Posts

Showing posts from November, 2017

केळीचे कटलेट

Image
साहित्य:  2 कच्ची केळी, थोडा फ्लॉवर, मटार, 2 लहान टोमॅटो, 2 बटाटे, 1 कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, तिखट.  कृती:  सर्व भाज्या बारीक चिरून, तेलावर कांदा परतून त्यात घाला व नरम शिजवा. गार झाल्यावर कोथिंबीर इ. घाला. अर्धा कप दूध व थोड्या मैद्याचे मिश्रण बनवा. त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यात वरील मिश्रणाचे चपटे कटलेट बनवून, बुडवून, तव्यावर थोडे तेल घालून तळा. तळताना थोडी खसखस पेरून तळा.  

Marathi Recipe : मिरचीचे लोणचे

Image
साहित्य :  1/2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची (कच्ची) पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा (रस), 1/2 वाटी तेल. कृती :  सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते परातीतल्या पदार्थांवर ओतावे व झार्‍याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे. त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच डाळीचा मसाला घालावा. बरणीत 2 चमचे मीठ घालावे. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घाला. स्वादिष्ट मिरचीचे लोणचे तयार आहे.

शेव-टोमॅटो भाजी

Image
 जेवायला पटकन काही कालवण तयार करायचा असेल तर याहून सोपा पदार्थ नसेल कदाचित... सामुग्री:  1 वाटी शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे.    कृती:  एका कढईत फोडणी करता तेल गरम करून त्यात मोहर्‍या टाका. तडतडल्यावर मिरच्या, कांदा घालून परता. गोल्डन झाल्यावर टोमॅटो टाका. परतून हळद, तिखट, धणेपूड, मीठ टाकून परतून घ्या. चार वाट्या गरम पाणी घालून उकळून घ्या. उकळू लागले की त्यात शेव टाकून गॅस बंद करा. चवी प्रमाणे कोथिंबीर घालू शकता. विशेष:  सर्व्ह करण्याची तयारी असल्यावरच शेव घाला. शेव लसणाची किंवा लवंगांची असल्यास चव छान येते.तसेच पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येऊ शकतं.

पोष्टीक मेथीदाणे

Image
साहित्य :  200 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल. कृती :  सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावे. या मिश्रणात मग मोड आलेले मेथीदाणे टाकून त्यावर झाकण ठेवावे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोळी सोबत सर्व्ह करावे.

चायनिज पुलाव

Image
साहित्य- 500 ग्रॅम बासमती तांदूळाचा भात, 125 ग्रॅम पत्ताकोबी, कांद्याची पात, 2 गाजर, 1/2 वाटी हिरवे मटार उकळलेले, 10-15 मशरूमचे टुकडे, 1/2 पाकीट सिजनिंग, 2 मोठे चमचे सोया साँस, अजीनोमोटो, 2 मोठे चमचे रेड चीली साँस, 250 ग्रॅम मटनाचे तुकडे, तळण्यासाठी तेल, 2 सिमला मिरच्या. कृती-  एका कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात सर्व भाज्या चिरून टाका व उकळलेले मटर टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यात मटनाचे तुकडे, सोया साँस, चिली साँस, स‍िजनिंग, मशरूमचे तुकडे, चवीनुसार अजिनोमोटो टाकून मिक्स करा. नंतर त्यात तयार भात घालून मिक्स करा. गरम गरम पुलाव टोमॅटो किंवा चिली साँस टाकून सर्व्ह करा.

पिझ्झा सॉस

Image
टोमॅटो प्युरी- 2 कप, मीठ- 1 चमचे, टोमॅटो कॅचअप- ½ कप, तिखट- 2 चमचे, लसूण- 5 पाकळ्या कापून, गरम मसाला- 2 चमचे, कांदा- 1 बारीक चिरलेला  कृती:  गरम पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑयल टाका. लसणाच्या पाकळ्या परतून घ्या. कांदे घालून परता. आता टोमॅटो प्युरी घालून चालवा. टोमॅटोचा पाणी शोषून गेल्यावर मीठ आणि तिखट मिसळा. गरम मसाला घालून कॅचअप टाका. 3-4 मीनात चालवत राहा नंतर गॅस बंद करून द्या.

