Posts

Showing posts from January, 2018

मूगाच्या डाळीचा हलवा

Image
साहित्य :  दोन वाट्या साखर, दोन वाट्या मूगाची डाळ, दोन वाट्या दूध, दोन वाट्या तूप, अर्धा चमचा वेलदोडे पावडर, काजू-बेदाणे-पिस्ते.  कृती :   मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर चाळनित उपसा. पाणी पूर्ण गेल्यानंतर मिक्समधून वाटून घ्या. (पाणी न घालता) वेलदोड्याची पूड करून घ्या. काजू उभे चिरून घ्या. बदाम पाण्यात भिजत घालून साल काढून उभे काप करा. कढईत तूप घेऊन त्यावर वाटलेली मूगाची डाळ घालावी व तांबूस होईपर्यंत परतावी. तांबूस झाल्यावर बाजूला ठेवा. दूध साखर एकत्र करून उकळा व डाळीवर ओतून परत गैसवर परता. गॅस मंद ठेवून सारखे परतत राहावे. वेलची पूड घाला व दूध पूर्ण आटल्यानंतर बदाम, काजू घालून खाली उतरवा. हा पौष्टिक पण आहे शिवाय पित्त कमी करतो.

टोमॅटोची ग्रीन चटणी

Image
साहित्य :  दोन कच्चे टोमॅटो, अर्धी वाटी किसलेले खोबरे, फोडणीसाठी तेल, हिंग, हळद, तीळ तीन चमचे, चार हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ. कृती :  दोन कच्चे टोमॅटो घेऊन त्याच्या फोडी करा. साधारण दीड डाव तेल घ्या. त्यात मोहरी, हिंग व थोडी हळद घालून फोडणी करा. त्यात तीन चमचे तीळ, अर्धी वाटी किसलेले खोबरे व चार हिरव्या मिरचिचेतुकडे करून घाला. थोडे परतून टोमॅटोच्या फोडी घाला आणि परतून अर्धकच्चे शिजवा. चवीनुसार मीठ घाला. यामुळे टोमॅटोचा कच्चटपणा, तुरटपणा जातो. नंतर हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून चटणी वाटून घ्या. आवडीनुसार ही चटणी मऊसूत किंवा थोडी जाडसर कशीही ठेवता येते. ती पोळी, भाकरी, पावाबरोबर चांगली लागते.

अन्नाई कथरिकाई

Image
 साहित्य :  16-20 लहान वांगी, लिंबा एवढी चिंच, 2 चमचे आणि अर्धा कप तेल, गोड लिंबाची 10 पानं, 1/2 चमचा मसाला, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथीदाणा, 2 चमचा धणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 4 सुक्या मिरच्या, 10 काळेमिरे, 1/4 चमचा हिंग, 1/4 चमचा हळद, 1/2 कप नारळाचा बुरा, मीठ चवीनुसार. कृती :  सर्वप्रथम वांग्याचे देठ काढून त्याला चारीबाजूने उभे कापावे. गरम पाण्यात चिंच भिजत घालावी आणि त्याच्या बिया काढून घ्याव्या. दोन चमचे तेल गरम करून त्यात जिरं, धणे, मेथी, चणा डाळ, उडदाची डाळ घालून फ्राय करावे नंतर त्यात तिखट, काळे मिरे, हिंग, हळद घालावी. गॅसवरून उतरवून त्यात नारळाचा बुरा घालून मिक्स करावे. मिश्रण गार झाल्यावर त्याची पेस्ट करावी. नंतर ती पेस्ट वांग्यात भरावी. कढईत अर्धा कप तेल गरम करून त्यात गोड लिंबाची पानं आणि वांगे सोडावे. उरलेल्या मसाला घालून झाकण ठेवावे. चिंचेत थोडे पाणी घालून ते भाजीवर सोडावे. मध्यम आंचेवर 15 ते 20 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.

