Posts

Showing posts from June, 2018

भरल्या कांद्याची भाजी

Image
साहित्य :  लहान आकाराचे कांदे 1/2 किलो, किसलेले खोबरे पाव वाटी, 4 चमचे तीळ, 250 ग्रॅम दाणे, 1/2 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा गोड मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर, तिखट, मीठ, चिंचेचे पाणी, गूळ, फोडणीचे साहित्य. कृती :  कांद्याचा वरचा व थोडा खालचा भाग व साल काढून चार फाकी होतील अशी चिरावीत. नंतर खोबऱ्याचा कीस, तीळ व शेंगदाणे, धने, जिरे हे सर्व कोरडे भाजून कूट करावे. या कुटात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ, मसाला, थोडी हळद, 1-2 चमचे तेल व चिंचेचे पाणी घालून बारीक वाटावे व हे सर्व मिश्रण कांद्याच्या चार फाकीमध्ये फाक वेगळी होऊ न देता दाबून भरावे. कढईत फोडणी तयार करून त्यात भरलेले कांदे टाकावेत व मंद आचेवर ठेवून थोड्या वेळाने रस्स्याकरिता गरम पाणी टाकून उकळू द्यावे व साधारण नरम कांदे झाल्यावर त्यात कोथिंबीर व ओले खोबरे टाकावे. ही भाजी चवदार लागते.

क्रिस्पी कॉर्न

Image
साहित्य:  कॉर्न 1 वाटी, कॉर्न फ्लोअर 1 चमचा, मीठ, तेल, काळी मिरपूड अर्धा चमचा, तांदळाचे पीठ 1 चमचा, हिरवी मिरची (आवडीनुसार) कृती:  कॉर्नमध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरमध्ये 3 शिट्टी घेऊन घ्या. पेपरवर पसरून गार करा. गार झाल्यावर एका बाऊलमध्ये कॉर्न, मिरपूड, मीठ, कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. आता कढईत तेल गरम करून कॉर्न दाणे तळून घ्या. यात बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून मिक्स करू शकता. गरमा गरम सर्व्ह करा.

फिश मोईली

Image
500-800 ग्रॅम पॉम्फ्रेट, पर्ल स्पॉट, म्युलेट किंवा सीर मासा स्वच्छ करून बाजूला ठेवा. माश्यांना थोडे मीठ, हळद आणि मिरी लावून 15-30 मिनिटे ठेवून द्या. नंतर ते हलके परतून बाजूला ठेवा. तीन ते चार चमचे तेलात एक चमचा मोहरी घालून खालील पदार्थ परता: कांदे - 2 (बारीक चिरलेले) आलं - 2 इंच (तुकडे करून) लसूण - 10 ते 12 पाकळ्या (चिरून) हिरव्या मिरच्या - 2 किंवा 3 दोन तुकडे करून कांदा पारदर्शी झाल्यावर, त्यात चिरलेला टॉमेटो घाला. पुन्हा परतून घ्या आणि त्यात खाली दिलेले पदार्थ एकत्र दळून किंवा त्यात थोडे पाणी घालून तयार केलेली मसाल्याची पेस्ट घाला: धणे पूड - 2½ चमचे मेथी पूड - ½ चमचा हळद - ½ चमचा तुम्हाला भाजल्याचा वास येईपर्यंत ढवळा. नंतर दोन ते तीन कप दुसरे नारळाचे दूध (खोबर्‍याचे दुसर्‍या वेळी काढलेले दूध) आणि चवीनुसार मीठ घाला. नारळाचे दूध उकळल्यावर हलके परतलेले मासे त्यात घाला. झाकण ठेवून 15 मिनिटे शिजवा. नंतर पहिले नारळाचे दूध (घट्ट नारळाचे दूध) घाला. (रस्सा घट्ट करण्यासाठी, पाण्यात दोन चमचे मक्याचे पीठ विरघळून त्यात घाला.) एक मिनिटभर उकळू...

शेवग्याच्या पानाची भाजी

Image
शेवग्याचे झाड हे कोकणातल्या अनेक कौलारू घराच्या अंगणात असते. कोकणात याला शेवगा न म्हणता ‘शेगुल’ असे म्हणतात. शेगुलाच्या पाल्याची भाजी रुचकर असली तरी ही भाजी कोवळी असतानाच करतात. गोकुळाष्टमीला कोकणातल्या प्रत्येक घरात ही भाजी कांद्याशिवाय केली जाते. साहित्य :  शेगुलाची कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, फोडणीसाठी तेल, मीठ, ओले खोबरे, चवीपुरता गूळ, हळद, फणसाच्या आठळ्या. कृती :  शेगुलाची कोवळी पाने धुवून खसखशीत चिरावी. कढईत तेल घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा व फणसाच्या आठळ्याचे बारीक तुकडे घालून परतून घ्यावे. आठळ्याचे तुकडे शिजल्यावर त्यावर ओली मिरची, चिरलेली शेगुलाची पाने व मीठ, गूळ घालून झाकण लावून वाफ काढावी. भाजी शिजते लवकर म्हणून ओले खोबरे घालून भाजी उतरवावी. या भाजीला आवडत असल्यास वरून लसणीची फोडणी द्यावी. भाजी अधिक रुचकर होते.