कैरीचे चटपटीत लोणचे

Image
साहित्य :  कैर्‍या कडक व आंबट अर्धा किलो, तेल १ वाटी, मोहरीची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धी वाटी, मीठ अर्धी वाटी, मेथीची पावडर अर्धा चमचा, बडीशेप १ चमचा, हळद पाव वाटी, हिंग पावडर १ चमचा इ.  कृती :  कैऱ्या धुऊन-पुसून फोडी करून घ्याव्या. कढईत तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे. नंतर त्यात हिंग, हळद, मेथी पावडर, बडीशेप, मोहरीची डाळ, मीठ घालून हलवावे. जरा थंड झाल्यावर शेवटी तिखट घालावे. छान हलवून मसाला थंड होऊ द्यावा. मसाला पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवावे. सहा महिने लोणचे टिकेल. टीप : लोणच्यात टाकावयाचे मीठ रवाळ भाजून थंड करून घालावे. म्हणजे लोणचे खमंग होते. मोहरीची डाळ जरा गरम करून वाटून घ्यावी म्हणजे मसाला लोणच्याला चिकटून राहतो व लोणचे लवकर मुरते. तिखट लालभडक असावे. हे लालभडक चटपटीत लोणचे तुमची रसना नक्कीच तृप्त करेल.

गोळ्यांची कढी

Image
साहित्य :  ताजे ताक दोन वाट्या, डाळीचे पीठ ३ चमचे, २ चमचे तूप, हिंग, जिरे, मेथ्या १/४ चमचा, हळद अर्धा चमचा, मिरची एक, आलं किसून १ चमचा, कढीपत्ता ४ ते ५ पाकळ्या / पाने, १ चमचा साखर. गोळ्यांसाठी हरबरा डाळ ४ ते ५ तास भिजवून. आले मिरची, लसूण, जिरे, मीठ परत मीठ व किसलेले आले घालावे. कढीला सतत उकळी आणू नये. ती फुटते. गोळ्यांसाठी कृती :  भिजलेली डाळ मिक्सरवर जाडसर वाटावी. त्यामध्ये वाटतानाच आले, लसूण, मिरची, मीठ, जिरे घालावे. आपल्या चवीनुसार वरून हळद घालावी. वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोळे वळावेत. तयार गोळे चाळणीला तेल लावून अथवा कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ठेवून वाफवावे अथवा प्रेशरकुक करावेत. जेवणापूर्वी गोळे कढीत सोडावे व गरम करावे. वरून चिरून कोथिंबिरीने सजवावे.

कांद्याचा भात

Image
साहित्य :  तांदूळ, कांदे, लाल मिरची, शेंगदाणे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, खोबरे, कोथिंबीर, लिंबू.   कृती :  तांदूळ तासभर धुऊन निथळत ठेवावे. कांदे जास्त घेऊन लाल मिरच्या बारीक वाटाव्यात. खोबरे किसून घ्यावे. कोथिंबीर चिरून घ्यावी, तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात वाटलेले कांदे, शेंगदाणे, तांदूळ, मीठ घालून परतावे. भात शिजल्यावर किसलेले खोबरे, कोथिंबीर घालून वाढावे.  

शमी कबाब

Image
साहित्य-  500 ग्रॅम मटन खिमा, 200 ग्रॅम धुतलेली चना डाळ, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, 1 कांदा, आले, 10-12 लसानाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, 1 लहान चमचा जीरे, 5 ते 6 लवंग, तळण्यासाठी तेल किंवा तूप.  कृती-  कांदा, आले व लसणाच्या पाकळांना सोलून बारीक करून घ्यावे. त्यात चना डाळ, खिमा, मीठ, तिखट, जिरे व लवंग टाकून थोड्या पाण्यात खिमा वाफवावा. शिजलेला खिमा गाळून घ्या. मिक्शर मधून बारीक करून घ्या. हिरव्या मिरच्या बारीक कापून कोथिंबीरसोबत वाटलेल्या मिश्रणात मिसळावे. त्या मिश्रणाला वड्याचा आकार देऊन तव्यावर तूप किंवा तेल टाकून भाजून घ्यावे. उथळ डिशमध्ये वर्तुळाकारामध्ये शमी कबाब रचून त्यावर टोमॅटो सॉस टाकून सर्व्ह करू शकता.