पॅटिस

Image
 साहित्य-  प्रत्येकी १ वाटी बारीक चिरलेला पुदिना, पातीचा कांदा, पालक, मटार दाणे, २ बटाटे उकडलेले, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, १ टी. स्पू. गरम मसाला, २ टे. स्पू. हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, जिरपूड, मीठ, आमचूर पावडर, थोडी साखर, २ टे.स्पू. कॉर्न फ्लोअर कृती -  सर्व पालेभाज्या स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात. मटार दाणे जाडसर भरडून घ्यावेत. पालेभाज्या, मटार दाणे, मीठ एकत्र करून ते मिश्रण कोरडं होण्याइतपत गरम करावं. मिश्रण गार करून त्यात बटाटा किसून गरम मसाला, हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, जिरं पूड, आमचूर पावडर, साखर, ब्रेडचा चुरा हे सर्व जिन्नस एकत्र करावं. गरजेनुसार त्यात कॉर्न फ्लोअर टाकावं.हे मिश्रण घट्टसर असावं. त्याचे लहान गोळे बनवून त्यांना चपटा आकार द्यावा. नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर पॅटिस खमंग भाजून घ्यावेत आणि टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खाण्यास द्यावेत.

लाल भोपळ्याचं भरीत

Image
साहित्य :  एक वाटीभर लाल भोपळ्याच्या लहान फोडी वाफवून, दीड वाटी दही, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे, हिंग व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी, थोडं ओलं खोबरं. कृती :  सर्व एकत्र करून फोडणी द्या. फोडी दिसल्या पाहिजेत. लगदा होऊ देऊ नका. मोहरी पूड घालाची असल्यास फोडणी नसली तरी चालेल.

दही मिसळ

Image
दही मिसळ - [Dahi Misal] ‘दही मिसळ’ ही चटपटीत जेवणातील भाजी तसेच न्याहारीसाठी पावासोबत खाता येणारा पदार्थ आहे. जिन्नस     ५०० ग्रॅम मटकी     ७-८ हिरव्या मिरच्या     १/२ नारळ     लिंबाएवढा गूळ     मीठ     २ मोठे बारीक चिरलेले कांदे     २ मोठे उकडलेले चौकोनी तुकडे करुन बटाटे     १०० ग्रॅम बारीक शेव     १०० ग्रॅम चिवडा     २ वाट्या दही पाककृती आदल्या दिवशी मटकी भिजत घालावी. तिला मोड आल्यावर मटकी निवडून घ्यावी. तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात मोड आलेली मटकी घालावी. जरा परतून थोडे पाणी घालावे व मटकी शिजू द्यावी. मटकी शिजल्यावर त्यात वाटलेल्या मिरच्या, गूळ व मीठ घालून उसळ बनवावी. कोथिंबीर व नारळ घालून उसळ खाली उतरवावी. उसळीत पाणी अजिबात राहता नये. उसळ गार होऊ द्यावी. आयत्या वेळी प्लेटमध्ये २ डाव उसळ घालावी. नंतर त्यावर थॊडा बारीक चिरलेला कांदा घालवा. बटाटाच्या फोडी घालाव्यात. नंतर त्यावर चिवडा व बारीक शेव घालाव...

टोमॉटोची व चिंचेची चटणी

Image
साहित्य :  अर्धा किलो टोमॅटो, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धीवाटी तेल, चमचाभर मोहरी, आवडीनुसार तिखट व मीठ, थोडासा चिंचेचा गाळलेला कोळ, अर्धा चमचा मेथी दाणा, थोडासा कढीपत्ता व हिंग दोन चमचे साखर. कृती :  सर्वप्रथम कढईत तेल घालून हिंग व मेथी परतून घ्या. त्याची पावडर करा. लसूण आणि टोमॅटोही मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट घट्ट होईपर्यंत शिजवा. आता एका कढईत जास्त तेल घालनू त्यावर मोहरी व कढीपत्त्याची फोडणी तयार करा. त्यात चिंचेचा कोळ, हिंग, मेथीची पावडर, मीठ, तिखट घाला. कोळ शिजू लागला की टोमॅटोची पेस्ट व साखर घालून पाच मिनिटे शिजवा.

