Posts

Showing posts from March, 2018

पोष्टीक मेथीदाणे

Image
साहित्य :  200 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल. कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावे. या मिश्रणात मग मोड आलेले मेथीदाणे टाकून त्यावर झाकण ठेवावे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोळी सोबत सर्व्ह करावे.

दम आलू (काश्मिरी)

Image
साहित्य :-  बारीक म्हणजे छोटे बटाटे १०/१२, अर्धी वाटी चिरलेली सफरचंद (सफरचंद चिरल्यावर त्याला लिंबाचा रस चोळावा म्हणजे काळे पडत नाही), अर्धी वाटी अननसाचे तुकडे, अर्धी वाटी द्राक्षे, काजू ५-६, मीठ स्वादानुसार, तिखट अर्धा चमचा, हिरवी मिरची ठेचा पाव चमचा,चार टीस्पून तूप, एक चमचा गरममसाला, दुध.  ग्रेव्ही साहित्य :-  एक चिरलेला टोमॅटो, पाच भिजवलेले काजू, एक डावभर ओले खोबरे, दोन-तीन चमचे भिजवलेले खसखस, पाव चमचा आलेकिस. कृती :-  बटाटे प्रथम उकडून घ्यावेत. नंतर सोलून थोडे तूप टाकून लालसर परतून घ्यावेत. थोडी हळद, तिखट, मीठ, मिरचीचा ठेचा, गरम मसाला सर्व घालावे. एक चिरलेला टोमॅटो, ५ भिजवलेले काजू, १ डावभर ओले खोबरे, २-३ चमचे भिजवलेले खसखस, पाव चमचा आलेकिस हे सर्व मिक्सरमधून काढावे. ही झाली ग्रेव्ही. थोडी ग्रेव्ही बटाट्यावर घालून परतावी. राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये दुध घालावे. नंतर त्यात वरील सर्व फळे घालून बटाट्यांना टोचे मारावेत. गरमागरम काश्मिरी दम आलू रोटीबरोबर खायला द्यावेत.

वरुत्तारच्च चिकन करी

Image
सामग्री कोंबडी - ½ किग्रॅम (बोनलेस) खोबरं (किसलेलं) - 1 कप आलं - 1 इंच लांब तुकडे लसूण - 6 हिरवी मिरची - 6 खोबरेल तेल   छोटे कांदे - 1 कप मोठे कांदे - 1 टॉमेटो - 1 लाल तिखट - 1 चमचा हळद - ½ चमचा धणे पूड - 2 चमचे गरम मसाला - ½ चमचा कढीपत्त्याची पाने मीठ कृती भांड्यात दोन चमचे तेल गरम करा आणि किसलेलं खोबरं भाजून घ्या. त्यात धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद घाला आणि चांगले परता. मिश्रणाचा रंग तपकिरी झाल्यावर त्याची पेस्ट बनवा आणि बाजूला ठेवा. आता एक भांडे घ्या आणि थोडे तेल गरम करा. त्यात थोडी कढीपत्त्याची पाने घाला. त्यात, छोटे कांदे, आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचे मिश्रण घाला. थोडा वेळ भाजा. आता कोंबडीचे तुकडे आणि मीठ घालून परता. दोन कप पाणी घाला. सावकाशपणे ढवळा. भांड्यावर झाकण घालून काही वेळ शिजू द्या. भांडे उघडा आणि त्यात मोठे कांदे आणि टोमॅटो घाला. अजून थोडे पाणी घाला. आता भांडे झाकून ठेवा आणि वीस मिनिटे शिजवा. तुम्ही आता झाकण काढू शकता आणि बाजूला दळून ठेवलेला मसाला त्यात घाला. अजून थोडे पाणी घाला. व्यवस्थित ढवळा. थोडी कढीपत्त्याची पाने घाला आणि अ...

Summer Special : आंबट-गोड कैरीचा भात

Image
 साहित्य:  २ वाट्या जुना तांदूळ, ४ सुक्या लाल मिरच्या, २ चमचे उडीद डाळ, १ चमचा हरबरा डाळ, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, पाव वाटी पुदिना पान, ३ चमचे कैरीचा कीस, कढीलिंब, कोथिंबीर, जीर, मोहरी, हळद, साखर, हिंग, मीठ, तेल. कृती:  सर्वप्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवावेत नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवावे व त्यात जिरे-हिंग, कढीलिंब घालून फोडणी करावी. नंतर त्यात तांदूळ आणि मीठ घालून परतावं. अडीच वाट्या गरम पाणी घालून मऊ, मोकळा भात शिजवावा. भातामध्ये हळद घालू नये. पुदिना पान आणि थोडी कोथिंबीर एकत्र करून वाटून घ्यावी. भात मोकळा करून थंड होण्यास ठेवावा. भात थंड झाल्यावर त्यावर कैरीचा कीस, वाटलेला पुदिना आणि चवीला साखर घालावी. कढईमध्ये तीन चमचे तेलाची मोहरी, कढीलिंब, हळद, शेंगदाणे घालून फोडणी करावी. ही फोडणी भातावर घालावी. भात नीट मिसळून घ्यावा. आंबट-गोड चवीचा हा भात पुन्हा गरम करू नये.