आंध्रची बिर्यानी

Image
साहित्य :  एक किलो बासमती तांदुळ, 1 किलो चिकन, 250 ग्रॅम तेल, अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 1 कप दही, 10-15 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, 5-5 ग्रॅम इलाटची व लवंगा, 1 मोठा चमचा आलं-लसणाची पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार. कृती :  तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या, वेलची, कलमी आणि लवंगा टाकून एकजीव करावे. कांदे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यात लसण-आल्याची पेस्ट व टोमॅटो टाकून सर्व साहित्य परतून काढावे.  चिकनचे तुकडे दही व मीठ टाकावे. चिकनला शिजू द्या. त्यानंतर त्यात तांदुळ टाकून 2 लीटर पाणी घालावे व शिजू द्यावे.

मसालेदार पालक फिश

Image
साहित्य:  500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा हळद, 1/2 चमचा मसाला, 2 कप पालक, 1/2 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडे हिंग, मीठ चवीनुसार, 1 मोठा चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती:  सर्वप्रथम मासे स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे काप करावे. एका कटोर्‍यात लिंबाचा रस, हळद आणि मीठ घेऊन त्यात माशांचे तुकडे घालावे व चांगल्याप्रकारे एकजीव करावे. हे मिश्रण 1 तास तसेच ठेवावे. पालकाला स्वच्‍छ धुऊन चिरून घ्यावे. कांदा-लसणाची पेस्ट तयार करावी. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा- लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून शिजू द्यावे. नंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि पालक घालून 2-3 मिनिट शिजवावे.  5 मिनिटानंतर त्यात गरम मसाला, जिरे-धने पूड घालून परतून घ्यावे. त्यात पाणी घालून 5-7 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात माशांचे तुकडे व मीठ घालून शिजवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

मक्याच्या शेवया

Image
साहित्य :  शेवया, मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, तेल, मीठ, मोहरी, हिंग, हळद, कोथिंबीर, खोबरे, साखर. कृती :  सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. कढीपत्त्याची पाने घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व मक्याचे दाणे घालावेत. थोडे परतून झाकण ठेवून दोन वाफा देऊन शिजवून घ्यावे. नंतर पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून उकळी आणावी. तेलावर परतलेल्या शेवया या पाण्यात घालाव्यात. नीट हलवून गॅम मंद करून वाफा द्याव्यात व शेवया शिजवून घ्याव्यात. सर्व्ह करताना कोथिंबीर खोबरे घालावे.

Recipe : करवंदाचे लोणचं

Image
साहित्य :  100 ग्रॅम करवंद, 50 ग्रॅम हिरवी मिरची, 1/4 चमचा जिरं, 1 लहान चमचा शोप पावडर, 1 लहान चमचा धने पूड, 1/4 चमचा हळद, 1 मोठा चमचा तेल. कृती :  करवंद व हिरव्या मिरच्यांना लांब लांब कापून घ्यावे. तेल गरम करून त्यात जिरं, शोप, हळद आणि धने पूड घालून त्यात करवंद व मिरच्या घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यावे. हे लोणचे 10-15 दिवस खराब होत नाही.

ब्रेड पेटीस

Image
साहित्य:  1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे, 2 ब्रेड स्लाइस, तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ. आत भरण्यासाठी:  1/4 वाटी मूग डाळ, तेल, 1/4 चमचा भरडसर धणे, 1/4 चमचा भरडसर बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर, मीठ, काळं मीठ, हळद, पाणी. कृती:  ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या. ही ओली ब्रेड मॅश केलेल्या बटाट्यात टाका. तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ टाकून मळून घ्या. आता मूग डाळ, मीठ आणि हळद टाकून फक्त एक दोन उकळी घेऊन घ्या. ‍डाळ पूर्ण पणे शिजवून नका. कढईत 1 चमचा तेल गरम करून मंद आचेवर धणेपूड, बडीशेप टाकून डाळ आणि भरावनसाठी दिलेले सर्व साहित्य टाकून मिसळून घ्या. मिश्रण 3-4 मिनटापर्यंत परता. आता मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे करा. मग चपटे करून आत भरावनाचे छोटे गोळे त्यात ठेवून चारी बाजूने बंद करा. तळहाताच्या मदतीने पुन्हा गोल करा. गरम तेलात एक-एक करून तळून गोल्डन होयपर्यंत तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

नूडल्स टिक्की

Image
साहित्य- 1 पॅकेट नूडल्स, 2 उकळलेले बटाटे, एक चिरलेला कांदा, एक उकळून किसलेला गाजर, 2 ब्रेड स्लाइसचे क्रम्स, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ, तेल. कृती-  नूडल्स उकळून घ्या. एका वाडग्यात बटाटे किसून घ्या, यात नूडल्स, गाजर आणि ब्रेड क्रम्स टाकून मॅश करून घ्या. यात मीठ, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला आणि कोथिंबीर टाका. ‍मिश्रण एकजीव करून त्याचे लहान गोळे करून टिक्कीचा आकार द्या. आवडीप्रमाणे शॅलो फ्राय किंवा डिप फ्राय करा. तयार टिक्की चाट मसाला भुरभुरुन सॉससोबत सर्व्ह करा.

