Posts

Showing posts from August, 2017

मराठी पाककृती : मसाला भेंडी

Image
साहित्य :  भेंडी - अर्धा किलो, कांदे - २ मोठे, हिरव्या मिरच्या २-४, तेल - ४ टेबलस्पून, जिरे - १/२ टीस्पून, लाल तिखट - १ टीस्पून, धणेपूड - १ टेबलस्पून, हळद - १/२ टीस्पून, आमचूर - १/२ टीस्पून, मीठ -चवीनुसार कृती :  सर्वप्रथम कांदे सोलून उभे चिरावेत. हिरव्या मिरच्या धुवून उभ्या चिराव्यात. नंतर भेंडी धुवून, पुसून घ्यावीत व भेंडीचे टोके व देठ काढून दोन इंचाचे तुकडे करून घ्यावे व प्रत्येक तुकडय़ाला मध्ये उभी चीर पाडावी. तत्पश्चात कढईत तापवून त्यात जिरे टाकावे. ते तडतडले की चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंग येत तोवर परताव. हिरव्या मिरच्या घालून जरा वेळ परतावे. त्यात भेंडीचे तुकडे घालून लगेच वरून लाल तिखट, धणेपूड घालावी व नीट मिसळून कढईवर झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी. अधूनमधून ढवळावे. चवीनुसार मीठ व आमचूर घालावे.

मेथी मटर मलाई

Image
मेथी मटर मलाई - [Methi Mutter Malai] डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे. जिन्नस     १०० ग्रा. हिरवे मटार     २ चमचे मलाई     २ छोटे जुडी मेथी     ४ हिरवी मिरची     एक टोमॅटो     २ चमचे साखर     २ चमचे मावा     १ कप दूध     ४ चमचे वाटलेला पालक     थोडी हळद     २०० ग्रा. काजू     ५० ग्रा. खरबुज बी     २ कारले     ४ चमचे तेल     १०० ग्रा. मावा     ४ लवंग     ४ छोटी विलायची     ४ काळे मिरे     २ तेज पान     २ चमचे आले लसणाची पेस्ट पाककृती १ लि. पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी. कढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान काळीमिरे आणि आले लसणाची पेस्ट टाकून भाजावे. यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे. १ ग्लास पाणी, काजू-खरबुज पेस्ट आणि एक कप दूध टाकावे. ...

nonveg recipe : क्रिस्पी कुरकुरे झींगे

Image
  सामग्री :   250 ग्रॅम मोठ्या आकारातील झिंगे, अर्धा मोठा चमचा तेल, दहा ते बारा लसनाच्या पाकळ्या, दोन कांदे बारीक कापलेले, अर्धा चमचा काळे मिरे पावडर, कोथिंबिर, एक हिरवी मिरची. पध्दत:  झिंग्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या तव्यावर तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळ्यात आधी हिरवी मिरची टाका. त्यानंतर फुतलेले झिंगे टाका. लसनाची पेस्ट, कापलेले कांदे, व काळे मिर पावडर एकत्र करून तेलात टाका. तव्यावर जमा झालेले मिश्रण चांगले फ्राय करा. गरमा गरम झिंगा फ्राय पुलाव किंवा बारीक कापलेल्या कोथिंबिरसोबत सर्व्ह करावे.

काजू मलई करी

Image
साहित्य: क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ. कृती: टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

मसालेदार अंडी

Image
  साहित्य :  6 उकडलेली अंडी, 2 मध्यम आकाराचे कांदा कापलेले, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा तिखट, कलमी, वेलची, लवंगा, 1/2 चमचा आमचूर पावडर, हळद, धने पूड, जिरे पूड मीठ व कोथिंबीर. कृती :  प्रत्येक अंड्याचे 4 लांब लांब काप करावे. तूप गरम करून त्यात लसूण आलं पेस्ट घालून परतावे नंतर त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यावे. आता त्यात तिखट, कलमी, वेलची व लवंगा या सर्व मसाल्यांची पूड घालून चांगले परतावे. नंतर त्यात टोमॅटो घालावे व चवीनुसार मीठ घालावे व सर्वात शेवटी कोथिंबीर व कापलेले अंडी घालून सर्व्ह करावे.

