Posts

Showing posts from December, 2017

मटाराची (ग्रीन पीस) टेस्टी बर्फी

Image
साहित्य -  ग्रीन पीस 1 कप, 1/2 कप पिस्ता बारीक काप केलेले, 1/2 कप तूप, 3 चमचा मावा, 2 कप साखर, 3/4 कप वेलची पूड.  कृती -  सर्वप्रथम मिक्सरमध्ये हिरवे मटार आणि पाणी घालून त्याला बारीक वाटून घ्यावे. नंतर नॉन स्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वाटलेले मटार घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात मावा घालून मिक्स करून घ्यावे. आता त्यात साखर घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता दुसरीकडे एका ऍल्यूमिनियमाच्या ट्रेवर तूप लावावे. त्यात वेलची पूड आणि अर्धे पिस्ते घालून मिक्स करावे. आता या मिश्रणाला ट्रेमध्ये घालून पसरवून घ्यावे. वरून उरलेले पिस्ते घालून बर्फी गार होण्यासाठी ठेवावी. गार झाल्यावर त्याला फ्रीजमध्ये ठेवावे. 2 तासाने त्याला बाहेर काढून त्याचे काप करावे.

सेमिया पायसम (शेवयांची खीर)

Image
साहित्य :  1/2 कप तूप, 1/2 कप शेवया मोडलेल्या, 4 कप दूध गरम, 1/2 कप साखर, 4 वेलची पूड, 1/3 काजू तुकडे केलेले, 1/3 कप बेदाणे.  कृती :  सर्वप्रथम कढईत 1/4 कप तूप साधारण 2 मिनिटे गरम करा. शेवया घाला. ढवळा आणि बदामी होईपर्यंत परता दूध आणि साखर घाला. साखर विरघळेपर्यंत ढवळा. 5 मिनिटे शिजवा. उरलेले तूप तव्यात साधारण 2 मिनिटे गरम करा. काजू घाला आणि बदामी होईपर्यंत परता. बेदाणे घाला. काही सेकंद ढवळा आणि पायसममध्ये घाला ढवळा आणि गरम गरम वाढा.   

मटार रोल्स

Image
 साहित्य: – हिरवे वाटाणे – एक मोठी वाटी – उकडलेले बटाटे – दोन-तीन – किसलेले चीज – दोन मोठे चमचे – खोबरे – अर्धी वाटी – हिरव्या मिरच्या – चार – एका लिंबाचा रस – अर्धा इंच आले – एक बारीक़ चिरलेला कांदा – मीठ – साखर – चवीप्रमाणे – तळण्यासाठी तेल – पावचा बारीक चुरा – आवश्‍यकतेनुसार कृती :  – सर्वप्रथम उकडलेला बटाटा नीट बारीक स्मॅश करून घ्या. – या स्मॅश केलेल्या बटाट्यात मीठ, साखर, लिंबू पिळून घ्या – नंतर वाटाणा उकडून बारीक़ करून घ्या. – त्यात किसलेले चीज, खोबरे, मिरची, आले, बारीक़ चिरलेला कांदा, मीठ, साखर व लिंबाचा रस पिळा. – बारीक केलेल्या बटाट्याच्या सारणाच्या दोन छोट्या आकाराच्या पुऱ्या करून वाटाण्याचे सारण त्यात भरून रोल तयार करा. – हा रोल पावाच्या चुऱ्यात घोळवून घ्या. – तेलात मंद गुलाबी रंग येईपर्यंत हा रोल तळा. – आता हा मटार रोल सॉसबरोबर सर्व्ह करा.

गोळ्यांची कढी

Image
साहित्य :  ताजे ताक दोन वाट्या, डाळीचे पीठ ३ चमचे, २ चमचे तूप, हिंग, जिरे, मेथ्या १/४ चमचा, हळद अर्धा चमचा, मिरची एक, आलं किसून १ चमचा, कढीपत्ता ४ ते ५ पाकळ्या / पाने, १ चमचा साखर. गोळ्यांसाठी हरबरा डाळ ४ ते ५ तास भिजवून. आले मिरची, लसूण, जिरे, मीठ परत मीठ व किसलेले आले घालावे. कढीला सतत उकळी आणू नये. ती फुटते. गोळ्यांसाठी कृती :  भिजलेली डाळ मिक्सरवर जाडसर वाटावी. त्यामध्ये वाटतानाच आले, लसूण, मिरची, मीठ, जिरे घालावे. आपल्या चवीनुसार वरून हळद घालावी. वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोळे वळावेत. तयार गोळे चाळणीला तेल लावून अथवा कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ठेवून वाफवावे अथवा प्रेशरकुक करावेत. जेवणापूर्वी गोळे कढीत सोडावे व गरम करावे. वरून चिरून कोथिंबिरीने सजवावे.

