Posts

Showing posts from September, 2017

भरलेली शिमला मिरची

Image
भरलेली शिमला मिरची - [Bharaleli Shimala Mirchi] उग्र वासामुळे बर्‍याचदा शिमला मिरचीचे पदार्थ आपणांस नकोसे वाटतात, मात्र भरलेली शिमला मिरची मध्ये बटाटे, टोमॅटो आणि तुप यामुळे एक खमंग स्वाद आपल्याला मिळतो आणि नावडती शिमला मिरची आवडती होऊन जाते, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ एकवेळ नक्की करून पाहावा. जिन्नस     शिमला मिरची     ३ उकडलेले बटाटे     अर्धा कप वाटाणे     एक टोमॅटो     सुके मसाले     तूप इच्छेनुसार     कांदा पाककृती शिमला मिरची पोकळ करून पाण्यात उकळवून घ्यावी. उकळल्यानंतर शिमला मिरची उलटी ठेवावी म्हणजे पाणी निघून जाईल. आता एका कढईत एक पळी तूप टाकून जिरे भाजावे. दिड चमचा मीठ, २ चमचे धणे, एक चमचा हळद, १/२ चमचा तिखट, २ चमचे खटाई टाकुन भाजावे. उकळलेले बटाटे व उकळलेले वाटाणे टाकुन हलवावे. टोमॅटो टाकावे व चांगल्या तर्‍हेने फेटावे मिश्रण बिलकुल सुके झाले पाहिजे. आता शिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या तर्‍हेने दाबून दाबून भरावे. आता एक कढईत तूप...

माँ दी दाल

Image
माँ दी दाल - [Maa Di Dal] पंजाबी ‘माँ दी दाल’ घरच्या घरी तयार...! जिन्नस     १ कप उडीद डाळ     १/२ कप राजमा     ४ कप पाणी     १ तुकडा कापलेले आले     ४ पाकळी कापलेला लसुण     १ कापलेला कांदा     ३/४ चमच गरम मसाला     २ कापलेली हिरवी मिरची     १/२ चमचे हळद     १ चमचा मीठ     २ मोठे चमचे तेल     ३/४ चमचे जीरे     १ जुडी कापलेली कोथिंबीर     २ मोठी कापलेली टोमॅटो     ३/४ चमचे लाल मिरची  पाककृती उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम करून जीरे टाकावे. नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करावे, नंतर टोमॅटो टाकावे. ३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा आणि तंदूरी पोळी बरोबर गरम गरम ...

मुगलई दम आलू

Image
मुगलई दम आलू - [Mughlai Dum Aloo]  उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता. जिन्नस     ८ बटाटे     तळणासाठी तूप भरण्यासाठी मसाला     ४ कापलेली काजू     ६ कापलेली मनुका     ११५ ग्रा. मावा     १ हिरवी मिरची     मीठ     काळे मिरे     २ कांदे     २ हिरवी मिरची     १ आल्याचा तुकडा     १/२ चमचा हळद     २ चमचे मीठ     ५ लाल मिरची     ५ पाकळी लसूण  पाककृती बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. बटाट्याचा आतील भाग पोकळ करुन घ्यावा. बटाट्यामध्ये बनविलेला मसाला भरावा व उरलेल्या बटाट्याच्या कुस्कराने भरुन टाकावे. टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे. एका पातेल्यात तूप गरम करून लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी. जेव्हा आपणास...

पाककृती : वरणफळ

Image
साहित्य :  १ वाटी तूरडाळ, १ १/२ वाटी पोळ्यांची कणिक, चिंच, गूळ, फोडणीचे साहित्य कृती: डाळ शिजवून घ्यावी. कणिक पोळ्यांसाठी मळतो तशी मळावी. तेल मोहरी हळद चिमूटभर हिंग अशी फोडणी करुन त्यात शिजलेली डाळ,पाणी घालून थोडे चिंच गूळ आणि मीठ घालावे. हे मिश्रण पातळ ठेवून मंद आचेवर उकळत ठेवावे. आता कणकेची पोळी लाटून तिचे कातणीने शंकरपाळ्याप्रमाणे तुकडे करावेत. २-३ पोळ्या लाटून तुकडे करुन झाल्यावर हे तुकडे सुटे करुन वरणात घालावे. वरणातले पाणी आटले असल्यास परत थोडे पाणी घालून ढवळावे. ५-१० मिनीटे शिजू द्यावे आणि उतरवावे. वरणाबरोबर पोळी खायचा आळशीपणा करायचा असल्यास खा वरण+पोळी एकत्र असे हे वरणफळ!