पंचभेळी वांगी

Image
  साहित्य-  अर्धा किलो वांगी, 1 लांबट मुळा, 1 गाजर, मटार अर्धी वाटी, मेथी, टोमॅटो, 3 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे चिरून, बोरे. मसाला- किसलेले सुके खोबरे पाव वाटी, 2 चमचे काळा मसाला, एक कांद्या तळलेला, पाव चमचा मेथीदाणे, 2 चमचे धने, 1 चमचा जिरेपूड. कृती-  सर्व मसाला किंचित भाजून वाटा. नेहमीप्रमाणे फोडणी करून हिरवी मेथी घाला. इतर भाज्या घाला. मीठ, बोरे घाला. मग पाणी व मसाला घाला. भाज्या थोड्या शिजल्यावर टोमॅटो व गूळ घाला. टोमॅटोऐवजी चिंचही घालू शकता. पोळी किंवा भाकरीबरोबर खा.

Nonveg recipe : दिलखुश कबाब

Image
साहित्य : खिमा पाव किलो, दोन बटाटे उकडून, भिजवून जाडसर वाटलेली चनाडाळ, एक अंडे, दोन-तीन स्लाईस ब्रेड, हळद, दोन चिरलेले कांदे, आले एक इंच, लसूण आठ दहा पाकळ्या, एक टी स्पून गरम मसाला पावडर, पाव वाटी कोथिंबीर, लिंबूरस, पुदिना, तेल, मीठ, रवा पाव वाटी. कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावे. खिमा वाटून घ्यावा. आले-लसूण पेस्ट, पुदिना पेस्ट, हळद व मीठ लावून खिमा आवश्यक तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यावा. वाटलेली चनाडाळ, ब्रेडचे स्लाईस, चिरलेले कांदे, बटाटे, अंडे, कोथिंबीर, लिंबूरस, तिखट व मीठ चवीनुसार घालावे व गोल कबाब करून त्यात घोळवून गरम तेलात तळून घ्यावे. सर्व्ह करताना किंचित तूप शिंपडून गॅसवर तंदूर करावे व टोमॅटो सॉसबरोबर खावयास द्यावे.

बटाटा मेथी

Image
साहित्य : 4 जुडी निवडलेली मेथी, 8 पाकळ्या लसूण, 2 कापलेले कांदे, 1 तुकडा आलं बारीक काप केलेला, 1/2 चमचा हळद, 4 मोठे चमचे तेल, 4 बटाटे उकळून सोलून त्याचे काप करावे, 1/2 चमचा मोहरी, 4 टोमॅटो चिरलेले, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ. कृती : सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा, लसूण, आलं व हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे. हळद, तिखट, मीठ टाकून 2 मिनिट परतून घ्यावे. नंतर टोमॅटो व मेथी घालावी, 5 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. ही भाजी परोठे सोबत सर्व्ह करावी.

Nonveg Recipe : स्टीम कबाब

Image
  साहित्य: मीट 400 ग्रा, आलं-लसूण-मिरची पेस्ट 2 चमचे, 1 वाटलेला कांदा, दही 1 चमचा, कांद्याची पात अर्धा वाटी, पालक अर्धा वाटी, जिरं पावडर, कोथिंबीर, तिखट, पीपर, मीठ, तेल, ब्रेड स्लाइस 1 दुधात भिजवून पिळलेली. कृती: मीट, आलं-लसूण-मिरची पेस्ट, कांदा, भाज्या आणि जिरं पावडर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. जास्त बारीक पिसू नका. एका बाऊलमध्ये काढून त्यात तेल सोडून इतर साहित्य टाकून मिक्स करून घ्या. आता हातावर तेल लावून तयार मिश्रणाने गोळे तयार करून नंतर कबाबचा आकार द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून शॅलो फ्राय करा नंतर स्टीमरमध्ये झाकून 15 मिनिटापर्यंत वाफवून घ्या. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

कच्च्या केळ्यांची भाजी

Image
साहित्य : तीन कच्ची केळी, अर्धी वाटी भिजलेले हरभरे, किचित मीठ घालून वाफवून, वाटीभर ओलं खोबरं, चार सुक्या लाल मिरच्या, हळद, मीठ, एक कांदा ७/८ मिरे, दोन लवंगा, दोन चमचे धणे, अर्धा डाव तेल, चिमूट साखर. कृती : चणे-हरभरे रात्री भिजत घालून सकाळी वाफवावे. केळीची साल काढून जरा मोठ्याच फोडी कराव्यात. खोबऱ्याच्या चवात मिरची धणे, मिरे, लवंग व हळद घालून वाटून मसाला बनवावा. पॅनमध्ये तेल घालून कांद्याच्या फोडी टाकून परताव्यात. त्यावर केळीच्या फोडी घालाव्यात थोडसं पाणी व मीठ घालून शिजू द्याव्यात. केळी शिजली की वाफवलेले चणे, वाटलेला मसाला घालून डावाने हलके हलवावे. चवीपुरती साखर घालावी व भाजी उकळू द्यावी.