मटार रोल्स

Image
  साहित्य: – हिरवे वाटाणे – एक मोठी वाटी – उकडलेले बटाटे – दोन-तीन – किसलेले चीज – दोन मोठे चमचे – खोबरे – अर्धी वाटी – हिरव्या मिरच्या – चार – एका लिंबाचा रस – अर्धा इंच आले – एक बारीक़ चिरलेला कांदा – मीठ – साखर – चवीप्रमाणे – तळण्यासाठी तेल – पावचा बारीक चुरा – आवश्‍यकतेनुसार कृती :  – सर्वप्रथम उकडलेला बटाटा नीट बारीक स्मॅश करून घ्या. – या स्मॅश केलेल्या बटाट्यात मीठ, साखर, लिंबू पिळून घ्या – नंतर वाटाणा उकडून बारीक़ करून घ्या. – त्यात किसलेले चीज, खोबरे, मिरची, आले, बारीक़ चिरलेला कांदा, मीठ, साखर व लिंबाचा रस पिळा. – बारीक केलेल्या बटाट्याच्या सारणाच्या दोन छोट्या आकाराच्या पुऱ्या करून वाटाण्याचे सारण त्यात भरून रोल तयार करा. – हा रोल पावाच्या चुऱ्यात घोळवून घ्या. – तेलात मंद गुलाबी रंग येईपर्यंत हा रोल तळा. – आता हा मटार रोल सॉसबरोबर सर्व्ह करा. संबंधित माहिती     पौष्टिक कणकेचा हलवा     ग्रीन पुरी     पंचभेळी वांगी     डिंकाचे लाडू     झणझणीत लाल मिरच्यांचे लोणचे ...

Veg Recipe : हरियाली पनीर

Image
साहित्य :  3 वाटी कोथिंबीर, 1/2 वाटी पुदिना, 1 कैरी, 1 कांदा, 2 वाटी पनीर, 1 हिरवी मिरची, 1 चमचा लसूण पाकळ्या, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा धने पूड, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे पूड, मीठ, चवीपुरतं तेल.  कृती :  मिक्समध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि 1 वाटी पाणी घालून बारीक पेस्ट बनवणे. कढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे. त्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे. त्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे. त्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालून ढवळणे. पनीरचे तुकडे आणि मीठ घालून 2 मिनिट शिजवणे.

गार्लिक चिकन

Image
साहित्य :  १ किलो चिकन, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ लसूणचे कांदे, ४०० ग्रॅम दही, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, कसूरी मेथी, काश्मिरी मिर्च पावडऱ चवीनुसार मीठ. कृती :  प्रथम चिकनला मीठ चोळून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही एक चमचा तेल़, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मेरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कसूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. चिकनच्या तुकडयांना स्पर्श न करता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.  

कणसाची रसेदार छल्ली

Image
साहित्य :  4 अमेरिकन कार्न, 1 लहान चमचा बटर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, 4 लहान चमचे चाट मसाला, पाव वाटी लिंबाचा रस. कृती :  सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यात भुट्टे घालून चांगले हालवून घ्यावे व त्यात 1/2 वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिटा होऊ द्या. रसा तयार करण्यासाठी :  लिंबाच्या रसात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे, आवडत असल्यास थोडे लोणीसुद्धा घालू शकता. भुट्टे उकळ्लयावर त्यांना लिंबाच्या रसाने तयार केलेल्या रस्यात चांगल्याप्रमाणे चोळून घ्यावे, आणि गरम गरम भुट्टे सर्व्ह करावे.

संक्रांत विशेष : भोगीची भाजी

Image
साहित्य :  २-३ पातीचे कांदे, एक गाजर, एक बटाटा, २-३ वांगी, अर्धी-पाऊण वाटी सोलाणे, थोडेसे मटाराचे दाणे, वालपापडीच्या (ऊसावरच्या) शेंगा, शेपु, लसणीची पात,कांद्याची पात, एखादा मुळ्याचा तुकडा, २-४ फ्लॉवरचे तुरे, तीळाचं जाडसर कुट, मोहरी, धण्याची पुड, हळद, तिखट, गोडा मसाला किंवा काळा मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, गुऴ. विधी :  सर्वप्रथम पातीचा कांदा उभा चिरून घ्यावा. सगळ्या भाज्या चिरून-निवडून घ्याव्यात. कढईत हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यायचा. चिरलेल्या भाज्या -पात फोडणीत घालून त्यात मीठ मसाला आणि तिळाचं कुट घालून वाफ आणायची. आवडत असल्यास थोडा गुळ घालायचा.