दम आलू (काश्मिरी)

Image
साहित्य :-  बारीक म्हणजे छोटे बटाटे १०/१२, अर्धी वाटी चिरलेली सफरचंद (सफरचंद चिरल्यावर त्याला लिंबाचा रस चोळावा म्हणजे काळे पडत नाही), अर्धी वाटी अननसाचे तुकडे, अर्धी वाटी द्राक्षे, काजू ५-६, मीठ स्वादानुसार, तिखट अर्धा चमचा, हिरवी मिरची ठेचा पाव चमचा,चार टीस्पून तूप, एक चमचा गरममसाला, दुध.  ग्रेव्ही साहित्य :-  एक चिरलेला टोमॅटो, पाच भिजवलेले काजू, एक डावभर ओले खोबरे, दोन-तीन चमचे भिजवलेले खसखस, पाव चमचा आलेकिस. कृती :-  बटाटे प्रथम उकडून घ्यावेत. नंतर सोलून थोडे तूप टाकून लालसर परतून घ्यावेत. थोडी हळद, तिखट, मीठ, मिरचीचा ठेचा, गरम मसाला सर्व घालावे. एक चिरलेला टोमॅटो, ५ भिजवलेले काजू, १ डावभर ओले खोबरे, २-३ चमचे भिजवलेले खसखस, पाव चमचा आलेकिस हे सर्व मिक्सरमधून काढावे. ही झाली ग्रेव्ही. थोडी ग्रेव्ही बटाट्यावर घालून परतावी. राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये दुध घालावे. नंतर त्यात वरील सर्व फळे घालून बटाट्यांना टोचे मारावेत. गरमागरम काश्मिरी दम आलू रोटीबरोबर खायला द्यावेत.

ग्रीन पीज खिमा

Image
साहित्य :  खिमा, ग्रीन पीज (मटार) बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पावडर, लाल मिरची पावडर, खोवलेलं ओलं खोबरं, हळद, हिंग. कृती :  भांडय़ात तेल तापवा. त्यात कांदा परता. आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो परता. हळद घाला. खिमा घालून छान परता. लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर घाला. परतून घ्या. झाकून शिजत ठेवा. शिजत आल्यावर मटार घाला. ओलं खोबरं घाला. परत थोडं शिजवा. जास्त पातळ करू नका. शेवटी कोथिंबीर घाला.

चव दक्षिणेची : उत्तप्पा

Image
साहित्य:  चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, एक चमचा मेथ्या , मीठ. कृती:  रात्री तांदूळ, उडदाची डाळ व मेथ्या हे वेगवेगळे भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ उपसून व कुटून, पीठचाळून घ्यावे. उडदाची डाळ व मेथ्या उपसून बारीक वाटावे व हा वाटलेला गोळा व दोन-तीन चमचे मीठ तांदळाच्या पिठात घालून व पुरेसे पाणी घालून, पीठ कालवून, दहा-बारा तास ठेवून द्यावे. उत्तप्पा करावयाच्या वेळी पीठ पातळसर कालवून घ्यावे. नंतर तवा तापत ठेवून, तो तापल्यावर त्याच्यावर तेल किंवा तूप सोडून, त्यावर तयार केलेल्या पिठाची जाडसर धिरडी घालावीत. उत्तप्पा खावयास देताना बरोबर ओल्या डाळीची किंवा इतर दुसरी कोणतीही पातळसर चटणी द्यावी.

मसालेदार पालक फिश

Image
साहित्य:  500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा हळद, 1/2 चमचा मसाला, 2 कप पालक, 1/2 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडे हिंग, मीठ चवीनुसार, 1 मोठा चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.  कृती:  सर्वप्रथम मासे स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे काप करावे. एका कटोर्‍यात लिंबाचा रस, हळद आणि मीठ घेऊन त्यात माशांचे तुकडे घालावे व चांगल्याप्रकारे एकजीव करावे. हे मिश्रण 1 तास तसेच ठेवावे. पालकाला स्वच्‍छ धुऊन चिरून घ्यावे. कांदा-लसणाची पेस्ट तयार करावी. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा- लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून शिजू द्यावे. नंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि पालक घालून 2-3 मिनिट शिजवावे. 5 मिनिटानंतर त्यात गरम मसाला, जिरे-धने पूड घालून परतून घ्यावे. त्यात पाणी घालून 5-7 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात माशांचे तुकडे व मीठ घालून शिजवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