पोष्टीक मेथीदाणे

Image
साहित्य :  200 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल. कृती :  सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावे. या मिश्रणात मग मोड आलेले मेथीदाणे टाकून त्यावर झाकण ठेवावे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोळी सोबत सर्व्ह करावे.

शेव-टोमॅटो भाजी

Image
 जेवायला पटकन काही कालवण तयार करायचा असेल तर याहून सोपा पदार्थ नसेल कदाचित... सामुग्री:  1 वाटी शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे.   कृती:  एका कढईत फोडणी करता तेल गरम करून त्यात मोहर्‍या टाका. तडतडल्यावर मिरच्या, कांदा घालून परता. गोल्डन झाल्यावर टोमॅटो टाका. परतून हळद, तिखट, धणेपूड, मीठ टाकून परतून घ्या. चार वाट्या गरम पाणी घालून उकळून घ्या. उकळू लागले की त्यात शेव टाकून गॅस बंद करा. चवी प्रमाणे कोथिंबीर घालू शकता. विशेष:  सर्व्ह करण्याची तयारी असल्यावरच शेव घाला. शेव लसणाची किंवा लवंगांची असल्यास चव छान येते.तसेच पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येऊ शकतं.

लो कॅलोरी मटार कचोरी

Image
साहित्य:  2 वाटी गव्हाचा आटा, 2 वाटी मटार, 4 उकळलेले बटाटे, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, चार हिरव्या मिरच्या, 1-1 चमचा धणष व शोफ (दरदरेली कुटलेली), 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि तेल. कृती:  सर्वप्रथम आट्यामधे चवीनुसार मीठ आणि मग तेलाचे मोहन टाकून (मुठ वळेल इतके मोहन टाकायचे) मिळवून घ्यावे. आटा घट्ट भिजवून झाकून ठेवावे. मटार उकळत्या पाण्यात शिजवून पाणी गाळून घ्यावे. मिरजी, आलं, लसणाची पेस्ट थोड्याश्या तेलात परतून घ्यावी. बटाटे व मटर कुसकरून त्यात परतलेली पेस्ट व इतर सर्व मसाले टाकून लाडवा येवढे गोळे तयार करून घ्यावे. आटाच्या पुरीत भरून कचोरी तयार करावी. एका फ्रांइग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून कचोर्‍या ठेवून वरतून थोडे-थोडे तेल सोडायचे. मग झाकण ठेवून कचोर्‍यांना दोन्हीकडून वाफवून घ्याव्या. लालसर झाल्या की हिरवी आणि चिंचेच्या चटणीसोबत गरम गरम खाव्या.

मटण दम बिर्याणी

Image
साहित्य-  अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाटय़ा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, दोन टोमॅटो, दही, लिंबू, तिखट, मीठ, हळद, दोन कांदे, बिर्याणी मसाला.  कृती-  मटण धुऊन त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जाडसर पेस्ट लावून त्यातच दही, लिंबू, बारीक चिरलेले दोन टोमॅटो, तिखट, मीठ, ह़ळद, बिर्याणी मसाला घालून एक तासभर ठेवावे. हे सगळे मिश्रण मुद्दाम डायरेक्ट कुकरमध्येच ठेवून द्यावे, कारण बिर्याणी कुकरमध्येच करायची आह. तांदूळ धुऊन पंधरा मिनिटं निथळत ठेवावे. त्यानंतर एका वेगळ्या पातेल्यात तांदूळ जेमतेम बुडतील एवढे पाणी घालून जरासा मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे उभे चिरून कढईत थोडे जास्त तेल घालून ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. मग ते बाजूला एका पेपरवर काढून घ्यावे. त्याच तेलात हिंग, जिरे, लसूण (बारीक चिरलेली), हळद याची फोडणी करावी. आणि ही फोडणी कुकरमध्ये ठेवलेल्या मिश्रणाला द्यावी. त्यानंतर त्यावर तळलेला कांदा पसरवून घ्यावा. त्याच्यावर मोकळा शिजवलेला भात पसरवून घ्यावा. यानंतर कुकरची शिट्टी काढून त्या ठिकाणी मळलेल्या कणकेचा गोळा लावून घ्यावा. आणि झाकणालाही गोल कणीक लावून घ्यावी. ...