उन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे

Image
साहित्य:-  छोटे-छोटे कांदे १०, मोहरी डाळ अर्धी वाटी, तेल १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा प्रत्येकी १ चमचा, कैरी किस अर्धी वाटी, चिमूटभर साखर.  कृती:-  कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा, गॅसवर पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरड्या बरणीत लोणचे भरून दादरा बांधा. टीप:- या लोणच्यात गूळ किवा साखर व कैरी किस थोडा जास्त घातल्यास छान आंबट-गोड लोणचे तयार होईल.

बटाटा मेथी

Image
साहित्य :  4 जुडी निवडलेली मेथी, 8 पाकळ्या लसूण, 2 कापलेले कांदे, 1 तुकडा आलं बारीक काप केलेला, 1/2 चमचा हळद, 4 मोठे चमचे तेल, 4 बटाटे उकळून सोलून त्याचे काप करावे, 1/2 चमचा मोहरी, 4 टोमॅटो चिरलेले, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ. कृती :  सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा, लसूण, आलं व हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे. हळद, तिखट, मीठ टाकून 2 मिनिट परतून घ्यावे. नंतर टोमॅटो व मेथी घालावी, 5 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. ही भाजी परोठे सोबत सर्व्ह करावी.

देशी मुर्ग प्याजी

Image
साहित्य :  1 किलो देशी चिकन, 1/2 किलो कांदे चिरलेले, 2-3 लसूण पाकळ्या, 1 कप टोमॅटो बारीक चिरलेले, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, 2 बटाटे कापलेले, 1 लहान तुकडा दालचिनी, 3-4 वेलची, 3-4 लवंगा, 2 तेजपान, 3 मोठो चमचे तेल.  कृती :  सर्वप्रथम वेलची, लवंगा आणि दालचिनी यांचे पेस्ट तयार करावे. चिकनमध्ये चिरलेल्या कांद्यापैकी अर्धे मिक्स करावे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा अर्ध्या मिसळाव्या. टोमॅटो घालावे, 1/2 चमचा तिखट, जिरं आणि हळद घालावे. मीठ आणि 1 चमचा तेल लावून 2 तासासाठी मेरीनेट करावे. कढईत तेल गरम करत ठेवावे. उरलेलं जिरं घालून कांदा व लसुण परतून घ्यावे. तिखट घालून 1 मिनिट परतावे. मेरीनेट चिकन आणि बटाटे टाकावे. 5 मिनिट शिजल्यावर 1/2 वाटी पाणी घालून कमी आचेवर शिजू द्या. सर्व्ह करताना गरम मसाला वरून घालावे.

कच्ची केळीचे भजे

Image
सामग्री-  आर्धा डझन कच्ची केळी, 200 ग्रॅम हरभर्‍याच्या डाळीचे पीठ, गरम मसाला, मीठ, तिखट, हळद पूड, शोफ, एक कांदा, 3-4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या व तेल.  कुती -  कच्ची केळी वाफवून घ्या. त्यानंतर त्यावरील सालटे काढून त्याच्या स्लाइड तयार करा. हरभर्‍याच्या डाळीचे पीठ पाण्यात भिजवून घ्या. त्यात केळीच्या चकत्या, कापलेली इतर साम्रगी व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. तेल गरम करण्यासाठी ठेवा व तेल गरम होताच आच मंद करून भजे राखाड्या रंगाचे होइस्तर तळा. सकाळच्या सोबत किंवा रिमझिम पडणार्‍या पावसात गरमागरम कच्ची केळीची भजे खायला मज्जा येते. त्यासोबत चाट मसाल्याचा वापर करा.

