Posts

Showing posts from April, 2018

काजू मलई करी

Image
 साहित्य:  क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ. कृती:  टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्ये तूपगरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

आंब्याचे लोणचे : केरळी पद्धतीने

Image
सामग्री कच्च्या कैरीचे तुकडे - 2 कप लाल तिखट - 3 चमचे हिंग – 1 चमचा हळद - ¼ चमचा मोहरी - 1 चमचा तेल – 3 चमचे मीठ - चवीपुरते  कृती तापलेल्या तेलात मोहरी घाला आणि ती तडतडू लागल्यावर, आच मंद करा. लाल तिखट, मीठ, हिंग आणि हळद घाला आणि 3 मिनिटे ढवळा. आता आच बंद करा आणि थोडावेळ थंड होऊ द्या. कापलेल्या कैरीवर हे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. कैरी मुरण्यासाठी हे 7-8 दिवस ठेवा. तुम्ही याचा ताजेपणा टिकविण्यासाठी डिस्टिल्ड व्हिनेगरसुद्धा घालू शकता.

टरबुजापासून बनलेली बोंडे

Image
साहित्य :  दोन वाट्या टरबुजाच्या पांढर्‍या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा हातावर चोळलेल्या ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या तेल. कृती :  प्रथम एक बाऊलमध्ये टरबुजाचा कीस घ्यावा. त्यात तिखट, मीठ, तीळ व ओवा घालावा. त्यात तांदळाची पिठी घालावी. हे मिश्रण थोडे दाट होण्यासाठी त्यात मावेल तेवढे बेसन घालावे. कढईत मंद आंचेवर तेल गरम करावे. त्यात वरील मिश्रणाची छोटी छोटी बोंडे तयार करुन तळावीत. गरम खायला द्यावीत.

मोटलेचे मासे

Image
पाच बांगडे, अर्धा नारळ, एक इंच आले, एक लसणीचा कांदा, २० कोकम सोलं, १५ संकेश्वरी मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळदपूड, दोन चमचे धणे, एक चमचा बडीशेप, १५ त्रिफळे, हळदीची १० पाने, कुडय़ाची किंवा बदामाची आठ पाने, गुंडाळण्यासाठी सुतळ. कृती-  प्रथम संकेश्वरी सुक्या मिरच्या, धणे, बडीशेप, त्रिफळे पाण्यात भिजत ठेवावी. त्यानंतर बांगडे साफ करून तीन तुकडे करावे व त्यांना मिठ, हळद लावून ठेवावी. त्यानंतर नारळाचा खव, आले, लसूण वि भिजत ठेवलेले साहित्य मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे व ती चटणी, कोकम, बांगडे एकत्र कालवू ठेवावे. नंतर कुडाच्या/ बदामाच्या पानांची मोठी पत्रावळ करून ठेवावी व त्यावर हळदीची पाने व्यवस्थित मांडून ठेवावीत. त्याच्यावर चटणी लावलेले बांगडे व्यवस्थित ठेवून पत्रावळ गुंडाळून सुतळीने बांधून मोटली बनवावी व ती गॅसवरील खोलगट तव्यावर ठेवून गॅस मोठा करावा. त्या तव्यावर दुसरा खोलगट तवा ठेवावा. २० मिनिटांनी तव्यातील मोटली परतावी व पुन्हा २० मिनिटांनी गॅस बंद करावा. तवा थंड झाल्यावर मोटली बाहेर काढावी. मोटलेचे मासे गरम तांदळाच्या भाकरीसोबत चविष्ट लागतात.