Posts

Showing posts from October, 2019

संडे स्पेशल : हॉट चिली चिकन

Image
साहित्य :  650 ग्रॅम चिकनचे तुकडे, 2 मोठे चमचे टोमॅटो प्युरी, 2 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 2 सुक्या लाल मिरच्या, 1/2 चमचा मीठ, 1/4 चमचा साखर, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा काळे मिरे, 1 चमचा चिकन मसाला, 1 मोठा चमचा तेल, 1/2 चमचा जिरं, 1 कांदा चिरलेला, 2 तेजपान, 1-1 चमचा धने व जिरे पूड, 1/4 चमचा हळद, 400 ग्रॅम टोमॅटो चिरलेले, 3/4 कप न पाणी, 1 चमचा गरम मसाला, 4 हिरव्या मिरच्या लांब लांब कापलेल्या. कृती :  टोमॅटो प्युरी, लसूण, हिरवी मिरची, साबूत मिरच्या, मीठ, साखर, तिखट, काळे मिरे व चिकन मसाला, हे सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर कांदा आणि तेजपान टाकून चार-पाच मिनिट फ्राय करावे. मसाल्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात चिकन व गरम मसाला घालून वीस-पंचवीस मिनिट शिजवून घ्यावे. सर्व्ह करताना लांब कापलेली हिरवी मिरची सजवावी आणि चापाती सोबत वाढावे.

चिकन सींक : मायक्रोवेव्ह स्पेशल

Image
साहित्य :  500 ग्रॅम बोनलेस चिकन धुवून स्वच्छ केलेले, 8-10 चिकन सींक, 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस, 1 लहान चमचा पांढरा सिरका, 1 मोठा चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोर, 1 अंडा, चवीनुसार मिरे पूड व मीठ, 1 मोठा चमचा बटर आणि मस्टर्ड सॉस. कृती :  एका भांड्यात टोमॅटो व चिली सॉस, सिरका, अंडा, मीठ व काळे मिरे आणि कॉर्नफ्लोर टाकून फेटून घ्यावे. यात चिकन मेरीनेट करण्यासाठी ठेवावे. एक तासानंतर चिकनला चिकन सींकमध्ये लावावे. बटरने ब्रशिंग करावे. प्रत्येक सींकला ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये सोनेरी होईपर्यंत शेकावे. जर सींक नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालून चांगले भाजावे. लाकड्याची सींकमध्ये लावून मस्टर्ड सॉस किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.

एग रोस्ट

Image
एग रोस्ट बनविण्याचे सामग्री- उकडलेली अंडी – 4, कांदे बारीक चिरलेले -2 कप, हिरव्या मिरच्या 5, टोमॅटो 2, लाल तिखट -1 चमचा, धनेपूड – 1 चमचा, हळद-1/2 चमचा, गरम मसाला-1 चमचा, आले –लसूण पेस्ट –1 चमचा, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, तेल, मीठ, मोहरी. एग रोस्ट बनविण्याची कृती- सर्वप्रथम तीन चमचे तेल गरम करा आणि त्यात मोहरी घाला. आता ह्यात कढीपत्त्याची पाने आणि आलं-लसूण पेस्ट घाला. थोडावेळ ढवळा. कांदा लालसर होईपर्यंत परता. हिरव्या मिरच्या घाला आणि परत ढवळा. आता धनेपूड, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घाला.पुन्हा व्यवस्थित ढवळा. थोडे पाणी घाला आणि पुन्हा ढवळा. आता तुम्ही मीठ आणि कापलेले टोमॅटो घालू शकता. तीन मिनिटे हे मिश्रण शिजवा. जेव्हा हे ऊकळेल तेव्हा त्यात उकडलेली अंडी घाला आणि परत तीन मिनिटे ढवळा. आता अजून थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित एकत्र करा.

उन्हाळा स्पेशल : कांदा-कैरीचे आंबट गोड लोणचे

Image
साहित्य:-  छोटे-छोटे कांदे १०, मोहरी डाळ अर्धी वाटी, तेल १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा प्रत्येकी १ चमचा, कैरी किस अर्धी वाटी, चिमूटभर साखर. कृती:-  कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा, गॅसवर पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरड्या बरणीत लोणचे भरून दादरा बांधा. टीप:-  या लोणच्यात गूळ किवा साखर व कैरी किस थोडा जास्त घातल्यास छान आंबट-गोड लोणचे तयार होईल.

स्वादिष्ट मेथीचे मुठीए

Image
साहित्य :  एक मेथीची जुडी, धणे, जिरे, ओवा, बडीशेप, खसखस अंदाजे भाजून, जाडसर पूड, तीळ, चिचेचा कोळ, गूळ, हि. मिरच्या ३ व लसूण पाकळ्या २/३ वाटून, अर्धी वाटी रवा, बेसन, चिमूटभर सोडा, तळण्यासाठी तेल. कृती :  भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत व स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात कुटले की मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. रवा व बेसन पीठ एकत्र करावे. त्यात सोडा व तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ हाताने चोळून घ्यावे. मग भाजीचे मिश्रण व पीठ एकत्र करावे व घट्ट भिजवावे. पाणी घालू नये. भाजीत बसेल एवढे बेसन घालावे. चांगले मळून घेऊन लांबट गोळे करून मंद गॅसवर लालसर होईपर्यंत तळावे. या साहित्यात मेथी मुठिया प्रमाणेच कोबी, दुधी, गाजर अशा भाज्या किसून घालूनही मुठिया छान होतात.