मसालेदार पालक फिश

Image
साहित्य:  500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा हळद, 1/2 चमचा मसाला, 2 कप पालक, 1/2 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडे हिंग, मीठ चवीनुसार, 1 मोठा चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.  कृती:  सर्वप्रथम मासे स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे काप करावे. एका कटोर्‍यात लिंबाचा रस, हळद आणि मीठ घेऊन त्यात माशांचे तुकडे घालावे व चांगल्याप्रकारे एकजीव करावे. हे मिश्रण 1 तास तसेच ठेवावे. पालकाला स्वच्‍छ धुऊन चिरून घ्यावे. कांदा-लसणाची पेस्ट तयार करावी. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा- लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून शिजू द्यावे. नंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि पालक घालून 2-3 मिनिट शिजवावे. 5 मिनिटानंतर त्यात गरम मसाला, जिरे-धने पूड घालून परतून घ्यावे. त्यात पाणी घालून 5-7 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात माशांचे तुकडे व मीठ घालून शिजवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

कचोरी

Image
कचोरी - [Kachori] न्याहारीसाठी खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि लहान मुलांना आवडणारी ‘कचोरी’ घरी बनवून पोटभर खाऊ शकता. जिन्नस     २५० ग्रा. मैदा     सोडाबाईकार्बोनेट     ६५ ग्रा. तेल     ८० ग्रा. पाणी     १०० ग्रा. उडीद डाळ     ३० ग्रा. तूप     २० ग्रा. आले     ६ ग्रा. हिरवी मिरची     १ ग्रा. हिंग     १ छोटा चमचा धणे पावडर     १/२ चमचा जीरे पावडर     १/२ छोटा चमचे साखर     मीठ चवीनुसार     १० मिली लिंबाचा रस     २ ग्रा. कोथिंबीर     तळणासाठी तेल पाककृती मैदा, मीठ आणि, सोडाबाइकार्बोनेट एकत्र मिळवावे, ६५ ग्रा. तेल टाकावे आणि चांगल्या तर्‍हेने मिळवावे. पाणी ( साधारण ८० मिली) घेऊन नरम मळावे, ओल्या कपडाने झाकून एका बाजुस ठेवावे. आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापावी, उडदाच्या डाळीस एक तास भिजवावे. नंतर वाटावे. कढईत तेल गरम करून त्यात वाटल...

चायनीज व्हेज फिंगर्स

Image
साहित्य :  उकडून स्मॅश केलेले बटाटे, दोन टेबलस्पून चिरलेला कोबी, दोन मोठे तमचे बारीक चिरलेला कांदा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेलं गाजर, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, दोन मोठे चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा सोया सॉस, एक लहान चमचा व्हिनेगर, चिमुटभर अजीनोमोटो, ड्राय ब्रेड क्रम्स, दोन ते तीन चमचे मक्याचं पीठ.  कृती :  सर्वप्रथम कढईत तेल घेऊन चांगलं गरम होऊ द्यावं. गरम तेलामध्ये आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोबी, गाजर, ढोबळी मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये सोया सॉस, अजिनोमोटो आणि मीठ मिसळावं. हे मिश्रण जास्त शिजवू नये. थोडं क्रंची ठेवावं. तयार झाल्यावर मिश्रण मोठ्या बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात ड्राय ब्रेड क्रम्स मिसळावेत. हाताने वळून मिश्रणाला फिंगर्सचा लंबगोलाकार आकार द्यावा. नंतर ते मक्याच्या पीठामध्ये घोळून घ्यावे. दुसर्‍या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावं. तेल तापल्यानंतर यात फिंगर्स सोडून...