खडा मसाला चिकन

Image
कढाईत तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. आलं व लसून टाकून दोन मिनिटं चांगलं फ्राय करावे. त्यानंतर सर्व प्रकारचा खडामसाला बारीक न करता तेलात परतून घ्यावा. चवीनुसार मीठ टाकावे. त्यानंतर चिकनचे लहान केलेले तुकटे त्यात टाकावे. चांगले फ्राय करून झाल्यानंतर पाणी टाकून 40 ते 50 मिनिट मंद आंचेवर शिजवावे. जेव्हा चिंकन शिजून जाईल तेव्हा त्यातील पाणी काढून घ्यावे, ते पाणी तुम्ही सूप म्हणूनही सर्व्ह करू शकता. खडा मसाला चिकन सजविण्यासाठी त्यावर कोथिंबिर, टोमॅटो, काकडीच्या गोल चकत्या ठेवू शकतात.

लसूणी मुगाची डाळ : मायक्रोवेव्हमधील

Image
  साहित्य  - १ वाटी हिरवी मूगडाळ, ५-६ लवंगा, मीठ, लाल तिखट, कढीपत्त्याची पानं, हळद, २ टे.स्पू. तेल, लसूण, हिंग, जिरा, चिरलेली कोथिंबीर. कृती - डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा, डाळ मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये टाका. त्यात शिजणेपुरते पाणी- मीठ- हळद-टाकून त्यावर झाकण ठेवून मायक्रोवेव्हमध्ये हायवर (१00%) १0 मिनिटे ठेवा. दुसर्‍या बाऊलमध्ये तेल, लसणाचे काप, कढीपत्त्याची पानं, जिरे, हिंग, लवंगा, लाल मिरची टाकून झाकण न ठेवता हायवर (१00%) ३0 सेकंद ठेवा. नंतर यात शिजलेली मुगाची डाळ टाकून मायक्रोवेव्हमध्ये हायवर झाकण न ठेवता २ मिनिटं ठेवा. बाहेर काढून त्यावर कोथिंबीर पेरा. 

हंडी मीट

Image
  साहित्य : अर्धा किलो मटण, 4-5 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, 1/2 कप दही, 2 लवंगा, 2 मोठी वेलची, 2 काड्या कलमी आणि 2 पानं तेजपान, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा तिखट, 1 लहान चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 2-3 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. कृती : एका जाडसर भांड्यात तेल गरम करावे. त्यात खडा मसाला व कांदे घालावे. कांदे चांगल्याप्रकारे परतून घ्यावे नंतर त्यात धुऊन स्वच्छ केलेले मटण, मीठ, जिरं व धनेपूड घालावी. आता झाकण लावून 8-10 मिनिट शिजवावे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट आणि फेटलेले दही घालून चांगल्याप्रकारे एकजीव करून त्यात अडीच कप पाणी घालावे व झाकण लावून शिजत ठेवावे. जेव्हा मटण पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा वरून गरम मसाला घालून पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करावे.

लसूणी मुगाची डाळ : मायक्रोवेव्हमधील

Image
  साहित्य  - १ वाटी हिरवी मूगडाळ, ५-६ लवंगा, मीठ, लाल तिखट, कढीपत्त्याची पानं, हळद, २ टे.स्पू. तेल, लसूण, हिंग, जिरा, चिरलेली कोथिंबीर. कृती - डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा, डाळ मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये टाका. त्यात शिजणेपुरते पाणी- मीठ- हळद-टाकून त्यावर झाकण ठेवून मायक्रोवेव्हमध्ये हायवर (१00%) १0 मिनिटे ठेवा. दुसर्‍या बाऊलमध्ये तेल, लसणाचे काप, कढीपत्त्याची पानं, जिरे, हिंग, लवंगा, लाल मिरची टाकून झाकण न ठेवता हायवर (१00%) ३0 सेकंद ठेवा. नंतर यात शिजलेली मुगाची डाळ टाकून मायक्रोवेव्हमध्ये हायवर झाकण न ठेवता २ मिनिटं ठेवा. बाहेर काढून त्यावर कोथिंबीर पेरा.