हंडी मीट

Image
साहित्य :  अर्धा किलो मटण, 4-5 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, 1/2 कप दही, 2 लवंगा, 2 मोठी वेलची, 2 काड्या कलमी आणि 2 पानं तेजपान, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा तिखट, 1 लहान चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 2-3 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. कृती :  एका जाडसर भांड्यात तेल गरम करावे. त्यात खडा मसाला व कांदे घालावे. कांदे चांगल्याप्रकारे परतून घ्यावे नंतर त्यात धुऊन स्वच्छ केलेले मटण, मीठ, जिरं व धनेपूड घालावी. आता झाकण लावून 8-10 मिनिट शिजवावे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट आणि फेटलेले दही घालून चांगल्याप्रकारे एकजीव करून त्यात अडीच कप पाणी घालावे व झाकण लावून शिजत ठेवावे. जेव्हा मटण पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा वरून गरम मसाला घालून पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करावे.

सुरमयी कटलेट

Image
साहित्य :  ४/५ मोठय़ा आकाराच्या सुरमयीच्या तुकडय़ा, हळद, २ चमचे मिरची पावडर, आले, १ लूसण, कांदा, ४/५ हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, तेल, २ बटाटे, ब्रेडक्रश, अर्धा चमचा कोकम पावडर, चवीपुरते मीठ.  कृती :  आले, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या. २ बटाटे उकडून घ्या, सुरमयीच्या तुकडय़ा थोडय़ा वाफवून किंवा तव्यावर थोडय़ाश्या तेलामध्ये परतवून घ्या व त्याचे काटे काढून टाका. बटाटा कुस्करून घ्या. त्यात सुरमयीचे तुकडे, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर, आले-लसून पेस्ट, कोकम पावडर, ब्रेडक्रश हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या. तव्यावर थोडे तेल घाला व वरील मिश्रणाच्या वडय़ा करून त्या चांगल्या तळून घ्या. पाच मिनिटात कटलेट तयार. हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर मस्त लागतात.

चविष्ट ‘बुंदी रायता’…

Image
साहित्य :-  दोन कप घट्ट व गोड दही, चार चमचे साय, दोन वाट्या बुंदी, अर्धी वाटी कोथिंबीर, 4-5 पुदिन्याची पाने, दोन-तीन हिरव्या मिरच्या, मीठ, साखर. कृती :-  दह्यामध्ये घोटलेली साय, कोथिंबीर, पुदिना-मिरचीचे वाटण, मीठ व साखर घालून फेटा. मोठ्या बाऊलमध्ये बुंदी घालून त्यावर तयार दही घाला. ढवळा व वरून चाट मसाला घाला. हे रायते आयत्यावेळी करावे. नाहीतर बुंदी मऊ पडते.

Marathi Recipe : मिरचीचे लोणचे

Image
साहित्य :   1/2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची (कच्ची) पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा (रस), 1/2 वाटी तेल. कृती :  सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते परातीतल्या पदार्थांवर ओतावे व झार्‍याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे. त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच डाळीचा मसाला घालावा. बरणीत 2 चमचे मीठ घालावे. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घाला. स्वादिष्ट मिरचीचे लोणचे तयार आहे.

चिली गार्लिक सॉस

Image
साहित्य -  पनीरचे लहान चौकोनी तुकडे. गार्लिक सॉससाठी -  गरजेनुसार लाल मिरच्या, आलं, लसूण, व्हिनेगर, साखर, मीठ, तिळाचे तेल. कृती -  चिली गार्लिक सॉस तयार करण्यासाठी मिरच्यांमधल्या बिया काढून रात्रभर व्हिनेगरमध्ये घालून ठेवाव्या. मिरच्या काढून त्यात मीठ आलं-लसूण-साखर-तेल घालून मिक्सरमधून बारीक वाटावे. तयार सॉस फ्रीजमध्ये ठेवावे. पनीरचे तुकडे थोड्या तेलावर परतावे, जास्त तळू नयेत. गार्लिक सॉस-सोया सॉस, टोमॅटो सॉस टाकून चांगले मिक्स करावे. गरजेनुसार मीठ व साखर घालावी.