बटाट्याची भाजी - एक पद्धत

Image
लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  ३ मध्यम बटाटे. उकडून, साले काढून फोडी केलेले किंवा न उकडता काचर्‍या. १ पातीचा कांदा, पातीसह. कांदा फार मोठा नको. पात कोवळी असावी. कांद्यासह बारीक चिरुन घ्यावी. १ चमचा वाटलेले/किसलेले आले. १ हिरवी मिरची बारीक चिरुन. मोहरी, जिरे, बडिशेप - प्रत्येकी १ लहान चमचा. (२ चमचे पंच फोडण चालेल. मेथी-कलौंजी पण येईल, हरकत नाही.) १ चमचा धणे - खरंगटून. अगदी पूड नको. अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा साखर १-२ चमचे तेल १ चमचा लिंबाचा रस. मीठ थोडी कोथिंबीर चिरुन. क्रमवार पाककृती: पसरट भांड्यात किंवा पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे. हिंग घालावा. मोहरी-जिरे-बडिशेप (किंवा पंच फोडण) आणि धणे फोडणीत घालावे. आले, मिरच्या, हळद घालावी. आले-मिरच्या थोड्या परतून घ्याव्या. मग पात आणि कांदा घालून नीट परतावे. पात चांगली परतली गेली पाहिजे. मग बटाट्याच्या फोडी, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून वाफ काढावी. काचर्‍या असतील तर वाफेवर शिजवाव्यात. वरुन कोथिंबीर घालून वाढावी. वाढणी/प्रमाण: २-३ जण अधिक टिपा: पातीच्या कांद्याऐवजी ताजी मेथी, कसुरी मेथी, सुका ...

झणझणीत मिसळ पाव

Image
साहित्य-  पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला,हिंग, लिंबू, मोहरी, हळद, कढीपत्ता, मीठ, तेल, फरसाण. कृती-  मोड आलेली मटकी भाजून घ्या. कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका. अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता. त्यानंतर धान्य टाका. गरम पाणी टाकून गरम मसाला घाला. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू व फरसाण टाकून पावसोबत सर्व्ह करा.

मटण हंडी

Image
मटण हंडी - [Mutton Handi] मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीमध्ये बनवलेली ‘मटण हंडी’ खमंग व स्वाद वाढवते. जिन्नस     १ किलो मटणाचे तुकडे     ७ किसलेले कांदे     २ इंच आल्याची पेस्ट     मीठ     अर्धा चमचा साखर     ४ हिरव्या मिरच्या     १ चमचा कोथिंबीर     २ कप दही     १ लसणाची पेस्ट     अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी     दीड चमचा लाल मिरची     १ चमचा हळद     २ बारीक केलेले टोमॅटो     १ चमचा गरम मसाला पाककृती प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा. एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता. त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता. त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता. झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा. गरमागरम हंडी ...

कचोरी

Image
कचोरी - [Kachori] न्याहारीसाठी खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि लहान मुलांना आवडणारी ‘कचोरी’ घरी बनवून पोटभर खाऊ शकता. जिन्नस     २५० ग्रा. मैदा     सोडाबाईकार्बोनेट     ६५ ग्रा. तेल     ८० ग्रा. पाणी     १०० ग्रा. उडीद डाळ     ३० ग्रा. तूप     २० ग्रा. आले     ६ ग्रा. हिरवी मिरची     १ ग्रा. हिंग     १ छोटा चमचा धणे पावडर     १/२ चमचा जीरे पावडर     १/२ छोटा चमचे साखर     मीठ चवीनुसार     १० मिली लिंबाचा रस     २ ग्रा. कोथिंबीर     तळणासाठी तेल पाककृती मैदा, मीठ आणि, सोडाबाइकार्बोनेट एकत्र मिळवावे, ६५ ग्रा. तेल टाकावे आणि चांगल्या तर्‍हेने मिळवावे. पाणी ( साधारण ८० मिली) घेऊन नरम मळावे, ओल्या कपडाने झाकून एका बाजुस ठेवावे. आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापावी, उडदाच्या डाळीस एक तास भिजवावे. नंतर वाटावे. कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी म...

पोळ्यांचा चुरमा

Image
पोळ्यांचा चुरमा - [Poli Churma] दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर जर काही पोळ्या किंवा भाकरी शिल्लक राहिल्या असतील तर त्यातुन ही एक खमंग पाककृती बनवली जाऊ शकते. जिन्नस     ५-६ पोळ्या (चपात्या/भाकर्‍या)     १ कांदा     तिखट     मीठ     हळद     १ चमचा साखर     कडीपत्ता     जीरे     मोहरी (फोडणीसाठी) पाककृती पोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे. कांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे. कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरुन साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे. पोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त...