तिळगुळाची स्वादिष्ट पोळी

Image
 सारणासाठी साहित्य :  2कप गूळ, 2 चमचे बेसन, 1 चमचा भाजलेली खसखस, 1/2 वाटी तिळाचा भुरा, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं.  परीसाठी साहित्य :  3 कप कणीक, 1/2 कप मैदा, 2 चमचे साजुक तूप, तेलाचे मोहन, चिमूटभर मीठ. सर्व एकत्र करून पाण्याने घट्ट भिजवावे. कृती :  सर्वप्रथम कढईत तूप घालून बेसन भाजून घ्यावे. नंतर त्यात किसलेला गूळ, तिळाचा भुरा आणि खोबरे घालून एकत्र करून घ्यावे. भिजवलेली कणीक चांगली मऊ मळून घ्यावी. पेढे एवढा गोळा घेऊन त्यात सारण भरून पुरण पोळी करतो त्याप्रमाणे तांदळाच्या पिठीवर पातळ पोळी लाटावी. व तूप लावून खमंग भाजून घ्यावी.

पुडाच्या वड्या

Image
साहित्य :  दोन जुड्या कोथिंबीर, चिच कोळ अर्धी वाटी, तळणीसाठी तेल, एक वाटी खिसलेले सुक्के खोबरे, अर्धी वाटी पांढरे तिळ, गोडा मसाला दोन टे. स्पुन, मिठ , साखर दोन टे.स्पुन.   पारीसाठी-  बेसन पिठ एक वाटी, कणीक अर्धी वाटी, तेलाचे मोहन कडकडीत एक डाव. अर्धा टे.स्पुन हळद, मिठ एक चमचा. कृती-  सर्वप्रथम कोथिंबीर निवडून धुवुन ठेवावी, खिसलेले खोबरे भाजावे व नंतर कुस्करावे, तिळ भाजून अर्धवट कुटावेत, कोथिंबीर बारीक चिरावी, त्यात खोबरे, तिळ कुट, मसाला, मिठ, साखर हे सर्व एकत्र करुन ठेवावे, बेसन पिठ व कणीक एक्त्र करुन त्यात तेलाचे मोहन कडकडीत एक डाव घालुन घट्ट भिजवा. त्याची पारी लाटून त्यावर चिंचेचा कोळ सगळीकडे लावा, त्यावर सारण पसरा, हाताने सारण घट्ट थापा, त्याची घट्ट सुरळी बनवून वड्या सुरीने कापुन घ्या, मंद आचेवर तळा.

माँ दी दाल

Image
माँ दी दाल - [Maa Di Dal] पंजाबी ‘माँ दी दाल’ घरच्या घरी तयार...! जिन्नस     १ कप उडीद डाळ     १/२ कप राजमा     ४ कप पाणी     १ तुकडा कापलेले आले     ४ पाकळी कापलेला लसुण     १ कापलेला कांदा     ३/४ चमच गरम मसाला     २ कापलेली हिरवी मिरची     १/२ चमचे हळद     १ चमचा मीठ     २ मोठे चमचे तेल     ३/४ चमचे जीरे     १ जुडी कापलेली कोथिंबीर     २ मोठी कापलेली टोमॅटो     ३/४ चमचे लाल मिरची पाककृती उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम करून जीरे टाकावे. नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करावे, नंतर टोमॅटो टाकावे. ३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा आणि तंदूरी पोळी बरोबर गरम गरम खावी.

तीळ-गूळ पोळी

Image
साहित्य:  अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, वेलदोडा पूड, एक चमचा खोबर्‍याचा कीस, दोन चमचे डाळीचे पीठ, कणीक, मैदा, तूप.  कृती:  कणकेच्या निम्मे मैदा व दोन चमचे डाळीचे पीठ घेऊन त्यात मोहन घाला. पोळ्यांच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. गूळ किसून घ्या. खसखस, तीळ, खोबर्‍याचा कीस भाजून बारीक करून घ्या. त्यात वेलदोडा पूड घाला. हे मिश्रण एकत्र करा. कणकेचा लहान गोळा घेऊन पुरी एवढे लाटा. त्यात वरील मिश्रणाचा गोळा घालून हलक्या हाताने पोळी लाटा. ही पोळी तव्यावर खमंग भाजा. या पोळ्या खूप दिवस टिकतात.