Veg Recipe : सिमला मिरचीची भाजी

Image
साहित्य :  पाव किलो सिमला मिरची, 2 कांदे, मोहरी, हिंगपूड, हळद, बेसन.  कृती :  सिमला मिरच्यांचा आतील बियांचा भाग काढून टाकावा व लहान फोडी करून घ्याव्यात. कांदे बारीक चिरून घ्यावेत. मोहरी हिंगपूड, हळद घालून 4 चमचे तेलाची फोडणी करून त्यात कांदे व मिरचीच्या फोटी घालून परतावे. मीठ घालावे. शिजल्यावर पिठल्याला लावतो त्याप्रमाणे हळूहळू बेसन घालावे व सर्व मिळून पुन्हा परतावे.  

सुरळीच्या पाटवड्या

Image
सुरळीच्या पाटवड्या - [Suralichya Patvadya] ‘सुरळीच्या पाटवड्या’ हा चवीला वेगळा, पौष्टिक आणि घरीच बनवता येणारा चटपटीत पदार्थ. जिन्नस     १ मोठी वाटी डाळीचे पीठ (बेसन)     १ मोठी वाटी आंबट ताक     १ मोठी वाटी पाणी     तिखट     मीठ     हळद     हिंग फोडणी व कांदा - खोबर्‍याचे सारण     १/२ वाटी ओले खोबरे     १ मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर     १ मोठा बारीक चिरलेला कांदा     १ बारीक चिरुन हिरवी मिरची     मीठ     थोडी साखर     थोडे लाल तिखट     १ पळी तेलाची फोडणी (थंड करुन घालावी) पाककृती जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या था...

पोळ्यांचा चुरमा

Image
पोळ्यांचा चुरमा - [Poli Churma] दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर जर काही पोळ्या किंवा भाकरी शिल्लक राहिल्या असतील तर त्यातुन ही एक खमंग पाककृती बनवली जाऊ शकते. जिन्नस     ५-६ पोळ्या (चपात्या/भाकर्‍या)     १ कांदा     तिखट     मीठ     हळद     १ चमचा साखर     कडीपत्ता     जीरे     मोहरी (फोडणीसाठी)  पोळ्यांचा चुरमा - [Poli Churma] दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर जर काही पोळ्या किंवा भाकरी शिल्लक राहिल्या असतील तर त्यातुन ही एक खमंग पाककृती बनवली जाऊ शकते. जिन्नस     ५-६ पोळ्या (चपात्या/भाकर्‍या)     १ कांदा     तिखट     मीठ     हळद     १ चमचा साखर     कडीपत्ता     जीरे     मोहरी (फोडणीसाठी)  पाककृती पोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक के...

झणझणीत मिसळ पाव

Image
साहित्य-  पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, हिंग, लिंबू,मोहरी, हळद, कढीपत्ता, मीठ, तेल, फरसाण. कृती-  मोड आलेली मटकी भाजून घ्या. कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका. अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता. त्यानंतर धान्य टाका. गरम पाणी टाकून गरम मसाला घाला. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू व फरसाण टाकून पावसोबत सर्व्ह करा.

मेथी मुठीया

Image
 साहित्य :    एक मेथीची जुडी, धणे, जिरे, ओवा, बडीशेप, खसखस अंदाजे भाजून, जाडसर पूड, तीळ, चिचेचा कोळ, गूळ, हि. मिरच्या ३ व लसूण पाकळ्या २/३ वाटून, अर्धी वाटी रवा, बेसन, चिमूटभर सोडा, तळण्यासाठी तेल. कृती :  भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत व स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात कुटले की मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. रवा व बेसन पीठ एकत्र करावे. त्यात सोडा व तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ हाताने चोळून घ्यावे. मग भाजीचे मिश्रण व पीठ एकत्र करावे व घट्ट भिजवावे. पाणी घालू नये. भाजीत बसेल एवढे बेसन घालावे. चांगले मळून घेऊन लांबट गोळे करून मंद गॅसवर लालसर होईपर्यंत तळावे. या साहित्यात मेथी मुठिया प्रमाणेच कोबी, दुधी, गाजर अशा भाज्या किसून घालूनही मुठिया छान होतात.