पनीर टिक्का

Image
नीर टिक्का - [Paneer Tikka] चटपटीत आणि हॉटेलसारखी चव असलेला पनीर टिक्का घरच्या घरी बनवून खाऊ शकता. जिन्नस     २०० ग्रा. पनीर     १०० ग्रा. दही     २५ ग्रा. मैदा     लसूण     आलं     १/२ चमचा जीरे पावडर     १/२ चमचा गरम मसाला     १ मिली. ऑरेंज कलर     ५० ग्रा. बटर     ७५ ग्रा. टोमॅटो     ३० मिली. क्रीम     १/२ चमचा लाल मिरची     १/२ चमचा कसुरी मेथी     मीठ पाककृती दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा. पनीरचे तुकडे तळावे, एका पातेल्यात लोणी टाकून त्यात आलं, लसूण टाकून २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे. नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी. पनीर बाउलमध्ये जमवावे. नंतर क्रीम व कोथिंबीर सजवावे.

काजू मलई करी

Image
  साहित्य:  क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ. कृती:   टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्येतूप गरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रोस्टेड चिकन

Image
साहित्य :  ६-८ कोंबडीचे तुकडे, हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले चीज़, लसूण पाकळ्या २, चवीला मीठ, मेयॉनीज़, पावाचा चुरा. कृती :  हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे. चांगली भट्टी(ओव्हन) हवी. साल काढलेले चिकनचे मोठे तुकडे घ्या. शक्यतो मांड्या आणि छातीचे भाग असावेत. बकीचे तुकडे रस्सा करण्यासाठी वापरता येतील. तुकड्यांना सढळ हाताने मेयॉनीज़ लावा. लसूण वाटून पावाच्या (कुरकुरीत) चुऱ्यात घाला. सगळे कोंबडीचे तुकडे पावाच्या चुऱ्यात चांगले घोळा. पाहिजे असेल तर त्यावर बदामाचे काप लावा. सर्व तुकडे आधी ३५० फॅरनहाईट पर्यंत तापविलेल्या भट्टीमन्धे एक थराने थोडे पसरून ठेवा. ८-१० मिनिटामध्ये तांबूस खमंग होतील. चीज हवे अस्ल्यास शेवटच्या २ मिनिटासाठीच घालायचे.

Nonveg Recipe : बांगडा करी

Image
साहित्य :  ४ ते ६ मध्यम आकाराचे बांगडे. अर्ध्यापेक्षा थोडा कमी नारळ किसून, ६ ते ८ पाकळ्या लसूण, १" आले, १०-१२ कढीलिंबाची पाने, १० - १२ काश्मिरी मिरच्या, एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरून, एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून, अर्धा चमचा हळद, एक टी स्पून कसूरी मेथी पावडर, लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ, अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर, मुठभर कोथिंबीर. १०-१२ तिरफळे, मिठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल. बांगडे साफ करून, स्वच्छ धूवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावेत. प्रत्येक बांगडा दोन्ही पंजांमध्ये धरून किंचीत दाबून पाणी काढून टाकावे. बांगड्यांचे डोके काढून टाकून फेकून द्यावे. उरलेल्या बांगड्याला हलक्या हाताने, दोन्ही बाजूंनी तिरप्या चिरा देऊन, आकारानुसार प्रत्येकी २ ते ३ तुकडे करावेत. या सर्व तुकड्यांना हळद आणि थोडे मीठ लावून ठेवावे. काश्मिरी मिरच्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. मिक्सरच्याच मोठ्या भांड्यात नारळ, आलं-लसूण, काश्मिरी मिरच्यांचे तिखट, कांदा, टोमॅटो, कसूरी मेथी पावडर, चिंचेचा कोळ, गरम मसाला पावडर, कोथिंबीर एकत्र घालून, कमी पाण्यात, गंधासारखे मऊ वाटावे. सर्वात शेव...

कांद्याचा भात

Image
साहित्य :  तांदूळ, कांदे, लाल मिरची, शेंगदाणे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, खोबरे, कोथिंबीर, लिंबू. कृती :  तांदूळ तासभर धुऊन निथळत ठेवावे. कांदे जास्त घेऊन लाल मिरच्या बारीक वाटाव्यात. खोबरे किसून घ्यावे. कोथिंबीर चिरून घ्यावी, तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात वाटलेले कांदे, शेंगदाणे, तांदूळ, मीठ घालून परतावे. भात शिजल्यावर किसलेले खोबरे, कोथिंबीर घालून वाढावे.

खीमा-राजमा

Image
साहित्य :  1/2 कप तेल, 3 मोठे कांदे चिरलेले, 10 पाकळ्या लसूण चिरलेला, 1 किलो मटण किंवा बीफ खीमा, 1 कप राजमा 4 तास पापाण्यात भिजवून निथळलेला, 6 मोठे टोमॅटो शिजवून, सोलून ‍चिरलेले, 2 मध्यम भोपळी मिरच्या, 4 तमाल पत्रे, 1 मोठा चमचा मीठ, 1 मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, 1 1/2 छोटा चमचा लाल मिरची पूड, 1/4 चमचा मिरे पूड, 1/4 चमचा जिरे पूड, 2 कप पाणी.  कृती :  कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा आणि लसूण घाला कांदा बदामी होईपर्यंत परता. खीमा घाला आणि चांगला तांबूस होईपर्यंत परता. इतर सारे पदार्थ घालून ढळवा. व कमी आचे वर 15 मिनिटे शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.

ओल्या काजूची भाजी

Image
ओल्या काजूची भाजी - [Olya Kajuchi Bhaji] मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करुन कोकणात केली जाणारी ‘ओल्या काजूची भाजी’ उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावी. जिन्नस     पाव किलो सोललेले ओले काजूगर     २ कांदे     २ बटाटे     १ टोमॅटो     अर्धा ओला नारळ किसून     लसुण     आले     गरम मसाला पावडर     तिखट     हळद     मीठ     कोथिंबीर     तेल पाककृती काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत. नंतर भाजलेल्या कांदा - खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात. उतर...

हंडी मीट

Image
साहित्य :  अर्धा किलो मटण, 4-5 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, 1/2 कप दही, 2 लवंगा, 2 मोठी वेलची, 2 काड्या कलमी आणि 2 पानं तेजपान, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा तिखट, 1 लहान चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 2-3 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.    कृती :   एका जाडसर भांड्यात तेल गरम करावे. त्यात खडा मसाला व कांदे घालावे. कांदे चांगल्याप्रकारे परतून घ्यावे नंतर त्यात धुऊन स्वच्छ केलेले मटण, मीठ, जिरं व धनेपूड घालावी. आता झाकण लावून 8-10 मिनिट शिजवावे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो, तिखट आणि फेटलेले दही घालून चांगल्याप्रकारे एकजीव करून त्यात अडीच कप पाणी घालावे व झाकण लावून शिजत ठेवावे. जेव्हा मटण पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा वरून गरम मसाला घालून पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करावे.

रोस्टेड चिकन

Image
साहित्य :  ६-८ कोंबडीचे तुकडे, हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले चीज़, लसूण पाकळ्या २, चवीला मीठ, मेयॉनीज़, पावाचा चुरा. कृती :  हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे. चांगली भट्टी(ओव्हन) हवी. साल काढलेले चिकनचे मोठे तुकडे घ्या. शक्यतो मांड्या आणि छातीचे भाग असावेत. बकीचे तुकडे रस्सा करण्यासाठी वापरता येतील. तुकड्यांना सढळ हाताने मेयॉनीज़ लावा. लसूण वाटून पावाच्या (कुरकुरीत) चुऱ्यात घाला. सगळे कोंबडीचे तुकडे पावाच्या चुऱ्यात चांगले घोळा. पाहिजे असेल तर त्यावर बदामाचे काप लावा. सर्व तुकडे आधी ३५० फॅरनहाईट पर्यंत तापविलेल्या भट्टीमन्धे एक थराने थोडे पसरून ठेवा. ८-१० मिनिटामध्ये तांबूस खमंग होतील. चीज हवे अस्ल्यास शेवटच्या २ मिनिटासाठीच घालायचे.

ओल्या काजूची भाजी

Image
ओल्या काजूची भाजी - [Olya Kajuchi Bhaji] मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करुन कोकणात केली जाणारी ‘ओल्या काजूची भाजी’ उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावी. जिन्नस     पाव किलो सोललेले ओले काजूगर     २ कांदे     २ बटाटे     १ टोमॅटो     अर्धा ओला नारळ किसून     लसुण     आले     गरम मसाला पावडर     तिखट     हळद     मीठ     कोथिंबीर     तेल पाककृती काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत. नंतर भाजलेल्या कांदा - खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ...

रताळ्याची कचोरी

Image
रताळ्याची कचोरी - [Ratalyachi Kachori] गरम गरम खायला द्याव्या,गरमा गरम कचोर्‍या फार सुंदर लागतात,रताळ्याच्या कचोर्‍या उपवासाला एकदम चांगल्या. सारणासाठीचे जिन्नस     १ मूठ चिरलेली कोथिंबीर     १ वाटी खवलेले खोबरे     ४-५ हिरव्या मिरच्या     ५० ग्रॅम बेदाणा     मीठ     साखर कव्हरसाठीचे जिन्नस     २५० ग्रॅम रताळी     १ मोठा बटाटा     थोडेसे मीठ पाककृती रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.