चिकन मसाला

Image
साहित्य : ५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ.  कृती :  प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकावे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून किमान दोन तास ठेवावे. नंतर कढईत तेल टाकून गरम करावे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकून गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेले चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घ्यावे. झटपट चिकन तात्काळ तयार होईल.

ब्रेड रोल्स

Image
ब्रेड रोल्स - [Bread Rolls] न्याहारी किंवा मधल्या वेळेत झटपट करता येण्यासारखा खमंग, चटपटीत असा ब्रेड रोल्स लहानांसह मोठ्यांना पण नक्कीच आवडेल. जिन्नस     स्लाईस ब्रेड     उकडलेले बटाटे     मीठ     हिरव्या मिरच्या     कोथिंबीर     थोडे आले पाककृती ब्रेडच्या कड्या कापून घ्या. ऊकड्लेले बटाटे सोलून घ्या. नंतर किसणीवर किसा. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालून सारण तयार करावे. उथळ पातेलीत पाणी घेवून त्यात एकेक स्लाईस टाकाव्यात. नंतर दोन्ही हाताच्या तळव्याने दाबून पाणी काढून टाकावे. त्यावर सारण घालून गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात. ब्रेड ओला झाल्यामुळे छान गुंडाळी होते. नंतर तव्यात तूप टाकून त्यात हे रोल्स तळून काढावेत. छान कुरकुरीत होतात. हे गरमागरम रोल्स सॉस सोबत सर्व्ह करावेत.

रोस्टेड चिकन

Image
साहित्य :  ६-८ कोंबडीचे तुकडे, हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले चीज़, लसूण पाकळ्या २, चवीला मीठ, मेयॉनीज़, पावाचा चुरा. कृती :  हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे. चांगली भट्टी(ओव्हन) हवी. साल काढलेले चिकनचे मोठे तुकडे घ्या. शक्यतो मांड्या आणि छातीचे भाग असावेत. बकीचे तुकडे रस्सा करण्यासाठी वापरता येतील. तुकड्यांना सढळ हाताने मेयॉनीज़ लावा. लसूण वाटून पावाच्या (कुरकुरीत) चुऱ्यात घाला. सगळे कोंबडीचे तुकडे पावाच्या चुऱ्यात चांगले घोळा. पाहिजे असेल तर त्यावर बदामाचे काप लावा. सर्व तुकडे आधी ३५० फॅरनहाईट पर्यंत तापविलेल्या भट्टीमन्धे एक थराने थोडे पसरून ठेवा. ८-१० मिनिटामध्ये तांबूस खमंग होतील. चीज हवे अस्ल्यास शेवटच्या २ मिनिटासाठीच घालायचे.

मटण दम बिर्याणी

Image
साहित्य-  अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाटय़ा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, दोन टोमॅटो, दही, लिंबू, तिखट, मीठ, हळद, दोन कांदे, बिर्याणी मसाला.  कृती-  मटण धुऊन त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जाडसर पेस्ट लावून त्यातच दही, लिंबू, बारीक चिरलेले दोन टोमॅटो, तिखट, मीठ, ह़ळद, बिर्याणी मसाला घालून एक तासभर ठेवावे. हे सगळे मिश्रण मुद्दाम डायरेक्ट कुकरमध्येच ठेवून द्यावे, कारण बिर्याणी कुकरमध्येच करायची आह. तांदूळ धुऊन पंधरा मिनिटं निथळत ठेवावे. त्यानंतर एका वेगळ्या पातेल्यात तांदूळ जेमतेम बुडतील एवढे पाणी घालून जरासा मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे उभे चिरून कढईत थोडे जास्त तेल घालून ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. मग ते बाजूला एका पेपरवर काढून घ्यावे. त्याच तेलात हिंग, जिरे, लसूण (बारीक चिरलेली), हळद याची फोडणी करावी. आणि ही फोडणी कुकरमध्ये ठेवलेल्या मिश्रणाला द्यावी. त्यानंतर त्यावर तळलेला कांदा पसरवून घ्यावा. त्याच्यावर मोकळा शिजवलेला भात पसरवून घ्यावा. यानंतर कुकरची शिट्टी काढून त्या ठिकाणी मळलेल्या कणकेचा गोळा लावून घ्यावा. आणि झाकणालाही गोल कणीक लावून घ्यावी. ...