संक्रांत विशेष : भोगीची भाजी

साहित्य : 

२-३ पातीचे कांदे, एक गाजर, एक बटाटा, २-३ वांगी, अर्धी-पाऊण वाटी सोलाणे, थोडेसे मटाराचे दाणे, वालपापडीच्या (ऊसावरच्या) शेंगा, शेपु, लसणीची पात,कांद्याची पात, एखादा मुळ्याचा तुकडा, २-४ फ्लॉवरचे तुरे, तीळाचं जाडसर कुट, मोहरी, धण्याची पुड, हळद, तिखट, गोडा मसाला किंवा काळा मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, गुऴ.

विधी : 

सर्वप्रथम पातीचा कांदा उभा चिरून घ्यावा. सगळ्या भाज्या चिरून-निवडून घ्याव्यात. कढईत हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यायचा. चिरलेल्या भाज्या -पात फोडणीत घालून त्यात मीठ मसाला आणि तिळाचं कुट घालून वाफ आणायची. आवडत असल्यास थोडा गुळ घालायचा.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची