कुळीथ पिठले

कुळीथ पिठले - [Kulith Pithale] रात्रीच्या जेवणात उत्तम असे मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.

जिन्नस


    अर्धी वाटी कुळीथ पीठ


    ८-१० कढिलिंबाची पाने


    ३-४ हिरव्या मिरच्या


    अर्धा चमच मीठ


    कोथिंबीर


    २ आमसुले


    २ पळ्या तेल


    फोडणीचे साहित्य

पाककृती


तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.

त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.

कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे.

उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.


Comments

Popular posts from this blog

कैरीची खमंग डाळ

चटपटीत भुट्टयाची भजी

मॅक्सिकन भेळ