व्हेज ब्रेड

Image
व्हेज ब्रेड - [Veg Bread] टोमॅटो, काकडी सोबतच स्वीट कॉर्न आणि डाळिंबाचे दाणे व त्यावर चाट मसाला टाकून नविन प्रकारचा व्हेज ब्रेड मधल्या वेळेत किंवा न्याहारीला तसेच लहान मुलांना डब्यात देता येईल. जिन्नस     ब्रेड     टोमॅटो     टोमॅटो केचअप     काकडी     स्वीट कॉर्न     चाट मसाला     शेव पाककृती एका ब्रेडच्या स्लाइसवर काकडी व टोमॅटोचे गोल काप ठेवा. नंतर ब्रेडच्या कडांवर अगदी थोडा केचप लावा. मधोमध डाळिंबाचे दाणे, स्वीट कॉर्न दाणे टाका. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार चाट मसाला आणि शेव टाका. नंतर दुसर्‍या ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवा. टोस्टरमध्ये भाजा. गरमागरम सॉस सोबत खा.

मक्याच्या शेवया

Image
साहित्य :  शेवया, मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, तेल, मीठ, मोहरी, हिंग, हळद, कोथिंबीर, खोबरे, साखर.  कृती :  सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. कढीपत्त्याची पाने घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व मक्याचे दाणे घालावेत. थोडे परतून झाकण ठेवून दोन वाफा देऊन शिजवून घ्यावे. नंतर पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून उकळी आणावी. तेलावर परतलेल्या शेवया या पाण्यात घालाव्यात. नीट हलवून गॅम मंद करून वाफा द्याव्यात व शेवया शिजवून घ्याव्यात. सर्व्ह करताना कोथिंबीर खोबरे घालावे.

मिक्स्ड व्हेजिटेबल लोणचे

Image
साहित्य :  1 किलो कोबी, 1 किलो गाजर, 1 किलो टोमॅटो, 1 किलो शलजम, 100 ग्राम तिखट, 100 ग्रॅम सरसोचे तेल, 50 ग्रॅम हळद, 250 ग्रॅम मीठ, 100 ग्रॅम व्हिनेगर, 250 गूळ. कृती :  सर्व भाज्या धुऊन मध्यम आकारात कापल्या नंतर उकळत्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढून उन्हात वाळवाव्या. नंतर सर्व मसाले वाटून मिसळावे तसेच गुळास व्हिनेगरमध्ये टाकून गरम करून तेलही त्यात मिळवावे. सर्व साहित्य व्यवस्थित मिळवून बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल.

मटण हंडी

Image
मटण हंडी - [Mutton Handi] मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीमध्ये बनवलेली ‘मटण हंडी’ खमंग व स्वाद वाढवते. जिन्नस     १ किलो मटणाचे तुकडे     ७ किसलेले कांदे     २ इंच आल्याची पेस्ट     मीठ     अर्धा चमचा साखर     ४ हिरव्या मिरच्या     १ चमचा कोथिंबीर     २ कप दही     १ लसणाची पेस्ट     अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी     दीड चमचा लाल मिरची     १ चमचा हळद     २ बारीक केलेले टोमॅटो     १ चमचा गरम मसाला पाककृती प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा. एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता. त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता. त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता. झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा...

कुळीथ पिठले

Image
कुळीथ पिठले - [Kulith Pithale] रात्रीच्या जेवणात उत्तम असे मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते. जिन्नस     अर्धी वाटी कुळीथ पीठ     ८-१० कढिलिंबाची पाने     ३-४ हिरव्या मिरच्या     अर्धा चमच मीठ     कोथिंबीर     २ आमसुले     २ पळ्या तेल     फोडणीचे साहित्य पाककृती तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी. त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत. कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.

पोष्टीक मेथीदाणे

Image
साहित्य :  200 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल. कृती :  सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करावी. या फोडणीत कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालावे. या मिश्रणात मग मोड आलेले मेथीदाणे टाकून त्यावर झाकण ठेवावे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोळी सोबत सर्व्ह करावे.