Posts

Showing posts from October, 2017

ढोकळा मिनी इडली

Image
साहित्य :  1 पॅकेट इन्सस्टेंट ढोकळा मिक्स, 1 कप दही, 250 मिली लीटर दूध, 2 चमचे गजराचा कीस, आलं व हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. कृती :  सर्वप्रथम बाउलमध्ये ढोकळा मिक्स पावडर, दही, आलं व हिरव्या मिरच्या टाकाव्या नंतर दूध घालून त्या मिश्रणाला एकजीव करावे. इडलीपात्रात चारी बाजूने तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण टाकावे. वरून प्रत्येक इडलीवर गाजराचा कीस घालून इडली तयार करावी. कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणी व सॉस सोबत सर्व्ह करावे. बगेर तेलाची ढोकळा इडली तयार आहे.

फ्राइड फिश

Image
साहित्य :  675 ग्रॅम कोड मासोळीचे साफ तुकडे, 1 कापलेला कांदा, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मीठ, 1 चमचा लसुणाच गोळा, 1 चमचा तिखट, दीड चमचा गरम मसाला, 2 चमचे धने पूड, 2 मोठे कापलेले टोमॅटो, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोर, 3/4 कप तेल. कृती :  मासोळीचे तुकड्यांना थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, मीठ, लसूण, गरम मसाला, तिखट आणि धने पूड हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट तयार करावी. मासोळीच्या तुकड्यांना फ्रीजमधून काढून एका प्याल्यात ठेवावे. त्यावर दळलेला मसाला आणि कॉर्नफ्लोर घालून चांगले हालवावे. एका कढईत तेल गरम करून आणि मासोळीच्या तुकड्यांवर कॉर्नफ्लोर लपेटून पकोड्यासारखे तळून काढावे. हिरवी चटणी व पराठ्यांसोबत गरम गरम वाढावे.

रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात

Image
 साहित्य -  दोन वाटी बासमती तांदूळ, चार वाटी पाणी, चार टे. स्पू. साजूक तूप, दोन-तीन लवंग, वेलची पूड, दोन वाटी किसलेला गूळ, दोन वाटी खोवलेलं ओलं नारळ, आठ-दहा काजू, अर्धी वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग. कृती -  तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून टाकावं. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. १0-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.

दही भेंडी

Image
चवीला वेगळी अशी चटपटीत दही भेंडी (Dahi Bhendi) सर्वांना आवडेल. जिन्नस     १०० ग्रॅम भेंडी     १ कप दही     पाव चमचा चाट मसाला     पाऊण चमचा साखर     मीठ     १-२ हिरव्या मिरच्या     हिंग     पाव चमचा मोहरी     ५-६ कडीपत्ता पाने     फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल     भेंडी तळण्यासाठी तेल पाककृती भेंडी धुवून कापडाने कोरडी करुन घावीत. मग त्याचे मध्यम लांबीचे तुकडे करा. कढईत तेल गरम करावे आणि भेंडी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घावीत बाउलमध्ये दही घोटून घ्यावे. त्यात मीठ, साखर आणि चाट मसाला घालून नीट ढवळून घ्यावा. फोडणीच्या कढईत तेल गरम करावे.तेल कडकडीत तापले कि मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि हिरवी मिरची, कढीपता आणि हिंग घालून दह्याला फोडणी द्यावी. खायला द्यायच्या वेळेला तळलेली भेंडी दह्यात घालून एकत्र करुन खायला द्यावे.

कोळंबीचा पुलाव

Image
कोळंबीचा पुलाव - [Prawns Pulao] महाराष्ट्रातील एक मांसाहारी भाताचा प्रकार ‘कोळंबीचा पुलाव’ हा चवीला सुंदर लागतो. जिन्नस     १ वाटी साफ केलेली कोळंबी     १ वाटी मटारचे दाणे     ३ वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस     २ कांदे     ७-८ लसूण पाकळ्या     हळद     ४ लवंगा     ४ वेलदोडे मसाला वाटण     २ चमचे धणे     २ चमचे खसखस     १ चमचा शहाजिरे     १०-१२ काळी मिरे     २-३ दालचिनीचे तुकडे     १०-१२ लाल मिरच्या     १०-१५ काजू  पाककृती लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी. कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे. नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट ...

