Posts

Showing posts from July, 2018

अवधी मटण कोरमा

Image
साहित्य :  750 ग्रॅम बोनलेस मटण, 100 मिली तेल, 300 ग्रॅम बारीक कापलेला कांदा, 25 ग्रॅम आलं लसूण पेस्ट, दोन ग्रॅम वेलची, दोन ग्रॅम लवंगा, एक ग्रॅम कलमी, एक चमचा तिखट, पाच ग्रॅम जावीतरी, 100 ग्रॅम दही, 50 ग्रॅम काजू पेस्ट, 25 ग्रॅम सनफ्लॉवर सीड, 25 ग्रॅम कोकोनट पेस्ट, 5 ग्रॅम काळेमिरे पूड चवीनुसार मीठ. कृती :  सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा (200 ग्रॅम) घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात मटण, आलं लसूण पेस्ट घालून चांगले परतून त्यात 200 मिली पाणी घालावे. कलमी, वेलची, लवंगा, तिखट, जावीतरी पूड आणि मीठ घालावे. बाकी उरलेले कांदे घालून झाकण ठेवावे. कमी आचेवर 20 मिनिट शिजवावे. नंतर झाकण काढून घ्यावे व तेल सोडेपर्यंत शिजवावे. आता दह्याला फेटून त्यात घालावे व काही मिनिट शिजवावे. जेव्हा मीट नरम होईल आणि ग्रेवी घट्ट होईल तेव्हा बाकी साहित्य घालून चांगल्या प्रकारे हालवावे. आता या अवधी मटणाला कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

उन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे

Image
साहित्य:-  छोटे-छोटे कांदे १०, मोहरी डाळ अर्धी वाटी, तेल १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा प्रत्येकी १ चमचा, कैरी किस अर्धी वाटी, चिमूटभर साखर. कृती:-  कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा, गॅसवर पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरड्या बरणीत लोणचे भरून दादरा बांधा.  टीप:- या लोणच्यात गूळ किवा साखर व कैरी किस थोडा जास्त घातल्यास छान आंबट-गोड लोणचे तयार होईल.

चव दक्षिणेची : इडली पिझ्झा

Image
इडलीसाठी साहित्य :  1 कप सोजी, 1/2 कप दही, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा पॅकेट फ्रूट सॉल्ट. सजावटीसाठी साहित्य :  1 मोठा कांदा चिरलेला, 1 मोठी सिमला मिरची बारीक चिरलेली, 1/2 कप कॉर्न उकळलेले, थोडंसं पनीर किसलेला, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 2 मोठे चमचे टोमॅटो कॅचअप आणि 2 छोटे चमचे चिली गार्लिक सॉस. कृती :  सोजीत मीठ व दही घालून फेटून घ्यावे. इडली मेकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडल्या तयार कराव्या. नंतर इडल्या गार झाल्यावर वरून सॉस लावून चिली फ्लेक्स, चिली सॉस, चिरलेल्या भाज्या, कॉर्न व पनीर टाकून सर्व्ह करावे.

कांदा रस्सा भाजी

Image
साहित्य:-  लहान कांदे (डोर्ली कांदे) १०, कोथिबीर २ चमचे, हिरवी मिरची तुकडे अर्धा चमचा, खोबरा किस २ चमचे, तीळ, शेंगदाणे, धने प्रत्येकी १ चमचा, लसून पाकळ्या ६, अद्रक पेस्ट अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, आमचूर अर्धा चमचा, तेल २ डाव, तिखट, हळद, मीठ, चवीनुसार फोडणीचे साहित्य, गुळाचा खडा, गरम मसाला अर्धा चमचा, मेथीदाणा अर्धा चमचा. कृती:-  खोबरा किस, तीळ, धने, शेंगदाणे भाजून मिक्सीतून बारीक वाटा, नंतर लसून वाटा. यात जिरेपूड, आमचूर, अद्रक पेस्ट, तिखट, मीठ, हळद टाकून एकत्र कालवा. कांद्यांना चार चिरे देऊन त्यात वाटण भरा. गॅसवर पातेल्यात गरम तेलात मोहरी तडतडल्यावर मेथी दाणा घाला. कांदे तेलात छान परता. नंतर थोडं थोडं पाणी घालून ग्रॅव्हित कांदे शिजू द्या. शिजल्यावर गरम मसाला व कोथिबीर टाकून सर्व्ह करा.

मेदू वडा

Image
साहित्य:  300 ग्रॅम उडदाची डाळ, 3 हिरव्या मिरच्या, आलं 1 मोठा तुकडा, 10 मिरे, 3 टेबलस्पून खवलेला नारळ, कढीलिंबाची पाने 10-12, मीठ. कृती: डाळ निवडून फक्त 45 मिनिटे भिजवा. सर्व साहित्य घालून, वाटून घ्या. खूप फेसून भोकाचे वडे बनवा. बाऊलमध्ये 2 वडे ठेवून त्यावर  गरमागरम सांभार किंवा नारळ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. नारळाची चटणी:  खोबरं, आलं, हिरवी मिरची, कढीलिंब पानं, मीठ वाटून घ्या. पाणी न घालता थोडं दही घाला. नेहमीची फोडणी बनवून त्यात 1 चमचा उडदाची डाळ, लाल मिरच्या व कढीलिंब, हिंग घाला. चटणीवर फोडणीघाला.

मटण मश्रुम

Image
साहित्य :  750 ग्रॅम मटण, 2 चमचे धणे पूड, 500 ग्रॅम बटाटे, 1/4 कप तूप, 250 ग्रॅम लहान मश्रुम, 1 चमचा काळे मिरे पूड, चवीनुसार मीठ.  कृती :  मटणाला स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावे. बटाटे कापून वेगळे ठेवावे. अर्ध तूप घेऊन ते गरम करावे व त्यात बटाटे फ्राय करून घ्यावे. बाकी उरलेल्या तुपात मटणाचे तुकडे वेगळे फ्राय करून ठेवावे. मश्रुमला स्वच्छ करून त्याचे काप करून वेगळे ठेवावे.