राखी स्पेशल : खोबर्‍याची बर्फी

Image
साहित्य:  2 वाट्या सुकलेल्या खोबर्‍याचा किंवा ओल्या नारळाचा किस, 2 वाटी साखर, 1 वाटी साजूक तूप, 2 वाटी खवा, वेलची पुड, चिमूटभर मीठ सजावटीसाठी काजू, बदामचे तुकडे आणि बेदाणे.  कृती:  प्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका भांड्यात काढून घ्या. नंतर मंद आचेवर कढईत खवा भाजून घ्या. खव्याला हलकासा खरपूस रंग आला की त्यात साखर मिसळून ते मिश्रण एकजीव होईपर्यंत भाजा. त्यात वेलची पूड आणि चवी पुरते मीठ घाला. आता त्या मिश्रणात भाजेलेल्या खोबर्‍याचा किस मिसळून ते मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करुन एका मोठ्या ताटास तुपाचा हात लावून त्यात ते मिश्रण ओतून समांतर थापून घ्या. आता त्यावर सजावटीसाठी वरुन काजू, बदामाचे तुकडे आणि बेदाणे पसरवा हलक्या हाताने थापून घ्या. थंड झाल्यावर त्याचे एकसारखे तुकडे करा.  

Momos : आपल्या पसंतीचे मोमोज!

Image
मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. वेज-मोमोज बनविते वेळी कोणतीही भाजी बारिक करून त्याला शिजवून घ्यायची . नंतर त्यात कांदा, टमाटर स्वादानुसार मीठ, कोथींबीर घालून त्याला चांगले मिक्स करायचे आणि हे सारण मैद्याच्या बनविलेल्या छोटया चपटया गोळयात घालून वरील दिलेल्या माहितीनूसार उकडीचे किंवा फ्राईड वेज मोमोज तयार. आतले सारण हे पनीर, चीजही टाकून बनविता येते. नॉन-वेज मोमोजमध्ये चिकन किंवा मटन उकडून त्याचा खिमा करून त्यात गरम मसाला (मिरे, कलमी, मोठी वेलची, जायफळ, शाहजीरे याला भाजून बारीक करणे), कांदा, लसून, अदरक, मिर्ची, टमाटर, कोथींबीर स्वादानुसार मीठ या सगळयांचे मिश्रण करून मैद्याच्या केलेल्या गोळयात याचे सारण भरले जाते. यालाही हवे तसे उकडीचे किंवा फ्राईड आवडीनूसार करून खाता येते. चटणी मोमोज चटणी ही तोंडाला आणि डोळयांनाही पाणी आणणारी असते. जेवढी चटणी करायची, तेवढे टमाटर, कोथींबीर, हिरवी मिर्ची, लाल तिखट, भाजलेले जिरे बारीक वाटून घेण...

सुरमयी कटलेट

Image
साहित्य :  ४/५ मोठय़ा आकाराच्या सुरमयीच्या तुकडय़ा, हळद, २ चमचे मिरची पावडर, आले, १ लूसण, कांदा, ४/५ हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, तेल, २ बटाटे, ब्रेडक्रश, अर्धा चमचा कोकम पावडर, चवीपुरते मीठ. कृती :  आले, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या. २ बटाटे उकडून घ्या, सुरमयीच्या तुकडय़ा थोडय़ा वाफवून किंवा तव्यावर थोडय़ाश्या तेलामध्ये परतवून घ्या व त्याचे काटे काढून टाका. बटाटा कुस्करून घ्या. त्यात सुरमयीचे तुकडे, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर, आले-लसून पेस्ट, कोकम पावडर, ब्रेडक्रश हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या. तव्यावर थोडे तेल घाला व वरील मिश्रणाच्या वडय़ा करून त्या चांगल्या तळून घ्या. पाच मिनिटात कटलेट तयार. हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर मस्त लागतात.

शेवगा सूप

Image
साहित्य :  5-6 कोवळ शेवगच्या शेंगा, अर्धी वाटी शेवग्याची कोवळी पाने, 4.5 लसूण पाकळ्या, आलचा तुकडा, एक चमचा तांदूळपिठी, मीठ, दोन वाट्या गोड ताक. कृती :   आले, लसूण, कोथिंबीर एकत्र बारीक वाटावे. शेंगा सोलून तचे तुकडे करावेत. कोवळी पाने, शेंगा वेगवेगळे उकडून घवे. शेवगची पाने तांदूळ पिठी, ताक, मीठ, चिमूटभर साखर सर्व एकत्र करून मिक्सरमधून फिरवावे. एक चमचा तुपाची जिरे घालून फोडणी करावी. ताकात घालावी. शेंगा घालून सूप चांगले उकळावे. गरम सूप पौष्टिक असून चवदार लागते.

पुरण पोळी

Image
साहित्य-  एक किलो हरभर्‍याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.  कृती :  हरभर्‍याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी. गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी. गॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो. डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर, ‍मीरपूड घालावी. मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे. कणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे. पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. चमच्याने साजूक तूप सोडून दोन्ही बाजूने पोळी शेकायची. मग गरम पुरण पोळीवर साजूक तूप, कच्च्या आंब्यापासून बनविलेले पन्हे किवा आमटी सोबत मस्त ताव मारायचा. मन तृप्त होईपर्यत.