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

Image
फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी - [Flower Cheese Kofta Curry] आपण बर्‍याचदा शिजलेल्या फ्लॉवरच्या वासामुळे फ्लॉवरची भाजी खान्यास टाळाटाळ करतो मात्र ‘फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी’ मध्ये चीझ - फ्लॉवरचे कोफ्ते आणि सोबत करी एकुन भाजीला एक वेगळी चव देतात, कोफ्ते प्रकारातील भाज्या आवडत असल्यास हा प्रकार एकदा नक्की करून पहावा, लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा हा भाजीचा प्रकार आहे. जिन्नस     १/२ किलो फ्लॉवर     ३-४ हिरव्या मिरच्या     १/२ लिंबाचा रस     ६० ग्रॅम चीझ     ३ ब्रेडचे स्लाईस     १/४ चमचा गरम मसाला     थोडेसे वाटलेले आले     थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर     मीठ ग्रेव्हीसाठी जिन्नस     २ मोठे कांदे     १ मोठा टोमॅटो मसाला     ५-६ लसूण पाकळ्या     १ आल्याचा लहानसा तुकडा     १/२ चमचा धणे     १ चमचा जीरे     १/४ चमचा हळद     १ ...

एग मलाई

Image
साहित्य-   4 अंडी उकळलेली, 1 चमचा तूप, मोहरी-जीरे थोडेसे, 3-4 चमचे फेटलेली दूधाची साय, 10-12 काळ्यामिरची पावडर, मीठ चवीनुसार.   कृती-  सर्वप्रथम उकळलेली अंडी 4 भागात कापावे. एक पॅन मध्ये तूप गरम करून मोहरी-जिर्‍याची फोडनी करून कापलेल्या अंडीवर टाकावे. त्यानंतर फेटलेली साय टाकून मीठ आणि मिर्‍यांचे पावडर टाकून सर्व्ह करावे.

भाज्यांचे लोणचे

Image
आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे भाज्यांचे लोणचे (Vegetables Pickle) करता येते. जिन्नस     फ्लॉवरचे तुरे १ वाटी     सलगमचे साल काढून तुकडे १ वाटी     गाजर १ वाटी तुकडे     कांदा १     आले-लसूण बारीक चिरून २ टे.स्पून     तिखट     मीठ     गरम मसाला चवीनुसार     मोहरी पूड २ टी स्पून     व्हिनेगर २ टे.स्पून     साखर किंवा गूळ १/२ वाटी     मोहरी तेल २ टे.स्पून पाककृती भाज्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवून चाळणीवर ओताव्यात. कापडावर पसरून पूर्ण कोरड्या कराव्यात. कांदा किसावा. गूळ व व्हिनेगर एकत्र करून मंद गॅसवर मधाप्रमाणे होईपर्यंत उकळावे. गार करावे. तेल तापवून कांदे किस, लसूण, आले परतावे. लालसर झाले की उतरवून त्यात मीठ, मोहरी पूड, तिखट व गरम मसाला एकत्र करावा. बरणीत भरून पुन्हा थोडं तेल घालावं. हे लोणचे उन्हात ठेवूनही करतात. कांदे ऐच्छिक आहे. आपल्याला मोहरीऐवजी शेंग...

बांगडा मसाला

Image
बांगडा मसाला - [Bangada Masala] चटपटीत आणि खमंग मसालेदार ‘बांगडा मसाला’ खवय्यांच्या पसंतीस उतरणारा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. जिन्नस     ४ बांगडे     १ वाटी खवलेला नारळ     १ मोठा कांदा     ५-६ लाल मिरच्या     थोडी चिंच     मीठ     २ मोठे चमचे तेल मसाला     अर्धा चमचा मेथी     अर्धा चमचा हळद पाककृती बांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा. धुवून घ्या. खवलेला नारळ, मिरच्या, चिंच जाडसर वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. कढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला. नंतर हळद, कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या. त्यात वाटलेला मसाला, मीठ घालून परतवून घ्या. त्यात बांगड्याचे तुकडे घाला. पाणी न टाकता बांगडा शिजवा. भाकरी किंवा पोळीबरोबर चांगला लागतो.

भावनगरी शेव भाजी

Image
साहित्य :  १०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमाचा गरम मसाला, दान चमचे तेल, हळद, मीठ, हिंग व राई गरजेप्रमाणे. कृती :  प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालून कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यावा. आता त्यात भावनगरी शेव घालून चांगली हलवून घ्यावी. शेवटी थोड्या पाण्याचा हबका मारून हलकी वाफ काढावी. चवीला थोडी साखर व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. ही भाजी गरम गरम असताना त्यावर दही घालूनही खाता येते.