स्टफ्ड दही भल्ले

Image
साहित्य :  1 कप सिंघाड्याचे पीठ, 1/2 कप पनीर, 1 कप उकडलेले बटाटे मॅश केलेले, 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा केलेली काजूची पूड, 1 हिरवी मिरची कापलेली, 2 कप फेटलेले दही, मीठ, साखर, जिरं पूड, अनारदाणे व तळण्यासाठी तेल.  कृती :  सर्वप्रथम पनीराला किसून त्यात बटाटे, काजू, मिरची, आलं व मीठ घालून एकजीव करावे. त्याचे लहान लहान गोळे तयार करावे. सिंघाड्याच्या पिठाचे घोळ तयार करून त्यात हो गोळे तळावे. दह्यात साखर घालून त्यात जिरं पूड व अनारदाण्याने सजवून सर्व्ह करावे.

Nonveg recipe : दिलखुश कबाब

Image
साहित्य :  खिमा पाव किलो, दोन बटाटे उकडून, भिजवून जाडसर वाटलेली चनाडाळ, एक अंडे, दोन-तीन स्लाईस ब्रेड, हळद, दोन चिरलेले कांदे, आले एक इंच, लसूण आठ दहा पाकळ्या, एक टी स्पून गरम मसाला पावडर, पाव वाटी कोथिंबीर, लिंबूरस, पुदिना, तेल, मीठ, रवा पाव वाटी.   कृती :  सर्वप्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावे. खिमा वाटून घ्यावा. आले-लसूण पेस्ट, पुदिना पेस्ट, हळद व मीठ लावून खिमा आवश्यक तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यावा. वाटलेली चनाडाळ, ब्रेडचे स्लाईस, चिरलेले कांदे, बटाटे, अंडे, कोथिंबीर, लिंबूरस, तिखट व मीठ चवीनुसार घालावे व गोल कबाब करून त्यात घोळवून गरम तेलात तळून घ्यावे. सर्व्ह करताना किंचित तूप शिंपडून गॅसवर तंदूर करावे व टोमॅटो सॉसबरोबर खावयास द्यावे.

कोबी मुठिया

Image
जिन्नस १ कप किसलेला कोबी १ कप ज्वारीचे पीठ ५ टे. स्पू. लो फॅट दही १ टे. स्पू. कोथिंबीर लिंबूरस १ टी. स्पू. मिरची-आले पेस्ट १ टी. स्पू. लसूण पेस्ट चिमूटभर सोडा मीठ साखर हळद १ टी. स्पू. तेल हिंग जीरे कढीपत्ता पाककृती कोबी व मुठियाचे इतर साहित्य एकत्र करुन रोल करुन वाफवावे. तुकडे करुन तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावे. वरुन कोथिंबीर पेरुन गरम खायला द्यावे.

मेथीची पातळ भाजी

Image
साहित्य :- एक जुडी मेथी, ताक एक वाटी किंवा दही अर्धी वाटी, डाळीचं पीठ पाव वाटी, लसूण पाकळ्या सात-आठ, सुक्या लाल मिरच्या चार, तेल पाव वाटी, फोडणीचं साहित्य, चवीपुरतं मीठ. कृती :-  सर्वप्रथम मेथी धुऊन बारीक चिरावी नंतर थोडं तेल बाजूला काढून उरलेल्या तेलाची फोडणी करावी. लसणाच्या पाकळ्या फोडणीत टाकाव्यात. त्या चांगल्या तळल्या गेल्या की लाल मिरच्या अख्ख्या किंवा दोन तुकडे करून टाकाव्यात व नंतर त्यात मेथीची चिरलेली भाजी घालावी. दोन-तीन मिनिटांनी मीठ घालावं. मेथी शिजत आल्यावर दुसऱ्या भांडयात ताक किंवा दही घेतल्यास ते पातळ करून त्यात डाळीचं पीठ कालवावं व त्याची एकजीव पेस्ट करावी. दोन वाटया पाणी त्या पेस्टमध्ये घालून ते सरसरीत मिश्रण मेथीच्या भाजीत घालावं व चांगलं रटरटू द्याव. पळीवाढी भाजी होऊ द्यावी. भाजी शिजल्यावर आधी काढून ठेवलेल्या तेलाची वेगळी फोडणी करून त्यात तीन-चार पाकळ्या लसूण ठेचून घालावा व ताटात भाजी वाढताना ही फोडणी त्यावर घालावी.