेल व आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून कणीक भिजवावी. या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये कापून तळून घ्यावे. कांदा, टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घ्यावे. एका मोठ्या बाउलमध्ये टाकोला हाताने कु्स्करून त्यात टाकावे व बाकी उरलेले सर्व साहित्य घालून लगेचच सर्व्ह करावे. ही मॅक्सिकन भेळ खाण्यात फारच रुचकर लागते.

चटपटीत भुट्टयाची भजी

Image
साहित्य:  नरम भुट्टे 1 किलो, दिड कप बेसन, 1 शिमला मिरची, 1 कांदा ( बारीक चिरलेला), 1 चमचा आले-हिरवी मिरची पेस्ट, चिमूटभर हींग, एक चमचा बडीशेप, मीठ आणि तेल. कृती:  सर्वात आधी भुट्टे किसून घ्या. यात बेसन, चिरलेल्या भाज्या, मीठ, आले-‍ मिरची पेस्ट, हींग आणि बडी शेप टाकून मिश्रण तयार करा. आता कढईत तेल गरम करा. या मिश्रणाची भजी टाकून गोल्डन होयपर्यंत तळा. किचनपेपर वर काढा. सॉस किंवा चटणीसोबत गरम- गरम भजी सर्व्ह करा.

संक्रांत विशेष : भोगीची भाजी

Image
साहित्य :  २-३ पातीचे कांदे, एक गाजर, एक बटाटा, २-३ वांगी, अर्धी-पाऊण वाटी सोलाणे, थोडेसे मटाराचे दाणे, वालपापडीच्या (ऊसावरच्या) शेंगा, शेपु, लसणीची पात,कांद्याची पात, एखादा मुळ्याचा तुकडा, २-४ फ्लॉवरचे तुरे, तीळाचं जाडसर कुट, मोहरी, धण्याची पुड, हळद, तिखट, गोडा मसाला किंवा काळा मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, गुऴ. विधी :  सर्वप्रथम पातीचा कांदा उभा चिरून घ्यावा. सगळ्या भाज्या चिरून-निवडून घ्याव्यात. कढईत हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यायचा. चिरलेल्या भाज्या -पात फोडणीत घालून त्यात मीठ मसाला आणि तिळाचं कुट घालून वाफ आणायची. आवडत असल्यास थोडा गुळ घालायचा.