कच्च्या केळ्यांची भाजी

Image
साहित्य :  तीन कच्ची केळी, अर्धी वाटी भिजलेले हरभरे, किचित मीठ घालून वाफवून, वाटीभर ओलं खोबरं, चार सुक्या लाल मिरच्या, हळद, मीठ, एक कांदा ७/८ मिरे, दोन लवंगा, दोन चमचे धणे, अर्धा डाव तेल, चिमूट साखर. कृती : चणे-हरभरे रात्री भिजत घालून सकाळी वाफवावे. केळीची साल काढून जरा मोठ्याच फोडी कराव्यात. खोबऱ्याच्या चवात मिरची धणे, मिरे, लवंग व हळद घालून वाटून मसाला बनवावा. पॅनमध्ये तेल घालून कांद्याच्या फोडी टाकून परताव्यात. त्यावर केळीच्या फोडी घालाव्यात थोडसं पाणी व मीठ घालून शिजू द्याव्यात. केळी शिजली की वाफवलेले चणे, वाटलेला मसाला घालून डावाने हलके हलवावे. चवीपुरती साखर घालावी व भाजी उकळू द्यावी.

दुपहर के भोजन में आज बनाएं महाराष्ट्रियन दाल

Image
दुपहर के खाने में ज्‍यादातर लोग दाल चावल ही खाना पसंद करते हैं। अगर आपको दाल बनाने की एक और रेसिपी पता चल जाए तो कितना अच्‍छा हेागा। अगर आप रोज नई नई रेसिपी ट्राई करनी की आदि हैं तो, आज हम आपको महाराष्ट्रियन दाल बनाना सिखाएंगे।  यह महाराष्ट्रियन दाल काफी सिंपल है और बनाने में भी ज्‍यादा वक्‍त नहीं लगता। इस दाल को तूअर दाल से बनाया जाता है, जो कि काफी फायदेमंद होती है। तो अगर आप चावल और रोटी के साथ स्‍वादिष्‍ट दाल बनाने की इच्‍छुक हैं तो, जरुर ट्राई करें यह महाराष्‍ट्रियन दाल। सामग्री-  उबली तूअर दाल- 2 कप  कटी प्‍याज- 1  कटे  टमाटर- 1/2  लहसुन- 2 चम्‍मच तेल- 3 चम्‍मच  राई- 1 चम्‍मच  जीरा- 1 चम्‍मच  हींग- चुटकीभर  कडी पत्‍ते- 5-6  नमक- स्‍वादअुसार  हल्‍दी पावडर- 1/4 चम्‍मच  हरी मिर्च- 3 धनियपत्‍ती- कटी हुई विधि-  सबसे पहले तूअर दाल धो लें और उसे कुकर में 3 सीटी आने तक पका लें।  तूअर दाल के साथ हल्‍दी और नमक भी मिलाएं।  अब पैन चढ़ाएं और उसमें थोड़ा सा तेल गरम करें। ...

मुगलई दम आलू

Image
मुगलई दम आलू - [Mughlai Dum Aloo] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता. जिन्नस     ८ बटाटे     तळणासाठी तूप     ४ कापलेली काजू     ६ कापलेली मनुका     ११५ ग्रा. मावा     १ हिरवी मिरची     मीठ     काळे मिरे     २ कांदे     २ हिरवी मिरची     १ आल्याचा तुकडा     १/२ चमचा हळद     २ चमचे मीठ     ५ लाल मिरची     ५ पाकळी लसूण  पाककृती बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. बटाट्याचा आतील भाग पोकळ करुन घ्यावा. बटाट्यामध्ये बनविलेला मसाला भरावा व उरलेल्या बटाट्याच्या कुस्कराने भरुन टाकावे. टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे. एका पातेल्यात तूप गरम करून लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी. जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत...

काजू मलई करी

Image
 साहित्य:  क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ. कृती:  टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

भाज्यांचे लोणचे

Image
आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे भाज्यांचे लोणचे (Vegetables Pickle) करता येते. जिन्नस     फ्लॉवरचे तुरे १ वाटी     सलगमचे साल काढून तुकडे १ वाटी     गाजर १ वाटी तुकडे     कांदा १     आले-लसूण बारीक चिरून २ टे.स्पून     तिखट     मीठ     गरम मसाला चवीनुसार     मोहरी पूड २ टी स्पून     व्हिनेगर २ टे.स्पून     साखर किंवा गूळ १/२ वाटी     मोहरी तेल २ टे.स्पून पाककृती भाज्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवून चाळणीवर ओताव्यात. कापडावर पसरून पूर्ण कोरड्या कराव्यात. कांदा किसावा. गूळ व व्हिनेगर एकत्र करून मंद गॅसवर मधाप्रमाणे होईपर्यंत उकळावे. गार करावे. तेल तापवून कांदे किस, लसूण, आले परतावे. लालसर झाले की उतरवून त्यात मीठ, मोहरी पूड, तिखट व गरम मसाला एकत्र करावा. बरणीत भरून पुन्हा थोडं तेल घालावं. हे लोणचे उन्हात ठेवूनही करतात. कांदे ऐच्छिक आहे. आपल्याला मोहरीऐवजी श...

पापलेटची आमटी

Image
पापलेटची आमटी - [Papletchi Aamti] कोकणी पद्धतीची अशी ही प्रसिध्द पापलेटची आमटी चवीला सुंदर लागते. जिन्नस     दोन पापलेट     दहा बेडगी मिरच्या     पाच लसूण पाकळ्या     तीन-चार आमसूल     एक चमचा धणे     छोटा कांदा     पाव चमचा हळद     खोबरे     मीठ पाककृती पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा. भिजवलेले धणे व मिरची वाटून घ्या. नंतर हळद, धणे लसूण, मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या. त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या. तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा. नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.

लाल भोपळ्याचं भरीत

Image
साहित्य :  एक वाटीभर लाल भोपळ्याच्या लहान फोडी वाफवून, दीड वाटी दही, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे, हिंग व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी, थोडं ओलं खोबरं. कृती :  सर्व एकत्र करून फोडणी द्या. फोडी दिसल्या पाहिजेत. लगदा होऊ देऊ नका. मोहरी पूड घालाची असल्यास फोडणी नसली तरी चालेल.

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी

Image
कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी - [Cauliflowerchi Masaledar Bhaji] चटपटीत, मसाला घालून केलेली ‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’ तोंडाला चवच आणेल. जिन्नस     १ किलो कॉलीफ्लॉवर     १ वाटी धणे     अर्धा चमचा हळद     १ चमचे तिखट     १० लसूण पाकळ्या     ५ चमचे तेल     अर्धा चमचा मोहरी     १ चमचा मीठ (किंवा जास्त) पाककृती फ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार मध्यम तुरे ठेवावे. धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे. एकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे. पातेल्यात तेल तापलेकी त्यात मोहरी घालवी. तडतडला की वाटलेला मसाला खमंग परतावा. खाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे. थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झांकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी. दहा मिनिटांनंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी.

Veg Recipe : सिमला मिरचीची भाजी

Image
साहित्य :  पाव किलो सिमला मिरची, 2 कांदे, मोहरी, हिंगपूड, हळद, बेसन. कृती :  सिमला मिरच्यांचा आतील बियांचा भाग काढून टाकावा व लहान फोडी करून घ्याव्यात. कांदे बारीक चिरून घ्यावेत. मोहरी हिंगपूड, हळद घालून 4 चमचे तेलाची फोडणी करून त्यात कांदे व मिरचीच्या फोटी घालून परतावे. मीठ घालावे. शिजल्यावर पिठल्याला लावतो त्याप्रमाणे हळूहळू बेसन घालावे व सर्व मिळून पुन्हा परतावे.

चिकन बिर्याणी

Image
चिकन बिर्याणी - [Chicken Biryani] कोकणी पद्धतीची अशी ही प्रसिध्द ‘चिकन बिर्याणी’ चवीला सुंदर लागते. जिन्नस     ६७५ ग्रा. चिकन तुकडे     १॥ कप बासमती तांदूळ     २ मोठे चमचे तेल     १ कापलेला कांदा     २ कांडी लसूण सोललेली     १ हिरवी मिरची कापलेली     १ तुकडा आले कापलेले     २ चमचे चिकन मसाला     १ चमचा मीठ चवीनुसार     १/२ चमचा गरम मसाला     ३ कापलेले टोमॅटो     १/२ चमचा हळद     २ तेजपत्ते     ४ छोटी वेलची     ४ लवंग     १ चमचा केसर पाककृती तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीट फ्राय करावे चिकन टाकावे व ३ मिनीट फ्राय करावे. चिकन मसाला मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकुन ३-४ मिनीट अजुन भाजावे नंतर उतरवुन एका बाजुला ठेवावे. ...